सोपं ते कर !
By admin | Published: April 27, 2017 05:40 PM2017-04-27T17:40:35+5:302017-04-27T17:40:35+5:30
जिंकायचं तर करायचं काय?
Next
-ऑक्सिजन टीम
दोन शिष्य असतात. दोन राज्यांचे राजकुमार. भविष्यातले राजे.
त्यांचे गुरु त्यांना एक प्रश्न विचारतात, समजा तुमच्यावर शत्रू चालून आला. लढाई समोर उभी ठाकलेली तर तुम्ही काय कराल?
दोन्ही शिष्य कर्तबगार, हुशार असतात. एकजण म्हणतो मी मागे हटायचा प्रश्नच नाही. मी पूर्ण ताकदीनं तयारीला वेग देईन आणि जिंकण्याचा पूर्ण प्रय} करील. आणि मी शत्रूला हरवेलच.
दुसरा शिष्य शांत असतो, तो म्हणतो, मी लढेन!
गुरुजी हसतात. आणि शिष्यांना म्हणतात हेच ते!
सोपं काय ते करा!
लढाई. त्यात सगळं आलं. ती पूर्ण ताकदीनेच लढायची.
तसंच बाकी कामांचं. ते काम पूर्ण करायचं. मात्र आपण अतीव जास्त परिश्रम करुन त्या कामाचं जास्त ओझं मानेवर घेतो. दमतो त्या ओझ्यानं, हरतोही त्या ओझ्यानं.
त्यामुळे असा प्रश्न आला की विचारा स्वतर्ला, सोपं काय?
उत्तर येईल ते पूर्ण करा.
प्रयत्न करू नका.