ज्युनिअर डॉक्टरांना जगणं नको करणारी छळ-छावणी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 04:01 PM2019-05-30T16:01:36+5:302019-05-30T16:04:26+5:30

एमडी/एमएसच्या पहिल्या वर्षाचे म्हणजे जेआर-वन! यांना 7-7 दिवस अंघोळ नाही, झोप आणि जेवणाची खात्री नाही! पहिलं वर्ष असल्यामुळे सगळी कामं याच पोरांच्या गळ्यात! त्यांना जेआर-टूवाले छळणार, जेआर-टूवाल्यांना थर्ड इअरची पोरं त्रास देणार आणि सगळ्याच निवासी डॉक्टरांच्या माना मुरगळायला लेक्चरर, असोसिएट् प्रोफेसर, विभागप्रमुख हे सगळे असतातच टपलेले! ही वरून खाली येणारी एक छळाची साखळी आहे!

Dr. Payal Tadavi suicide : intern doctors & harassment, what it killing? | ज्युनिअर डॉक्टरांना जगणं नको करणारी छळ-छावणी.

ज्युनिअर डॉक्टरांना जगणं नको करणारी छळ-छावणी.

Next
ठळक मुद्देशिकाऊ डॉक्टरांना छळणारी उच्च शिक्षणातली अधिकारांची उतरंड कशी चालते?

डॉ. प्रतीक सुराणा
प्रोजेक्ट असोसिएट, निर्माण, सर्च, गडचिरोली.

भाई JR1  को तो 7 दिन बिना नहाये निकलना पडता है!

ये OBGY की फस्ट इअर की ज्युनिअर सब गलंग है।

रोज 3 घंटा भी मुश्किल से निंद होती है यार, इमर्जन्सी डय़ूटीके दिन उसके बाद ओटीमे निंद लगती है। खाना भी नही खा सकते । जेआर 2, जेआर 3 की झाप खानी पडती है।

फ्रस्ट्रेट हो गये है यार जिंदगी से, काम करने के बाद भी डांट ही मिलती है, जिंदगी झन्ट हो गयी है यार, बहोत फ्रस्ट्रेशन है यहा पे, वोह मेरा सिनियर बहोत कमीना है.
***
ही वाक्य वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नेहमीच वापरली जातात.
या वाक्यांच्या मागे मनाच्या खोलामध्ये लपलेलं नैराश्य, उदासीनता, न्यूनगंड आणि गुलामीची भावना असते.
वैद्यकीय शिक्षणाची साडेचार र्वष, नंतर एक वर्षाची अंतरवासीता आणि एक वर्ष वैद्यकीय अधिकारी म्हणून केलेले काम या माझ्या एकूण साडेसहा वर्षाच्या वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवातून एक विचार मी चांगल्या प्रकारे समजू शकलो आहे आणि तो म्हणजे..
आजच्या वैद्यकीय क्षेत्रात मुख्यतर्‍ दोन विचारसरणीचे लोक आढळतात - 
पहिले ज्यांना स्वतर्‍ला गुलाम म्हणून वागवून घ्यायचंय आणि दुसरे, ज्यांना समोरच्या व्यक्तीला गुलाम म्हणून वागवायचंय. 
या आजच्या वैद्यकीय क्षेत्रात असल्याच विचारधारेचे जास्तीत जास्त लोक मुख्य प्रवाहात आढळतात. याला कुठलंच लिंग, जात आणि शैक्षणिक पात्रता अपवाद नाहीय.
‘सर-मॅडम’ हे नुसते शब्द राहिलेले नाहीत, तर याला आता एका विशिष्ट प्रकारचा उच्च-निच्चतेचा ठपका बनवला गेलाय.
आज वैद्यकीय क्षेत्र हे हायरारकीच्या अहंकाराच्या जाळ्यात अडकलेलं आहे.
काय आहे ही हायरारकी?
वैद्यकीय शिक्षण घेताना, विद्याथ्र्याच्या मनात एक उच्च-निच्चतेचा विचार हळुवारपणे मात्र मोठय़ा प्रमाणात रुजवला जातो. सुपर स्पेशालिस्ट कसे मोठे आणि महत्त्वाचे त्यांच्यापेक्षा स्पेशालिस्ट कसे दुय्यम आणि कमी महत्त्वाचे. स्पेशालिस्टपेक्षा जनरल प्रॅक्टिशनर आणि एमबीबीएस हे दुय्यम आणि कमी महत्त्वाचे. एमबीबीएसपेक्षा बीडीएस, बीएएमएस आणि इतर पॅथीवाले कसे दुय्यम आणि कमी महत्त्वाचे. नर्सिग आणि इतर शिक्षण घेतलेले कसे दुय्यम आणि कमी महत्त्वाचे अशा प्रकारचा विचार विद्यार्थी अवस्थेत रु जवला जातो.
वैद्यकीय क्षेत्रातील आपल्याच सहकर्‍यांना हायरारकीच्या दृष्टीतून कसं बघायचं हा विचार आम केला आहे. त्यामुळेच सिनिअर - ज्युनिअर हे नातं प्रेमाचं आणि  सहकार्याचं न राहता ते अहंकार आणि गुलामीचं बनतं.
आदर आणि यामध्ये खूप फरक आहे.
अहंकार आणि गुलामीच्या भावनेमुळे आदर नाहीसा होतो, भीती मात्र खोल वर रु जत जाते.

उदाहरण 1.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर अंतरवासीता (इण्र्टनशिप) करत असलेल्या या भावी आणि तरु ण डॉक्टरांना रु ग्णालयात बहुतांश वेळेस निवासी डॉक्टर त्यांची खासगी कामे (एटीएममधून पैसे काढणं, नास्ता आणि जेवणाचा टिफीन आणणं, बँकेतील कामं) करायला लावतात. 
या इण्टर्न डॉक्टरला फाईल एका विभागातून दुसर्‍या विभागात घेऊन जाणं, रक्ताचे नमुने तपासणीला घेऊन जाणं आणि त्याचे रिपोर्ट घेऊन येणं अशा प्रकारची कामं करून घेतली जातात, जी त्यांनी करायची नसून रुग्णालयातील मामा आणि मावशीला करायची असतात. 
या अशा वातावरणात कित्येकतरी तरु ण, होतकरू आणि भावी डॉक्टरांच्या स्वप्नांचा बळी पडतो.
त्यांच्या पदरी काय पडतं?
नैराश्य आणि उदासीनता.
हे सगळं बदलायचं असेल तर सोपं आहे, माणसाला माणसाप्रमाणे वागणूक द्या!

उदाहरण 2

आता आपण याच निवासी डॉक्टरांची म्हणजेच एमडी/ एमएसचं शिक्षण घेणार्‍यांची अवस्था बघूया.
पहिलं वर्ष (जेआर1) म्हणजे एक वाईट स्वप्न वास्तवात जगणं आहे.
जेआर1 म्हणजे 7-7 दिवस अंघोळ नाही, झोप आणि जेवणाची ना ठरावीक वेळ ना खात्री. पहिलं वर्ष असल्यामुळे सर्व कामं त्यानंच करायची. जेआर टू आणि जेआर थ्री (सिनिअर निवासी डॉक्टर्स) तुलनेने आरामदायी आणि मजेशीर वातावरणात असतात.
का?? तर उत्तर मिळतं, आम्ही नाही केलं का पहिल्या वर्षी काम? मग यांनीसुद्धा करायलाच पाहिजे.
ज्युनिअरच्या पदरी काय पडतं?
नैराश्य आणि उदासीनता.
हे सगळं बदलायचं असेल तर सोपं आहे, माणसाला माणसाप्रमाणे वागणूक द्या!

उदाहरण 3
या सर्वच निवासी डॉक्टरांना त्यांच्यापेक्षा सिनिअर असलेले डॉक्टर (लेक्चरर, असोसिएट् प्रोफेसर, विभागप्रमुख)कसे वागवतात??
बर्‍याच वैद्यकीय रुग्णालयांमध्ये हे सिनिअर डॉक्टर्स निवासी डॉक्टरांचा त्यांच्या खासगी नोकरप्रमाणे वापर करतात. कसा?
घरचं वीजबिल भरणं, बँकेतील खासगी कामं, घरची कामं करून घेणं इत्यादी.
मार्केटमध्ये अमुक नवीन चारचाकी गाडी आली आहे, दुचाकी आली आहे, नवीन मोबाइल नवीन फ्रीज आला आहे, माझ्या मुलाचा/मुलीचा वाढदिवस आहे आणि तिला अमुक गोष्ट आवडते अशा प्रकारचं संभाषण जेव्हा सिनिअर डॉक्टर जेव्हा निवासी डॉक्टर सोबत करतात त्याचा अर्थ स्पष्ट असतो की, पुढच्या दोन आठवडय़ात ती वस्तू आपल्या सिनिअरच्या घरी पोहचलीच पाहिजे. का?
नाही तर निवासी डॉक्टरांचा मानसिक छळ होणार, त्यांना जास्तीची कामं लावली जाणार, तीन वर्षाच्या अखेरीस होणार्‍या परीक्षेत त्यांना नापास केले जाणार, रु ग्णांसमोर निवासी डॉक्टरांना झापणं आणि शिवीगाळ करणं.
या भीतीपोटी निवासी डॉक्टरांचा छळ केला जातो.
***
हे सर्व इतक्या उघडपणे होतं आणि या सर्वांची वैद्यकीय क्षेत्राला इतकी सवय झाली आहे की, हे सगळं सर्वांना ‘नॉर्मल’ वाटायला लागतं. 
दुसर्‍याचा छळ केल्यानं, हीन दर्जाची वागणूक दिल्यानं तोसुद्धा पुढील वर्षात अशीच गुलामगिरीची वागणूक त्याच्या ज्युनिअरला देतो, त्याचा मानसिक ताण वाढतो. त्याचा विकास खुंटतो. त्याच्या मनात न्यूनगंड तयार होतो.
हे मान्य करायला आपण तयार आहोत का?
माझ्यासोबत जे झालं ते चुकीचं होतं, मला मिळालेली वागणूक खालच्या दर्जाची आणि हीन होती.
हे मान्य करायला आपण तयार आहोत का?
जर याचं उत्तर खरंच ‘हो’ असेल तर ही आपली जबाबदारी आहे की आपण आपल्या पुढच्या बॅचच्या मुलांना प्रेमळ, भीती मुक्त वातावरण द्यावं.
हे सगळं सोपं आहे, जमू शकतं, फक्त माणसाला माणसा प्रमाणे वागणूक द्या!



 

Web Title: Dr. Payal Tadavi suicide : intern doctors & harassment, what it killing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.