अवकाळी पावसाने दाणादाण!

By Admin | Published: March 17, 2017 03:10 AM2017-03-17T03:10:58+5:302017-03-17T03:10:58+5:30

बाश्रीटाकळी, पातूर तालुक्यात रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान; वादळाने टिनपत्रे उडाले

Drought! | अवकाळी पावसाने दाणादाण!

अवकाळी पावसाने दाणादाण!

अकोला, दि. १६- गुरुवारी दुपारी अचानक वादळी वार्‍यासह पावसाच्या सरी कोसळल्याने, शेतकर्‍यांची ट्रॉलीमधील आणि बाजार समितीमधील व्यापार्‍यांकडे मापासाठी पडून असलेली हजारो क्विंटल तूर, हरभरा झाकण्यासाठी एकच धावपळ उडाली होती; परंतु तुरळक पाऊस आल्यामुळे शेतकर्‍यांच्या मालाचे नुकसान झाले नाही. येत्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असल्याने, शेतकर्‍यांनी ताडपत्री आणून गुरुवारीच आपला माल व्यवस्थित झाकून घेतला आणि शेतमालाचे नुकसान होणार नाही, या दृष्टिकोनातून योग्य खबरदारी घेतली. बाजार समितीनेसुद्धा शेतकर्‍यांना माल झाकून ठेवण्यासाठी सूचना दिल्या आहेत. पातूर तालुक्यात गुरुवारी दुपारी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे रब्बी पिकांना चांगलाच तडाखा बसला. तालुक्यातील काही गावांत गारपिटीने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यात आगीखेड, खामखेड, भंडारज, हिंगणा, शिर्ला, कोठारी बु., खानापूर, आस्टुल, पास्टुल, चेलका, पार्डी, तांदळी व सस्ती या भागात मोठय़ा प्रमाणात गारपीट झाल्याने जवळपास ५0 टक्के पिके नष्ट झाली आहेत. या गावासोबतच आलेगाव, बाभूळगाव, देऊळगाव, चान्नी, मळसूर, उमरा आदी गावांमध्ये झालेल्या जोरदार पावसाने पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील तांदळी येथे घरे कोसळली, तर काहींची टिनपत्रे उडाली. बाश्रीटाकळी तालुक्यात रिमझिम पाऊस झाला. या पावसामुळे नाफेडच्या खरेदी केंद्रावरून शेतकर्‍यांनी आणलेली तूर परत नेली. तालुक्यात चोहोगाव, धाबा, चिंचोली रुद्रायणी, लोहगड, सायखेड व कोथळी खुर्द येथे गारपीट झाली, तर महान, पुनोती, मांगुळ, मिर्झापूर, निंबी चेलका, सुकळी, राजनखेड, जामवसू आदी गावांमध्ये वादळासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक नुकसान चोहोगाव शिवारात झाले. धाबा येथील मुख्य चौकात असलेल्या झाडावर वीज कोसळली. सुदैवाने तेथे कुणीही नसल्याने मोठा अपघात टळला. तालुक्यात ज्या ठिकाणी गारपीट व पाउस झाला तेथे वीजपुरवठा खंडीत झाला. तालुक्यात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेले असतानाही महसूल विभागाचे कर्मचारी उशीरा नुकसानग्रस्त भागात पोहचले. नायब तहसीलदार अतुल पाटोळे व मंडळ अधिकारी सुनिल राठोड यांनी नुकसानग्रस्त भागातील तलाठय़ांना पंचनामा करण्याचे आदेश दिले. अधिकार्‍यांची मनमानी, पदाधिकारी बिथरले! जिल्हा परिषद : स्थायी समितीच्या बैठकीत वाचला अनियमिततेचा पाढा अकोला, दि. १६- जी कामे करता येत नाहीत, असे सांगत जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांची बोळवण केली जाते, तीच कामे अधिकारी बिनदिक्कतपणे करतात. त्यातून पदाधिकार्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे. अधिकार्‍यांकडून केवळ समित्या नेमल्या जातात, पुढे काहीच होत नाही. त्या उदाहरणांचा पाढाच वाचत स्थायीच्या सभेत गुरुवारी पदाधिकारी अधिकार्‍यांवर बिथरले. अर्थ व शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांनी आमच्या पदाला काहीच किंमत नसल्याचेही उद्विग्नपणे म्हटले. बैठकीच्या सुरुवातीपासूनच अर्थ व शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट, जिल्हा परिषद सदस्य विजय लव्हाळे, चंद्रशेखर पांडे गुरुजी, गोपाल कोल्हे, शोभा शेळके यांनी अधिकार्‍यांनी केलेले विविध प्रताप मांडले. त्यावर जिल्हा परिषदेच्या विविध सभांमध्ये घेतलेले ठराव, आदेशानुसार पुढे काहीच होत नसल्याची वस्तुस्थिती मांडली. त्यामध्ये शिक्षण विभागात जातवैधता नसलेल्या १३२ पेक्षाही अधिक शिक्षकांवर बडतर्फीच्या कारवाईबाबत निर्देश दिल्यानंतरही काहीच झाले नाही. त्यामुळे आता या कारवाईची अंतिम तारीख ठरविण्याचा मुद्दा सदस्यांसह सभापती अरबट यांनी लावून धरला. त्यावर १५ एप्रिलपर्यंत निश्‍चित कारवाई करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विधळे यांनी सांगितले. १४ शिक्षकांच्या बदल्यांमध्ये बाश्रीटाकळी पंचायत समितीमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडून केली जाईल, त्यामध्ये दोषी आढळणार्‍यांवरही कारवाई केली जाईल, असे विधळे यांनी सांगितले. बैठकीला उपाध्यक्ष जमिरउल्लाखा पठाण, सभापती पुंडलिकराव अरबट, रेखा अंभोरे, देवका पातोंड, माधुरी गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. पोषण आहाराच्या माहितीसाठी सदस्यांची कोंडी अंगणवाडीमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवठा केला जातो. त्याची माहिती गेल्या चार महिन्यांपासून महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनकुसरे, प्रभारी समाधान राठोड यांना मागितली; मात्र ती देण्यास टाळाटाळ केली जाते. एकदा ती माहिती देण्याचा आव आणत कागदपत्रांचा गठ्ठाच सदस्य शोभा शेळके यांच्याकडे देण्यात आला. त्यातून ठळक मुद्दय़ांची माहिती न देता सदस्यांची कोंडी केली जात असल्याचेही सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. अकोटचा प्रभार डॉ. मिश्रांकडेच! अकोट पंचायत समितीमधील पशुधन विस्तार अधिकारी पदाचा प्रभार तेल्हारा येथील डॉ. मिश्रा यांच्याकडेच ठेवण्यात प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गोळे यांना प्रचंड इंटरेस्ट आहे, आमदार, सभापती, सदस्यांच्या पत्राला आणि मागणीलाही ते जुमानत नाहीत, असा सूर सभापती अरबट यांच्यासह गोपाल कोल्हे, विजयकुमार लव्हाळे यांनी काढला. कायद्याची आड घेत पदाधिकार्‍यांची दिशाभूल करू नका, अनेक नियमबाहय़ कामे करताना कायदा कुठे असतो? स्वत:च्या अवैध नोंदणीचा विचार करा, असेही कोल्हे म्हणाले.

Web Title: Drought!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.