इंजिनिअर्सचा लोंढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 03:15 PM2017-08-02T15:15:17+5:302017-08-03T13:16:15+5:30
जॉब नाही, असेल तर त्याच्यात मन रमत नाही आणि आहे तो जॉब टिकेल की नाही सांगता येत नाही अशा अवस्थेतल्या इंजिनिअर्सची तडफड शोधणारा विशेष अंक
देशभरातील इंजिनिअर्सना आता कंपन्यांमध्ये इण्टर्नशिप कंपलसरी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
देशभरात दरवर्षी सुमारे आठ लाख तरुण इंजिनिअर होतात. आणि त्यातले फक्त ४० टक्के तरुण इंजिनिअर नोकरीसाठी ‘लायक’ ठरतात, ही भारत सरकारने जाहीर केलेली आकडेवारी आहे.
एवढेच नव्हे, तर अॅस्पायरिंग माइण्ड्स या संस्थेच्या अभ्यासानुसार तर देशभरात इंजिनिअर म्हणून डिग्री घेऊन बाहेर पडणारे फक्त पाच टक्के उत्तम इंजिनिअर ठरतात. बाकीचे ९५ टक्के इंजिनिअर म्हणवायच्या योग्यतेचेही नसतात.
नॅशन एम्प्लॉईबिलिटी रिपोर्ट अर्थात राष्ट्रीय रोजगार क्षमता अभ्यासानुसार ही आकडेवारी योग्य असून, देशभरातील इंजिनिअर्सच्या गुणवत्तेचा मोठाच प्रश्न आहे.
इंजिनिअरची रोजगार क्षमता वाढवणं आणि मेक इन इंडिया अभियानाला चालना देणं या दोन हेतूंनी अलीकडेच सरकार आणि आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन या संस्थेनं इंजिनिअर्ससाठी इण्टर्नशिप सक्तीचा निर्णय घेतला आहे.
आणि महाविद्यालयांना ताकीद देत सक्ती केली आहे की, तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांसाठी कंपन्यांमध्ये इर्ण्टनशिप शोधा.
हे सारं वातावरण एकीकडे बदलत असताना, दुसरीकडे इंजिनिअरिंग प्रवेशासाठीची धावपळही आता सुरू झालेली आहे. दरवर्षीप्रमाणे प्रवेशाचे वाद आणि त्यातून होणारे घोळ सुरूच आहेत.
आणि दुसरीकडे आयटी क्षेत्रात नोकर कपात, इंजिनिअर्सना न मिळणाºया किंवा घटणाºया नोकºया यामुळे उद्योग क्षेत्रात चिंतेचं वातावरण आहे.
त्यामुळे तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल किंवा इंजिनिअरिंग करायचं ठरवत असाल किंवा इंजिनिअर होऊन नोकरी शोेधत असाल तर तुमच्यासाठी या अंकात इंजिनिअरिंग जगाचं एक वास्तव चित्र आहे..
ते चित्र सुखद नाही, त्यात हॅपी एण्डिंग तूर्तास दिसत नाही..
पण निदान जी वस्तुस्थिती आहे ती पाहण्याची ताकद तरी आपण कमवली पाहिजे, तर कदाचित योग्य मार्ग सापडू शकेल..
तो सापडावा..
म्हणून तरुण इंजिनिअर्सच्या जगात घेऊन जाणारा हा एक खास अंक..