...आलाच ना रानात? लॉकडाऊनच्या काळात, गावच्या उन्हातली गोष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 03:54 PM2020-06-11T15:54:16+5:302020-06-11T18:11:14+5:30
अनलॉकिंग सुरू झालं. गावी आलेले तरुणपण शहरांत निघाले मात्र काय केलं त्यांनी या उन्हाळ्यात गावात? ज्यांची शेती होती ते मायबापासह रानात कामाला गेले, ज्यांची नव्हती त्यातले काही मजुरीला गेले, काही मजुरीला जायलाही तयार झाले; पण मायबाप म्हणाले, नको गावचे म्हणतील, शिकून बी तेच करीतो! आणि उरलेल्या काहींनी दिवसाला नुसते नेटपॅकही जाळले. पण...
- श्रेणीक नरदे
आधी कोरोना आल्याची चर्चा, मग मार्च महिन्यात लॉकडाऊनची घोषणा झाली.
गावापासून लांब मोठय़ा शहरात किंवा परराज्यात कामानिमित्त गेलेल्या कित्येक माणसांनी, त्यातही तरुणांनी वेगवेगळ्या संकटांवर मात करत, वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालून आपापली गावं गाठली.
गावी जायचं हेच मनात होतं, आपलं घर म्हणून हक्कानं माणसं परतही आली. सुरुवातीला ज्या पद्धतीचं गांभीर्य या आजाराबद्दल होतं ते पाहता, यांना होम क्वॉरंटाइन किंवा मराठी शाळेत चौदा दिवस क्वॉरंटाइन रहावं लागलं. आणि त्यानंतर त्यांनी घर गाठलं. काही हे सारं सुरूहोण्यापूर्वीच घरी परतले होते. ते घरीच होते.
जे नोकरी करत होते, त्यातही ज्यांना कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम मिळालं त्यांचं काम सुरूझालं. ते गावी राहूनही आपापलं रूटीन काम करतच होते.
पण ज्यांना वर्कच नाही त्यांचं मात्न अवघड झालं.
आधी गावीच असलेल्या आणि गावाकडे आलेल्या त्या तरुणांचं काय झालं? सगळ्यांचं झालं असं नाही; पण ब:यापैकी जणांचं काय झालं?
गतवर्षी राज्यभरात झालेल्या दमदार पावसामुळे यावर्षी विहिरी, बोअरवेलला पाणी चांगलंच टिकून असल्याने शेतंही या उन्हाळ्यात हिरवीगार होती म्हणजेच पीकपाणी चांगलं होतं.
शहरांतून आलेला हा तरुण मग वर्ग काय करायचा?
ज्यांना शेती आहे त्यांनी शेतात काम करणं साहजिक होतं. मात्न जिल्हाबंदी आणि इतर अनेक बंधनांमुळे म्हणावा एवढा शेतमालही तेजीत नव्हता. शेतमालाला तेजी नसल्याने दरवर्षी जे पिकावर नांगर फिरवणं किंवा चालू पीक उपटून टाकणं हा प्रकार यंदा फार कमी झाला आणि जो भाव मिळेल तो मिळेल किंबहुना आपली मजुरी मिळाली एवढा जरी फायदा झाला तरी चालेल. ही आशा ठेवून शेतमाल व्यापा:यांकरवी शहरात गेला. परिणामी भाव कोसळले. मात्न फुल नाही फुलाची पाकळी मिळल्याचं समाधान ठेवत शेतकरी हे काम करतोच आहे.
आजच्या दिवसात तसंही ग्रामीण भागात डोळ्याला पैसा दिसणं हीच मोठ्ठी गोष्ट आहे. या शेतीच्या उलाढालीतून थोडाफार पैसा मिळवता येतो. ज्यांच्याकडे स्वत:ची शेती आहे त्या तरुण पोरांना शेती करण्यात कसलीच अडचण नव्हती. त्यांनी सरळ घरच्या माणसांसोबत शेत गाठलं आणि शेतात काम करू लागले.
काही तरुण नाही म्हणायला शहरात मोठमोठय़ा ऑफिसात काम करणारे होते. त्यांना शेतात जाणं थोडं खटकू लागलं म्हणा किंवा एक समाजाचा दबाव असतो शेवटी आलाच ना रानात? हे थोडं त्यांना दमवू लागलं.
त्यामुळे काही इच्छा असून, रानात गेले नाहीत, काही जाऊ शकले नाहीत.
त्यामुळे वेळ घालवायचा म्हणून काहींनी नेट पॅक संपवायचंच मनावर घेतलं. काहींना मात्र शेतात, कामाधामाला जायचंच होतं. पण घरचे नाही म्हणू लागले.
आता काहींच्या घरच्यांचा विरोध असा होता की, तू कशाला रानात येतो? ते नाही म्हणू लागले कारण तो त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता.
शिक्षण देऊन पोरं शहरात गेली आणि परत शेतात आली असं व्हायला नको, अशी काहीशी मानसिकता होती. त्यामुळे या वर्गातले तरुण काही शेताकडे फिरकण्याचा संबंध आला नाही.
पण थोडं पुढं जाऊन विचार केला तर ज्याच्याकडे शेतच नाही त्यानं काय करावं? दुनिया फिरून परत गावी येऊन दुस:याच्या शेतात मजुरी करणो हे प्रतिष्ठेला शोभण्याजोगं नसल्याने त्यांनीही घरातच राहणं पसंत केलं. काहींना तर गावात येऊनही काम करत राहण्यास प्रतिष्ठा आडवी आली काहींना कमीपणा वाटला.
पण काही तसे वस्ताद त्यांनी बाकीच्या इतर सर्वाना फाटय़ावर मारून मातीत कामं केलीच. उरलेसुरले गायीगुरांकडे जाणारे, त्यातले काही राबले. काहींनी नेटपॅक जाळले.
पण कुणाहीसाठी हा लॉकडाऊनचा काळ हा शहरातून ग्रामीण भागात येणा:यांसाठी सुसह्य नव्हताच तसा. एरव्ही कुणी परगावाहून आला तरी तोंडदेखलं स्वागत करण्याचा प्रकार तरी होता मात्न आता कोरोनाच्या निमित्ताने गावकीच्या भावकीच्या भांडणाचं स्वरूप परत एकदा मजबूत होत होतं.
एक व्हॉट्सअॅप फॉरवर्ड मेसेज व्हायरल होत होता.
आधी : बंबई से आया मेरा दोस्त, दोस्तको सलाम करो !
कोरोनानंतर : बंबईसे आया मेरा दोस्त, सरपंच को फोन करो !
हे मेसेज गावच्या तरुण पोरांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्येही खूप फिरले.
काहींनी मग गावच्या वेशीवर खणलेले चर, किंवा काटेकुटे टाकले. ही कृती का झाली ती विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
कधी नव्हे ते या लॉकडाऊनमध्ये शहरी विरुद्ध ग्रामीण भागचा संघर्ष या काळात ठसठशीतपणो दिसून आला. आता लॉकडाऊन हळूहळू शिथिल होतंय तसंच कोरोनाचं गांभीर्य कमी होतंय. गावाहून परत शहराकडे लोक मार्गस्थ होत आहेत. पण येणारे दिवस वेगळे असणार आहेत.
लॉकडाऊनमध्ये गावाकडे हक्काने आलेली पाऊलं पुन्हा शहरांतल्या घरांकडे निघाली.
मात्न दोनही भाग एकमेकावर अवलंबून आहेत हे मान्य होतं. आहेच. येणा:या काळात अशी संकट येतील न येतील मात्न एक बाब नक्की.
ती म्हणजे खेडय़ापाडय़ात हाताला काम असणं हे किती महत्त्वाचं आहे याची जाणीव शहराभोवती केंद्रित होणा:या उद्योगांना आणि माणसांना, शहरी जगण्याला व्हावी लागेल. व्हायला हवी.
गावाडकचं उन्हाळी जगणं यंदा जगून पाहिलं अनेकांनी, त्या झळा लक्षात राहिल्या म्हणजे झालं.