दिवाळी शॉपिंग ऑनलाइन करताय; पण....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 06:40 AM2019-10-24T06:40:00+5:302019-10-24T06:40:02+5:30

उत्सवाच्या काळात ऑनलाइन खरेदी करताना, डुप्लिकेट उत्पादनांपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी?

Doing Diwali Shopping Online; But .... | दिवाळी शॉपिंग ऑनलाइन करताय; पण....

दिवाळी शॉपिंग ऑनलाइन करताय; पण....

Next
ठळक मुद्दे उत्पादनाच्या फोटोंच्या मोहात पडण्याआधी......

- प्रसाद ताम्हनकर

उत्सवांच्या काळात अनेक ऑनलाइन पोर्टल्सतर्फे मोठय़ा प्रमाणावरती सेल आयोजित केले जातात आणि विविध उत्पादनांवरती भरघोस सूटदेखील देण्यात येते. मात्र आपण निवडलेली उत्पादन हे खात्रीशीर आहे का नाही याची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. सर्वात आधी हे उत्पादन कोणातर्फे विकले जात आहे आणि कोणातर्फे शिपिंग केले जात आहे याची नीट माहिती घ्यावी. बरेचदा ‘फुलफिल्ड’ असं बिरु द लावलेली उत्पादनं ही थर्ड पार्टी सेलर्सकडून तुमच्यापर्यंत पोहोचत असल्याचे, त्याबद्दल पूर्ण माहिती घेऊनच उत्पादनाची निवड करावी. उत्पादनाखाली असलेले रिव्ह्यूज नक्की वाचावे, मात्र त्यावरती लगेच विश्वास ठेवू नये. एखाद्या उत्पादनाबद्दल कौतुकच कौतुक करणारे आणि पाच पाच स्टारची रेटिंग देणारे रिव्ह्यूज हे उत्पादक किंवा सेलरकडून खोटय़ा खात्यांद्वारेदेखील टाकलेले असू शकतात. अशावेळी ‘फेकस्पॉट’सारखी ऑनलाइन टूल्स तुम्हाला खात्रीशीर रिव्ह्यूू ओळखण्यासाठी खूपच मदत करतात. उत्पादनाच्या फोटोंच्या मोहात पडण्याआधी, ते फोटो डाउनलोड करून घ्या, आणि गूगल रिव्हर्स इमेजेसच्या मदतीने ते भलत्याच कुठल्या वेबसाइटवरून उचलून तर टाकण्यात आलेलं नाही ना याची खात्री करा. आपण निवडलेल्या उत्पादनाची किंमत, त्याची रिटर्न पॉलिसी, त्याचे स्पेसिफिकेशन्स याची माहिती नीट वाचा आणि समजून घ्या. 
इंटरनेटवरती उपलब्ध असलेल्या इतरही ऑनलाइन पोर्टल्सची मदत घेऊन आपण निवडलेल्या उत्पादनाची इतर ठिकाणी असलेली किंमत, त्यातील मिळणार्‍या सुविधा याची तुलना करायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरेदी करताना वेबसाइटच्या सुरक्षेची पूर्ण खात्री करून घेऊनच आपली वैयक्तिक माहिती आणि डेबिट / क्र ेडिट कार्डची माहिती दाखल करा.

Web Title: Doing Diwali Shopping Online; But ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.