इको-फ्रेण्डली कपडे, फॅशनच्या दुनियेतला हा नवा  ट्रेंड काय म्हणतोय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 03:23 PM2020-06-11T15:23:31+5:302020-06-11T15:37:49+5:30

कपाटात कपडय़ांचा ढीग आणि घालायला कपडे नाहीत, अशी अवस्था तशी नवी नाही; पण आता खिशाची ताकद कमी झालेलीच आहे तर जरा आपल्या कपडय़ांनाही शिस्त लावू.

eco-friendly clothing , try this in post corona world | इको-फ्रेण्डली कपडे, फॅशनच्या दुनियेतला हा नवा  ट्रेंड काय म्हणतोय ?

इको-फ्रेण्डली कपडे, फॅशनच्या दुनियेतला हा नवा  ट्रेंड काय म्हणतोय ?

Next
ठळक मुद्देकपडय़ांचा ढीगही पर्यावरणाला घातकच आहे.

- भाग्यश्री मुळे

कोरोनाने तसं म्हणायला आपल्याला भानावरच आणलं.
पर्यावरणाची यानिमित्तानं चर्चा झाली. सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये आपलंच कपाट आवरताना अनेकांना समजलं की, केवढे कपडे घेतो आपण? याची खरंच काही गरज होती का?
अनेकांनी ठरवलं की आपली जीवनशैली पर्यावरणस्नेही करण्यावाचून पर्याय उरलेला नाही.
त्याचं अजून एक कारण म्हणजे खिसा रिकामा. आता अनेकांकडे फार पैसेही उरले नाहीत, दरमहा जास्तीचे खर्च करायला.
  आताच पाहा ना, पर्यावरणाने दणका दिलाच आहे. व्हायरसने जगभरातल्या माणसांना पळायला पृथ्वी शिल्लक ठेवली नाही.
आता तर चर्चा अशीही आहे की जागतिक कार्बन उत्सर्जनास अतिरेकी फॅशनही जबाबदार आहे.
अतिरिक्त कपडे, सौंदर्यप्रसाधनं वापरणं, ती पाण्यात सोडणंही घातक आहे.
फॅशन जगतातील आपल्या आवडीनिवडी क्लायमेट चेंजला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे आता आपण भारंभार कपडे घ्यायचे की नाही याचाही विचार करायला हवा.
आपण आपल्या कपडय़ांबाबत पुनर्वापर, जुन्यापासून नवे आणि  दीर्घकाळ वापरणं अशा सूत्रंचा अंगीकार करायला हवा.
त्यासाठी काही खास अशा गोष्टी आपण करू शकतो. 


1. सर्वप्रथम ठरवावं की कपडय़ांची खरेदी खरंच गरजेची आहे का?
2. आपल्याकडे नसली तरी परदेशात व्हिंटेज दुकानं असतात. त्यामुळे अगदी खरेदी करायची झाली तर तिथूनही करता येईल.
3. कपडे पुरवून, नीट धुऊन वापरता येतील. साठवण्याची गरज नाही.
4. तसेही आता अवस्था अशी आहे की कपाटातील कपडे इंच इंच जागेसाठी भांडू लागले आहेत. 
5. तो कपडा घालेर्पयत ती फॅशन  निघून जाऊन दुसरी फॅशन तिची जागा घेत आहे. त्यामुळे आउट ऑफ फॅशनच्या कपडय़ांचे ढीग दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. 
6. कापडाचा कचराही वाढत आहे.
7. त्यामुळे फॅशन, ट्रेण्डप्रमाणो कपडे न घेता आपल्या बजेटनुसार, दीर्घकाळ टिकणारे, साधे कपडे खरेदी करण्यावर आपण भर दिला पाहिजे.
8. आपल्याला नको असलेले कपडे उत्तमरीतीत असतील तेव्हाच मित्रंना, गरजूंना देऊन टाकणं. 
9. तुम्ही तुमचे कपाट पर्यावरणस्नेही करू शकता. शिवाय यामुळे नकळत आर्थिक बचतही झालेली असेल. 
10. आणखी एक पर्याय म्हणजे कपडय़ांचा पुनर्वापर. आपल्या घरातील जुन्या कपडय़ांपासून कुशन कव्हर, पायपुसणो, दुपटे, बस्कर अशा अगणित वस्तू तयार करता येतीलच.
11. आपल्या जुन्या कपडय़ांपासून थोडे कौशल्य वापरून नवीन कपडे तयार करू शकतो. पांढ:या शर्टवर तुम्ही भरतकाम, रंगकाम करू शकता, रंगीत कपडय़ांचे तुकडे वापरून नक्षी तयार करू शकता. 
12. आई किंवा आजीची भरजरी साडी घेऊन तुम्ही टोप, ड्रेस तयार करू शकता. पैसेही वाचतील, आणि मायेचं कापडही सोबत असेल.


( भाग्यश्री मुक्त पत्रकार आहे.)
 

Web Title: eco-friendly clothing , try this in post corona world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.