परीक्षेचा संबंध फक्त मार्कांपुरता असतो?
By admin | Published: April 4, 2017 03:29 PM2017-04-04T15:29:52+5:302017-04-04T15:29:52+5:30
परीक्षा असते कशा साठी? आपलीच बुद्धीमत्ता तपासण्यासाठी?पण आत्ता तर तीची व्याख्याचबदलली. परीक्षा असते कशासाठी?
परीक्षा असते कशा साठी? आपलीच बुद्धीमत्ता तपासण्यासाठी?पण आत्ता तर तीची व्याख्याचबदलली.
परीक्षा असते कशासाठी? मार्कशिटवर टक्क्यांची सुज येण्यासाठी! वर्षभर शाळेत न येणारा बाब्या जेव्हा शाळेत पहिला येतोमग ७५% उपस्थितीत प्रश्न कुठे जिरतो?तेव्हा परीक्षेचा अर्थ फक्त टक्क्यांपुरताच उरतो.पैपरसुद्धा कुणी समोर गाईड ठेवून लिहीतो,चेकरचा हात लागण्याच्या आता
त्याच्याच खिशात हात असतोआठवीपर्यंत थेट पास, पुढे पास मागे सपाटसगळाच तोटा मुलांचा असतो
दहावीच्या बाब्याला तर बेचा पाढाही येत नसतो.पण तरी त्याचाच फोटो पहिल्या यादीत झळकत असतो
मग परीक्षेचा अर्थ फक्त टक्क्यांपुरताच उरतो.या सगळ्यात मग हुशार मुलांची माती होते
सुशिक्षित बेरोजगारांची मग बढती होते अशा समस्यांचा भार मग सहन होत नाही म्हणून माझा देश विकसनशीलचा विकिसत होत नाही.कॉपी करुन पास होतो,मार्कांच्या आकड्यातच हुशार असतो
अशाच बाब्याची पुढे प्रगती होते,कुठं इंजिनिअर,वकील, डॉक्टर,शिक्षक, म्हणून नेमणूक होते.
ते सारे कसे काम करत असतीलहा प्रश्न विचारायचा नसतो,परीक्षेचा संबंध फक्त टक्कयांपुरतचा असतो..
-धनश्री धनाजी लोंढे
सुरडी, ता.बार्शी, जि. सोलापूर