तुम्ही जेवायला हॉटेलात जाता की रेस्टॉरण्टमध्ये?

By Admin | Published: June 8, 2017 12:01 PM2017-06-08T12:01:16+5:302017-06-08T12:01:16+5:30

तुम्ही जेवायला हॉटेलात जाता की रेस्टॉरण्टमध्ये? विचारा, यात काय फरक?

Do you go to the hotel to eat or go to the restaurant? | तुम्ही जेवायला हॉटेलात जाता की रेस्टॉरण्टमध्ये?

तुम्ही जेवायला हॉटेलात जाता की रेस्टॉरण्टमध्ये?

googlenewsNext

 - प्रज्ञा शिदोरे
कधी कधी एकाच अर्थाचे दोन शब्द असताना कुठला शब्द कुठे वापरायचा असा प्रश्न आपल्याला पडतो. 
पायात घालतो ते ‘शूज’ का ‘बूट’? 
प्रवासात आपण ‘लगेज’ नेतो का ‘बॅगेज’? तुमच्या अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील  differencebetween.com या साइटवर.
नावाप्रमाणेच या संकेतस्थळावर अनेक वेगवेगळ्या संज्ञांमधले फरक आणि अर्थ दिले आहेत. याच्यात बरेच विभाग आहेत.

Technology, Home, Science and Nature, Education, Public, Health, Business, People,Fashion या प्रत्येक विभागात वेगवेगळे उपविभाग आहेत. ज्यात त्या विषयातल्या वेगवेगळ्या संकल्पनांमध्ये काय फरक आहे ते सांगितलं आहे. तसेच एकाच अर्थाच्या दोन भिन्न शब्दांची ओळखसुद्धा दिली आहे. कुठला शब्द कुठे आणि केव्हा वापरावा हे दिलं आहे. संकेतस्थळाच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात दोन शब्द किंवा संकल्पना दिल्या तर त्यांच्यातला फरक सांगणाऱ्या लिंक्सची यादी येते. 
शब्द किंवा संकल्पनाच कशाला, अगदी सध्याच्या लेटेस्ट Apple iPad 3 आणि Galaxy Tab 8.9 यांच्यातला फरकसुद्धा कळू शकेल ! आणि तुम्हाला जर दोन संकल्पनांमध्ये एखादा फरक माहीत असेल तर तुम्हीसुद्धा त्याच्यावर आर्टिकल लिहू शकता.
जाता जाता एकच विचारते.. आपल्याला जेव्हा घरी जेवायचा कंटाळा येतो तेव्हा आपण कुठे जातो? हॉटेलमध्ये.. बरोबर? चूक ! आपण रेस्तोरण्टमध्ये जातो !
आता यात काय फरक? या साइटवर जाऊन पहा.. differencebetween.com

 

(pradnya.shidore@gmail.com)

 

Web Title: Do you go to the hotel to eat or go to the restaurant?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.