शिकायचंय ना, मग करायचं काम!

By Admin | Published: April 22, 2016 09:05 AM2016-04-22T09:05:12+5:302016-04-22T09:05:12+5:30

विद्यापीठातल्या कमवा-शिका योजनेत सहभागासाठी उच्च शिक्षण घेणा-या तरुण हातांची रांग लागते तेव्हा.

Do not want to learn, then do it! | शिकायचंय ना, मग करायचं काम!

शिकायचंय ना, मग करायचं काम!

googlenewsNext
मराठवाडय़ात सलग चौथ्या वर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळी परिस्थितीत शिक्षण बंद होण्याची वेळ अनेकांवर आली आहे. विशेषत: मुलींच्या उच्च शिक्षणावर तर यामुळे गदा आली आहेच. मुलग्यांनी तरी अजून शिक्षणाची दारं कशीबशी किलकिली करत उघडी ठेवली आहेत.
पण आपलं शिक्षण चालू ठेवणं आणि ऐन दुष्काळात त्यासाठी घरच्यांकडे पैसा मागणं हे सोपं नाही. खरंतर पैसे मागावेत नी निवांत शिकावं, अभ्यास करावा असं सुख अनेकांच्या वाटय़ाला आता उरलेलं नाही.
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आणि संशोधनासाठी मराठवाडय़ातल्या अनेक  जिल्ह्यांतील विद्यार्थी मोठय़ा संख्येने येतात. त्या तुलनेने औरंगाबाद शहरातील विद्यार्थी कमी आहेत. आणि त्यातही ग्रामीण भागातील विद्याथ्र्याचं विद्यापीठातलं प्रमाण साधारणत: 7क् टक्के एवढं आहे. 
उन्हाळ्याच्या सुटय़ा लागल्या की दरवर्षी यापैकी अनेक विद्यार्थी आपापल्या गावी जातात. काही उशिरानं झालेल्या परीक्ष़ा किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास या कारणासाठी विद्यापीठाच्या वसतिगृहातच मुक्काम करतात. पण त्यांचं प्रमाण कमीच. 
मात्र हे सर्वसाधारण चित्र मागील काही वर्षापासून दुष्काळी परिस्थितीनं पार पालटून टाकलं. खेडय़ापाडय़ातल्या विद्याथ्र्यापुढे दुष्काळानं इतक्या अडचणी मांडल्या की कुठली अडचण मोठी याची टोटलच लागेना. त्यात पुन्हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, गावी जाऊन करायचं काय? दुष्काळानं पार भेगाळलेल्या गावात नी कोरडय़ाठाक वातावरणात गावच्या घरातले प्रश्न जास्त छळतात. त्यापेक्षा जे प्रश्न माहिती आहेत त्यावर उतारे शोधायला पाहिजे, उन्हानं जाळलेलं रान पाहण्यापेक्षा विद्यापीठाच्या परिसरात राहूनच काहीतरी करण्याचा प्रयत्न विद्यार्थी करताना दिसतात. 
या मुलांना काडीचा आणि आशेचाही आधार देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘कमवा आणि शिका’ ही योजना सुरू आहे. विद्यापीठ परिसरातच विद्याथ्र्याना काम देण्यात येते. ङोरॉक्स मशीन चालवणं, वृक्षारोपण, नर्सरी, ग्रंथालयात काम करणं, फाईली आणि पाकिटे तयार करणं, पुष्पगुच्छ तयार करणं यांसह विविध कामं विद्याथ्र्याकडून करवून घेतली जातात. दररोज किमान दोन तास या विद्याथ्र्याना काम करावं लागतं. त्यातून महिन्याकाठी विद्याथ्र्याला दीड हजार रुपयांच्या आसपास रक्कम मिळते. ही एवढीशी रक्कमही भर दुष्काळात मोठा दिलासा देते, असं काही मुलं सांगतातही.
 
काम करणा:या हातांची गर्दी
दुष्काळी परिस्थितीमुळे ‘कमवा आणि शिका’ योजनेत सहभागी होऊ इच्छिणा:या विद्याथ्र्याची गर्दीही वाढली. काम द्या म्हणणारे तरुण हात रांगा लावू लागले. दुष्काळानं कोलमडलेल्या मराठवाडय़ातील शेतक:यांची मुलं या गर्दीत संख्येनं जास्त. विद्यापीठ प्रशासनानेही दुष्काळी परिस्थितीचा विचार करून अधिकाधिक विद्याथ्र्याना या योजनेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला. 
विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुहास मोराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी साधारणत: तीनशे विद्यार्थी कमवा आणि शिका योजनेत सहभागी करून घेतले जातात. मात्र यंदाची परिस्थिती आणि  विद्याथ्र्याची गरज लक्षात घेऊन विद्यापीठाने पाचशे विद्याथ्र्याना या योजनेत सहभागी करून घेतले आहे. आणि आता ते या योजनेंतर्गत भर सुटीतही कामाला लागणार आहेत, काही आधीपासूनच या कामात आहेत.
खरंतर उच्च शिक्षण घेणा:या, संशोधन करणा:या विद्याथ्र्याना आपला शैक्षणिक आणि इतर खर्च भागविण्यासाठी अशी कामं करायला लागणं, पै-पैसाठी झगडणं हे किती त्रसदायक वाटत असेल; पण त्याचा काहीही बाऊ न करता, ही मुलं मिळेल ती संधी घेत दोन पैसे कमवू पाहत आहेत. आणि म्हणून त्यांना ‘कमवा आणि शिका’चाही आधार वाटतो आहे.  त्यातूनही पैसे साठवत काहीजण आपला वर्षभराचा शैक्षणिक खर्च भागवण्याच्या प्लॅनिंगला लागले आहेत.
विद्याथ्र्याचा महिन्याकाठी दोन वेळच्या जेवणाचा खर्च साधारणत: बाराशे ते पंधराशे रुपयांर्पयत जातो. हजारभर रुपयांचा त्याचा किरकोळ खर्च होतो. घराकडून आलेली मदत आणि विद्याथ्र्याने करून ठेवलेली बचत यांच्यामुळे अनेकांना दुष्काळी परिस्थितीतही शिक्षण चालू ठेवणं जमलंय. ते नसतं तर शिक्षण सोडण्याची वेळ त्यांच्यावरही आली असतीच!
एक हा आधार, बाकी बाहेर मिळालं तर छुटपूट काम या सा:याशी जुळवून घेत ही मुलं यंदाचा दुष्काळही निभावून नेत आहेत.
- नजीर शेख,  
मनेष शेळके
 
सुटी? - नाहीच!!
 
‘कमवा-शिका’ योजनेमध्ये विद्यापीठाच्या परिसरातच काम मिळत असल्याने तसेच वसतिगृहही मोफत मिळत असल्यानं शहरात काम शोधायची वेळ अनेक मुलांवर इथं सुदैवानं आलेली नाही. पण उन्हाळी सुटय़ांत घरी जाता आलं नाही, सुटी अशी नाहीच, अशी खंत मुलांशी बोलताना जाणवतेच.
  
 
 
निदान जेवणाची सोय
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन विद्यापीठाने नाशिकच्या बेजॉन देसाई फाउंडेशनमार्फत फेब्रुवारी महिन्यापासूनच 16क् विद्याथ्र्याची मोफत जेवणाची सोय केली आहे. नव्या शैक्षणिक वर्षात विद्यापीठ सुरू होईर्पयत ही मदत चालू राहील. याशिवाय विद्यापीठातील सुमारे सहाशे विद्याथ्र्याची शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दोनवेळच्या मोफत जेवणाची सोय केली आहे. विद्याथ्र्याना वसतिगृहात सकाळी आणि संध्याकाळी डबे पोहोचविले जातात. या योजनेमुळेही विद्याथ्र्याना गावाकडे जाण्यापासून रोखले आहे. पालकांवरील भारही अशा योजनांमुळे कमी झाला आहे. 
 
 
 
 
 
‘कमवा-शिका’ योजनेत वाढीव विद्यार्थी यंदा विद्यापीठानं घेतले आहेतच; शिवाय अतिशय गरजू विद्याथ्र्याची मोफत जेवणाची सोयही केली आहे. विद्यापीठ सदैव विद्याथ्र्यासोबत आहे, हीच यामागची भावना आहे.
 
 - डॉ. सुहास मोराळे
संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
 

 

Web Title: Do not want to learn, then do it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.