आला मेसेज की ढकल पुढे, कर फॉरवर्ड असं करता तुम्ही? पण खबरदार..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 04:14 PM2020-07-16T16:14:20+5:302020-07-16T16:16:43+5:30
मार फॉरवर्ड- असं प्रत्येकच मेसेजबाबत करणं धोक्याचं आहे.
-आवेझ काझी
कोणताही मेसेज मित्र-मैत्रिणींनी पाठवला किंवा एखाद्या ग्रुपवर पडला की तुम्ही काय करता?
अनेकदा तर वरवर वाचूनच लगेच ग्रुपमध्ये ढकलता. फॉरवर्ड मारता.
हे फॉरवर्ड मारणं इतकं वेगवान असतं की आपण जी माहिती पुढे पाठवतो आहे, ती खरी आहे की नाही, जी गोष्ट चार लोकांना सांगतोय ती खरंच तशी आहे का, याची खात्रीही करून घेणं अनेकांना गरजेचं वाटत नाही.
स्पर्धा असल्यासारखे तेच ते मेसेज लोक इकडून तिकडे ढलकत राहातात.
मात्र एखादा मेसेज त्याचा स्नेत, ख:याखोटय़ाची खात्री नसणं, गुगल किंवा इतर स्नेतांच्या माध्यमातून पडताळणी न करणं आणि आला मेसेज केला फॉरवर्ड म्हणून अनेकांना पाठवणं हे महागात पडू शकतं. तुमच्या अंगलट येऊ शकतं.
तुमच्यासह तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुप, मेसेंजर ग्रुपमधील इतर सदस्यांना त्रस होऊ शकतो. ग्रुपची विश्वासार्हता धोक्यात येऊन परिणामी एखादा गुन्हादेखील दाखल होऊ शकतो. कायदेशीर प्रकियेला सामोरे जाऊ लागू शकतं.
हे सारं टाळण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे कोणताही मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी विशेषत: सामाजिकदृष्टय़ा संवेदनशील विषयांवरचे मेसेज खातरजमा न करता अजिबात पुढे पाठवू नका. तुम्ही पाठवलेल्या फेक मेसेजविरोधात कोणी फिर्याद दाखल केली आणि तो मेसेज फेक आहे असं सिद्ध झालं तर माहिती तंत्रज्ञान कायदा किंवा भारतीय दंड संहितेतील विविध कलमान्वये तुम्ही शिक्षेसाठी पात्र ठरू शकता.
म्हणूनच कोणत्याही ग्रुपवरचा मेसेज, त्यातील मजकुराची खातरजमा, त्यात दिलेले मोबाइल नंबर, मॉर्फ केलेले फोटो हे सगळं बारकाईने पाहा. गरज नसेल तर ते फॉरवर्ड करणं टाळायला हवं. सगळ्यांना कुठून ना कुठून माहिती येते.
आपण नाही फॉरवर्ड केलं तर काही फार बिघडत नाही.
विशेषत: हल्ली कोविड महामारीच्या काळात गरजूंना मदत करा म्हणून फॉरवर्ड केलेल्या मॅसेजेसमध्ये, व्हिडिओमध्ये किंवा ऑडिओ क्लिप्समध्ये काही संपर्कक्रमांकही देण्यात येतात. हे नंबर जनतेची आर्थिक फसवणूक करण्याकरिता वापरले जात आहेत. असे मेसेज फॉरवर्ड करताना किंवा त्यावर रिअॅक्ट करताना खबरदारी घेणं गरजेचं आहे.
सोशल मीडिया अॅप्स, सोशल नेटवर्किगची काळी बाजू म्हणजे खोटय़ा बनावट माहितीचा, असंबद्ध माहिती, फेक न्यूज, बदनामीकारक मजकूर, धार्मिक भावना दुखावणारे व्हिडिओ, ऑडियो, मेसेजेस हे प्रचंड प्रमाणात आहेत.
त्यामुळे फॉरवर्ड करण्याची स्पर्धा न लावता सोशल मीडियावीरांनी थोडी काळजी घ्यायला हवी.
प्रत्येक मेसेज फॉरवर्ड करताना विवेक, विचारबुद्धीने निर्णय घेणं अत्यावश्यक आहे. कुणाच्या धार्मिक भावना दुखावणं, कोणा एखाद्या व्यक्ती,धर्म, महापुरु ष, प्रथा, भाषा किंवा समूहाबद्दल खोटी माहिती पसरवणं, तसे मेसेज फॉरवर्ड करणं गुन्हा आहे हे लक्षात ठेवा.
**
लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट्स केल्याप्रकरणी 530 विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून, 274 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.
( लेखक पोलीस उपनिरीक्षकअसून, सायबर गुन्हा अभ्यासक आहेत.)