शिक्षक झालेले इंजिनिअर

By Admin | Published: February 19, 2016 03:04 PM2016-02-19T15:04:21+5:302016-02-19T15:22:24+5:30

बीई झालेला इंजिनिअर डिप्लोमा कॉलेजमध्ये शिकवतो आणि एमई झालेला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. पण कमी पगारात जेमतेम नोकरीला चिकटत हे इंजिनिअर्स जगतात कसे, कुणास ठाऊक?

Engineered Engineer | शिक्षक झालेले इंजिनिअर

शिक्षक झालेले इंजिनिअर

googlenewsNext

 मला चांगलं आठवतं इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असताना केजमधल्या एका डिप्लोमा कॉलेजमध्ये जागा असल्याचं सांगत  आमच्या सरांनी अर्ज करायला सांगितला होता. पण वर्गात फार काही कुणी शिक्षक व्हायला उत्सुक नव्हतं. 

इंजिनिअर झाल्यावर पुण्यात नोकरी मिळेनाशी झाली की कुठं कुठं शिक्षक व्हायचं ठरवतात ते मजबूर असतात, असं म्हटलं जातं. त्यामुळे मी अर्ज करणार म्हटल्यावर अनेकांनी माङया निर्णयाला मुर्खपणाच म्हटलं. 
 इंजिनिअरिंग करण्यासाठी आपण जी भरमसाठ फी भरत असतो ती परत कमवायची असेल तर शिक्षक होऊन कसं चालेल? दुसरं म्हणजे आपण इंजिनिअरिंग करून शिक्षक झालो हे सांगायची अनेकांना लाज वाटत असते आणि सर्वात शेवटचं पण अत्यंत महत्त्वाचं असं की जे आपल्यालाच नीट कळलं नाही ते दुस:यांना काय शिकवणार, अशी भीतीही असते. त्याचबरोबर आपण आपल्या शिक्षकांना कधी आदर दिलेला नसतो तशीच वागणूक आपल्याला मिळाली, तर या प्रश्नांनी घाबरून सहजासहजी कुणी शिक्षक होत नसतो. 
त्यात अनेकांना आपल्या शिक्षणाचा(?) उपयोग देशाच्या विकासासाठी करायचा असतो. त्यासाठी ते पुणो किंवा मुंबई वगैरे शहरात जातात. आणि मग ग्रामीण भागातल्या कॉलेजात उरलेले नाईलाजानं शिक्षक होतात.  आणि त्यांच्या समस्यांकडे कुणी पाहत नाही. अशाच काही मला जाणवलेल्या समस्या मांडतो आहे.
सगळ्यात मोठी समस्या म्हणजे तुम्हाला या क्षेत्नात हवा तसा पैसा मिळत नाही. अनेक संस्था ज्ञान दान वगैरे दिखावा करतात. पण प्रत्यक्षात शिक्षक म्हणून नियुक्ती करताना कमी पैशांत राबणा:या, अल्पकाळ टिकणा:या मुलांना आणि शक्यतो तर मुलींनाच प्राधान्य मिळते. मुलींची लग्न झाली की, त्या मोठय़ा शहरात जातात. त्यामुळे या तात्पुरत्या असलेल्या नोकरीकडून खूप काही मिळेल अशी त्यांची अपेक्षा नसते. ते संस्थाचालकांच्या पथ्यावर पडतं.
त्यात गल्लोगल्ली इंजिनिअरिंग कॉलेज. संस्थांच्या संख्येत वाढ झाली पण तेवढी विद्यार्थीसंख्या न वाढल्याने आणि आधीच्यांना नोक:या न मिळाल्यामुळे; कॉलेजमध्ये प्रवेश कमी होताहेत. दुसरीकडे इंजिनिअरिंग झालेल्या मुलांना/मुलींना नोकरी नसल्यामुळे त्यांना शिक्षक व्हावं असं वाटतं. परिणाम म्हणून नोकरी करण्यासाठी कॉलेज भरपूर आहेत पण त्यात विद्यार्थी नाहीत आणि याचा परिणाम शिक्षकांच्या पगारावर होतो.
बीई झालेला इंजिनिअर डिप्लोमा कॉलेजमध्ये शिकवतो आणि एमई झालेला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. साहजिकच डिप्लोमा कॉलेजमध्ये शिकवणा:यांना पगार कमी असतो. तो वाढवण्यासाठी बरेचजण एमई करतात. म्हणजे तुटपुंज्या पगारातून काही लाख रुपये खर्चून ती डिग्री मिळवतात. म्हणजे हा शिक्षक एकीकडे विद्यार्थी आणि दुसरीकडे शिक्षक अशा दोन भूमिका निभावत असतो. यातून मग फक्त परीक्षेपुरतं कॉलेज करणं आणि आयते प्रोजेक्ट आणणं वगैरे सगळं करावंच लागतं. 
त्यात  घरचे/ओळखीचे/ मित्रही ‘स्पर्धा परीक्षा दे,’ असा आग्रह करू लागतात. मग नवीन जागा निघालेल्या जाहिराती वाचनं आणि डी.डी. भरून परीक्षा देत राहणं हा एक नित्याचा उद्योग होऊन बसतो.
या सा:यात कॉलेजच्या नफ्याचं आणि तुमच्या पगाराचं त्नांगड तुमच्याच गळ्यात कधी पडतं तुम्हाला ही कळत नाही.
मुलांचे अॅडमिशन झाले तर जास्त नफा आणि जास्त नफा मिळाला तर तुमचे पगार जास्त इतकं सोपं गणित मग तुम्हाला कॉलेज चालवणा:यांकडून समजावलं जातं. विद्यार्थी ग्राहक होतो आणि आपण दुकानदार. ‘विद्या दान श्रेष्ठ दान’ या पाटय़ा आपण रोज वाचत असतो; पण आपल्यालाच कळत नसतं आपण कुठं चुकतोय? 
बरं एवढं सगळं होत असताना तुमच्या पगाराचे खरे आकडे आणि हातात पडणारा पगार यात बरीच तफावत असते. ती मान्य करण्याचा नाईलाज असतोच.
अशा प्रकारे शिक्षकच इतका असहाय्य आणि हतबल झाल्यामुळे शिक्षणाचा दर्जा न विचारलेलाच बरा. मात्र सध्या तरुण शिक्षकांच्या या समस्यांकडे कुणी लक्ष देतंय असं वाटत नाही.
 
 
- उल्हास रामदासी
अंबाजोगाई

Web Title: Engineered Engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.