मार्कांआधी कमवा स्कील
By admin | Published: May 14, 2014 02:14 PM2014-05-14T14:14:05+5:302014-05-14T14:14:05+5:30
तुम्ही नोकरी शोधण्याआधी नोकरीनेच तुम्हाला शोधत यावं, असं वाटतंय? तर घ्या एक स्मार्ट डिसिजन!
Next
दहावी-बारावीत आपला काय निक्काल लागणार, या भीतीने पोटात बाकबुक होणार्या मुला-मुलींसाठी आणि पुस्तकी अभ्यासात जरा मंदच असलेल्या प्रत्येकासाठी
२0२२ सालापर्यंत आपल्या देशात टप्प्याटप्प्याने तयार होतील
५0,00,00,000 कौशल्याधारित रोजगाराच्या संधी. - म्हणजेच skillbased Jobs
यातली एखादी संधी आपल्या वाट्याला यावी, असं वाटत असेल, तर तुम्ही पोत्यांनी मार्कं मिळवण्यासाठी रट्टा मारण्याची नव्हे, तर उद्यासाठी आज एक स्मार्ट डिसिजन घेण्याची
गरज आहे.
समजा, आम्ही म्हटलं, की आवाक्याबाहेरच्या इंजिनियरिंगसाठी आज धापा टाकून उद्या नोकरी शोधत हिंडण्याऐवजी वेल्डर, प्लंबर किंवा क्रेन ऑपरेटर होण्याची अँम्बिशन ठेवलीत, तर पुढच्या
पाच-सात वर्षात मस्त कमाईची लॉटरी लागेल, तर विश्वास ठेवाल तुम्ही?
डी.एड.-बी.एड.ची शिडी चढून गावाबाहेर सटकण्याच्या फ्रस्टेटिंग धडपडीत माती खाण्याऐवजी
टेलरिंगच्या कोर्समध्ये इंव्हेस्टमेंट केलीत, तर काम तुम्हाला शोधत थेट गावात येईल, असं म्हटलं तर?
- हे सगळं असंच होईल, हे ’’ऑक्सिजन’’चा नव्हे, भारत सरकारच्या अर्थमंत्रालयाचा अभ्यास सांगतो.
वेल्डर्स, सुतार, इलेक्ट्रिशियन, टेलर्स, मशीन ऑपरेटर्स आणि यासारखी कौशल्याधारीत कामं हे सगळे येत्या दशकातले हॉट जॉब्ज असणार आहेत. आणि ते फक्त मार्कंवाल्यांना नव्हे,
हातात स्कील आणि डोक्यात हुनर असणार्यांनाच मिळतील.
त्याच्यात तुम्ही असणार का, हे ठरवायला तुम्हाला मदत व्हावी, म्हणून हा स्पेशल अंक!