EQ

By Admin | Published: July 23, 2015 05:58 PM2015-07-23T17:58:06+5:302015-07-23T17:58:06+5:30

नुस्त्या हुशार माणसांची आता गरज नाहीये.

EQ | EQ

EQ

googlenewsNext
>- समिंदरा हर्डिकर-सावंत
 
नुस्त्या हुशार माणसांची आता
गरज नाहीये.
नव्या जगाला अशी माणसं हवीत
जी हुशार-मेहनती आहेतच,
पण स्वत:च्या भावनांचा तोलही 
उत्तम सांभाळू शकतील!
ते जमलं नाही तर गेलीच विकेट!
 
ई. क्यू. किंवा इमोशनल इंटेलिजन्स हा शब्द एव्हाना तुमच्या कानावरून ब:यचदा गेला असेल.
‘आता आयक्यू नाही, नोकरी देताना ईक्यू पाहिला जातो’ हे वाक्य पण सतत येताजाता कार्पोरेट जगात वापरलं जातं. 
पण याचा नेमका अर्थ काय? 
आय. क्यू. म्हणजे बुद्धय़ांक हे सर्वांनाच ठाऊक आहे. आणि ई. क्यू. म्हणजे भावनिक बुद्धय़ांक! पण भावनांना बुद्धय़ांक कसा असणार. आता इतके दिवस डोक्यातल्या बुद्धिमत्तेची चर्चा होत होती; आता ही भावनांची बुद्धिमत्ता म्हणजे काय नवीन भानगड, हा प्रश्न अनेकांना पडतो. आणि भीतीच वाटते की ही बुद्धिमत्ता आपल्याकडे नसेल तर गेलीच आपली विकेट!
हे खरंय, अशी विकेट जातेही. कारण नव्या कार्पोरेट जगाला नुस्त्या हुशार माणसांची गरज नाहीये, तर जे भावनिक असूनही माणसांना उत्तम सांभाळतात, आपली हुशारी सांभाळत इतरांशी जमवून घेत स्वत:च्या भावनांचा तोलही सांभाळतात त्या माणसांची आता खरी गरज आहे.
आणि त्यामुळे आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढवणं, ते शिकणं हे एक नवीन स्किल झालं आहे.
 
ईक्यूसाठी आवश्यक तीन मुख्य गोष्टी
1. भावनिक जागरूकता 
 तुमच्या भावनांविषयी सर्तकता असणं. आपल्या मनात भावनांचा काय खेळ चालला आहे याचं ज्ञान असणं. आपल्या भावना आपल्यालाच नीट कळणं याला म्हणतात भाविनक जागरूकता.
2. भावनांची अभिव्यक्ती 
आपल्या भावना आपण कशा प्रकारे व किती प्रमाणात व्यक्त करतो यालाच अभिव्यक्ती म्हणता येईल. ज्याचा ई. क्यू. चांगला तो परिपक्वपणो आपल्या भावना व्यक्त करू शकतात. बाकीच्यांचा भावनेच्या भरात बराच तोल जातो आणि त्यातून मग जी पडझड होते ती आवरणं मुश्कील होतं. 
3. इतरांच्या भावनांविषयी जागरूकता
 आपल्या सभोवतालच्या व्यक्तींच्या भावना आपल्याला अचूक ओळखता येतात का हेदेखील अतिशय महत्त्वाचे आहे. लोकांचं मन वाचता येत नाही; पण इतरांच्या भावनांचे चढउतार, ते व्यक्त करण्याची त्यांची पद्धत आपण नक्की समजून घेऊ शकतो.
 
ईक्यू वाढवायचा कसा?
ही भावनिक बुद्धिमत्ता वाढवता येऊ शकते का?
तर येऊ शकते.
त्यासाठी आपल्या डोक्याला काही गोष्टींच्या सरावाचं टॉनिक मात्र द्यावं लागतं.
* काय झालं म्हणजे तुम्हाला टोकाच्या भावना जाणवतात, भावनिक तणाव येतो, आपला तोल सुटतो, आपल्याला नक्की कोणत्या गोष्टीचा त्रस होतो आहे याकडे स्वत:च लक्ष ठेवा. हे करणं सोपं नाही. कधी कधी पटकन उत्तर सापडणार नाही. पण हे उत्तर सापडेपर्यंत जरा स्वत:च्या भावनिक चढउताराकडे लक्ष द्याच.
* जवळच्या नात्यांमध्ये भावनिक पारदर्शकता ठेवा. आपल्या भावना आपण जितक्या व्यक्त करू तितकेच आपल्याला मोकळे वाटते आणि नात्यामध्ये खरेपणा टिकून राहतो. अर्थात अप्रिय भावना संवेदनशीलपणो मांडणं महत्त्वाचं आहे. आपलंच माणूस म्हणून काय वाटेल ते बोलून नाहीच चालणार. तेव्हा आपल्या व्यक्त करण्याकडे, शब्दाकडेही जरा लक्ष द्या.  
* स्वत:च्या शरीराची भाषा ओळखा. अनेकदा आपले शरीर आपल्याला ज्या प्रकारे प्रतिसाद देत असतं त्यावरून आपल्याला आपल्या भावनांविषयी बरीच माहिती मिळू शकते. तुमचे शरीर तुम्हाला काय सांगते आहे ते समजण्याचा प्रयत्न करा. छाती धडधडणो, पोटात गोळा येणो, शरीर थंड पडणो हे सर्व आपल्या भावनांविषयी बरंच काही सांगून जातं.
* इतरांची देहबोली आणि हावभाव वाचायला शिका. समोरची व्यक्ती हावभाव आणि देहबोलीद्वारेही भावना व्यक्त करत असते. तुम्ही लक्ष दिलेत तर तुम्हाला त्यातून त्यांच्या भावना अचूक टिपता येऊ शकतात.
* क्षमा करायला शिका. व्यक्तिगत असो नाही तर व्यावसायिक, नात्यामध्ये अधूनमधून मतभेद होणार. तुम्हाला जर इतरांना आणि स्वत:लाही क्षमा करता येत नसेल तर नात्यांत, तसेच मनात कटुता निर्माण होते. ही कटुता आपल्याला पुढे सरकू देत नाही. म्हणूनच भावनिक बुद्धय़ांक वाढवण्यासाठी क्षमा करता येणं ही फार महत्त्वाची कला आहे.  
 
* हे सारं म्हणजे सुरुवात आहे. खरंतर भावनिक परिपक्वता वाढवण्याची प्रक्रि या ही आयुष्यभर चालते. सुरु वातीची पहिली काही पाऊलं फक्त योग्य वाटेवर पडायला हवीत. नव्या काळात हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण माणसांशी जमवून घेता आलं नाही तरी टिकावं लागणं अवघड!  
 

Web Title: EQ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.