एकाकी आजी-आजोबांची काळजी हेच करिअर होऊ शकतं!- खरं नाही वाटत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:51 PM2019-06-06T12:51:51+5:302019-06-06T12:52:01+5:30

वृद्धांची काळजी आणि देखभाल ही आता नवीन रोजगार संधीच नाही, तर स्वतंत्र व्यवसाय संधी होऊ शकते! तरुणांची संख्या कमी आणि ज्येष्ठांची जास्त अशी समस्या घेऊन जगणार्‍या काळात ही समस्या तरुण हातांना रोजगार देऊ शकते.

emerging careers in India- elder or senior care, new job opportunity | एकाकी आजी-आजोबांची काळजी हेच करिअर होऊ शकतं!- खरं नाही वाटत?

एकाकी आजी-आजोबांची काळजी हेच करिअर होऊ शकतं!- खरं नाही वाटत?

Next
ठळक मुद्देएकाकी आजी-आजोबांची काळजी हेच करिअर

अतुल कहाते 

अनेक देशांमध्ये आता वृद्ध लोकांच्या शारीरिक आणि मानसिक समस्या कशा हाताळायच्या, हा एक मोठा प्रश्न बनत चालला आहे. काहीअंशी भारतामध्येही हे चित्र  आढळत आहेच; पण जर्मनी किंवा जपान यासारख्या देशांमध्ये तर या प्रश्नानं जवळपास गंभीर स्वरूप धारण केलं आहे. यामधला महत्त्वाचा भाग म्हणजे या देशांमधला प्रश्न आर्थिक कारणांमुळे निर्माण झालेला नाही. तिथं आर्थिक पातळीवर बर्‍यापैकी समृद्धी आहे. आपलं निवृत्तीपश्चात आयुष्य जगण्यासाठी त्यांच्याकडे पैशांची कमतरता नाही. मात्र मुळात लोकसंख्यावाढीचा वेग कमी असल्यामुळे तिथल्या वृद्ध लोकांचं प्रमाण वाढलं आहे. त्या तुलनेनं तिथं तरुणांचं प्रमाण खूप कमी होत चाललं आहे. यामुळे वृद्ध लोक एकाकी झाले आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी मनुष्यबळ नाही. प्रशिक्षित मनुष्यबळ तर अजिबातच नाही. त्यामुळे वृद्धांचे आरोग्याचे आणि एकटेपणाचे, देखभालीचे प्रश्न वाढत चालले आहेत. 
हे सगळं परदेशातच घडतंय असं काही नाही. भारतामध्येही अनेक मोठय़ा शहरांमध्ये अशा प्रकारची परिस्थिती येऊ घातली आहे.
या पाश्र्वभूमीवर वृद्ध लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणार्‍या प्रशिक्षित 
तरु णाईची गरज मोठय़ा प्रमाणावर भासणार आहे. पुण्या-मुंबईसारख्या गावांमध्ये आत्ताच त्याची काही उदाहरणं सहजपणे सापडतात. मुलं-मुली परदेशी किंवा दुसर्‍या गावात राहात असल्यामुळे किंवा काहीवेळा तर त्याच गावात राहात असूनसुद्धा वृद्ध लोकांवर एकटं राहायची वेळ येते. असे लोक गृहसंकुलामध्ये राहात असल्यामुळे मूलभूत सुविधा, सुरक्षा असे प्रश्न अगदी ठळकपणे समोर येत नसले तरी या वृद्धांची 8 ते 24 तास काळजी घेण्यासाठी मनुष्यबळाची गरज भासते. त्यात त्यांना खायला घालण्यापासून त्यांच्या दैनंदिन समस्यांर्पयत सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. त्यातच वृद्ध लोकांना अनेक प्रकारच्या वैद्यकीय समस्या भेडसावत असल्यामुळे त्या संदर्भातल्या प्रश्नांचाही सामना करणं गरजेचं असतं. अशावेळी भरवशाच्या लोकांची गरज प्रकर्षानं भासते. त्यात डॉक्टरांकडे नेऊन आणण्यापासून वेळच्या वेळी गोळ्या-औषधं देण्यार्पयत अनेक गोष्टींचा समावेश होतो. 

संधी कुणाला?
वृद्धांची सर्वार्थानं काळजी घेऊ शकणार्‍या तरु ण-तरु णींची गरज यामुळे मोठय़ा प्रमाणावर भारताबाहेर आणि भारतातही भासणार हे म्हणूनच अगदी नक्की आहे. यासाठी अजून कुठला ‘अभ्यासक्र म’ नसला तरी असा अभ्यासक्र म स्वतर्‍च आखून त्यानुसार आवश्यक असलेल्या गोष्टी शिकणं सहज शक्य आहे. त्यात मुळात आपण कुणाशीही नीटपणे कसं बोलावं, इतरांच्या घरी कसं वागावं, आपली वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी या गोष्टी तर येतातच. याखेरीज रु ग्णांची काळजी घेण्यासाठीच्या गोष्टींचाही समावेश होतो. वृद्ध लोक चिडचिडे असणार, वारंवार आजारी पडणार, असंख्य गोष्टींविषयी तक्र ारी करणार, नाजूक मनाचे असणार असं सगळं निसर्गसारख्या अभ्यासक्र मांमध्ये शिकवलं जात असल्यामुळे त्या संदर्भातलं प्रशिक्षण घेणं उपयुक्त ठरू शकतं. तसंच शारीरिक काळजी घेणं म्हणजेच सर्वसामान्यपणे किळस येईल अशा प्रसंगांनाही सामोरं जाण्याची तयारी ठेवणं हे ओघानं आलंच. एकूणच हे काम आव्हानात्मक असणार हे नक्की.
याच्या जोडीला वृद्ध लोकांची करमणूक करणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांना धीर देणं, त्यांच्याशी आत्मियतेनं वागणं, त्यांच्या वेगानं त्यांना जगू देणं हे सगळंही आपल्याला सर्वसामान्यपणे कटकटीचं वाटू शकतं. आपलं तेच काम झाल्यावर मात्न आपल्याला त्याच्याशी जळवून घेणं भागच पडतं याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच या कामात फक्त शारीरिक कष्ट करून पुरेसं नसतं, तर मानसिकरीत्याही खूप संयम बाळगणं गरजेचं ठरतं. ‘हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट’सारख्या अभ्यासक्र मांमध्ये हे शिकवलं जातं. 

स्कोप का आणि किती?
ज्या तरुण-तरुणींना अशा कामात रस वाटतो त्यांनी या पर्यायाचा जरूर विचार करावा. कदाचित जर्मन किंवा जपानी भाषा शिकण्याचा फायदाही मिळू शकतो. तसंच अशा प्रकारचे तरु ण-तरु णी गोळा करून त्यांना गरजेनुसार ठिकिठिकाणी उपलब्ध करून देणारी संस्था काढू शकण्याचा पर्याय छोटा उद्योजक बनू पाहणार्‍यांकडे आहे.

Web Title: emerging careers in India- elder or senior care, new job opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.