माती, शेती आणि त्याचा ग्लॅमरचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 04:47 PM2020-08-20T16:47:29+5:302020-08-20T16:55:39+5:30
मातीचं आरोग्य याविषयात मी काम करत होतो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं; पण डोक्यात होतं, शेतीत काम करायचं, शेतीला ग्लॅमर येईल असं काही करू. आणि त्या दिशेनं चालायला लागलो..
मयूर तांबे , निर्माण 8
माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण झाल्यावर पुढे मी मेकॅट्रॉनिक्स या विषयात पदव्युत्तर शिक्षण व्हीआयटी वेल्लूरहून पूर्ण केलं.
पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच मला बरेच प्रश्न पडायचे. शेती फायदेशीर कशी करता येईल? त्याचे कोणते कोणते मार्ग असतील? कॉलेजमध्ये असल्यापासून शेतीप्रश्नावर काम करायचा विचार होताच. इंजिनिअरिंगची कौशल्यं असल्यामुळे तंत्नज्ञानाच्या साहाय्याने शेतक:यांचे प्रश्न सोडवायचे असं मी ठरवलं.
शेतीमध्ये बरेच गुंतागुंतीचे प्रश्न आहेत त्यातल्या नेमक्या कोणत्या प्रश्नावर काम करायचं हे मात्न ठरलं नव्हतं.
कॉलेजमध्ये असताना नाशिकच्या के.के. वाघ अॅग्रीकल्चर कॉलेजमध्ये टीम अॅॅग्रीटॉनिक्स या नावाने मी माङया मित्नांसोबत शेतीविषयक रिसर्च प्रोजेक्ट सुरू केले. याच दरम्यान मला एमआयटी मीडिया लॅब आणि टीसीएस आयोजित एका शिबिराला जायची संधी मिळाली. अमेरिकेत एमआयटी बोस्टन युनिव्हर्सिटीला जायची संधी मिळेल किंवा पुढे नोकरीमध्ये फायदा होईल या हेतूने मी डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअरमध्ये इंटर्नशिप करायची ठरवली.
तिथं लक्षात आलं की सॉइल हेल्थ (मातीचे आरोग्य) या विषयावर काम करायचं आहे. आम्ही ते चॅलेंज स्वीकारलं आणि माती परीक्षणावर काम करायला सुरुवात केली. माती परीक्षण करणा:या वेगवेगळ्या प्रयोगशाळेतून एकाच प्रकारच्या मातीच्या नमुन्यांचं परीक्षण करून पाहिलं असता त्याचे येणारे अहवाल हे वेगवेगळे येतात असं आम्ही सादर केलं.
या गोष्टीचा सिरीयसनेस तेव्हा कळाला नाही, जेव्हा आम्ही स्वत: काही नमुने तपासून पाहिले आणि त्याचेही अहवाल जुळले नाहीत तेव्हा शेतीच्या समस्या किती गंभीर आहेत याची जाणीव झाली. कारण या अहवालावरून खत किती वापरायचे ते समजते. त्यावरून जमिनीची सुपीकता आणि उत्पादन वाढतं.
खताच्या चुकीच्या वापरामुळे शेतक:यांचा नफा खूप कमी होऊ शकतो. तो माङयासाठी आयुष्यातील एक निर्णायक टप्पा ठरला आणि स्वत:च्या फायद्यासाठी नोकरी किंवा बिजनेस करण्यापेक्षा त्यातून शेतीचे प्रश्न कसे सोडवता येतील यावर विचार करायला लागलो. शेती क्षेत्नात पूर्ण वेळ काम करायचे ठरवले.
डीआयएसक्यूमधल्या अनुभवाने मला एक मोठा मेंटल शिफ्ट मिळाला. या अडीच वर्षाच्या इंटर्नशिपमध्ये मला संदीप शिंदेसर आणि भानुप्रसाद सरांसारखे मेण्टॉर्स भेटले. इंटर्नशिपच्या दोन वर्षानंतर 2क्18 साली मी आणि श्रद्धा बागवे आम्ही सुरू केलेल्या श्रमभूमी इनोव्हेशन्सची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून नोंदणी केली. एक महत्त्वाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं ते म्हणजे ब्रिंग ग्लॅमर इन अॅग्रीकल्चर.
शेतीमध्ये इतर क्षेत्नासारखे आकर्षित करणारे घटक तसे कमीच आहेत. परंतु मला मात्न शेतीमध्ये ग्लॅमर दिसतं आणि ते इतरांनाही दिसावं यासाठी काम करायचं ठरवलं. श्रमभूमी इनोव्हेशन्सच्या कामात अनेकांनी हातभार लावला. इम्लिमेण्टशन आणि व्हॅलिडेशन पार्टनर म्हणून आम्ही सह्याद्री फार्म्सबरोबर काम सुरू केलं. सोबतच सह्याद्री फार्म्सचे संस्थापक आणि चेअरमन विलास शिंदे यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. तसेच संशोधनाच्या कामासाठी आम्हाला नॅशनल अॅग्रो फाउण्डेशन, चेन्नईच्या कल्पना मॅडमची मोलाची मदत मिळाली. सह्याद्रीसोबतच काम करणा:या सचिन वाळुंज यांनी फर्टिलायझर रेकमेंडेशन मोड यासाठी मदत केली.
सामाजिक योगदान करण्याकडे माझा कल जास्तच वाढत जात होता.
परंतु बरीच संशोधन आणि काम करूनदेखील पाहिजे तसे परिणाम मिळत नव्हते, संयम सुटायला लागला होता, माङो सहकारी काम सोडून जात होते. दरम्यान माझा कॉलेजचा मित्न संकल्प आभाळेने मला निर्माणबद्दल सांगितलं. 2क्17मध्ये मला निर्माणच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायची संधी मिळाली. गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात काम करत असलेल्या संकेत आहेर या मुख्यमंत्नी ग्रामीण विकास परिवर्तक मित्नाच्या मदतीने तिथल्या शेतक:यांना आम्ही माती परीक्षणाची सेवा दिली.
ऑगस्ट 2क्17 मध्ये डीआयएसक्यूकडून मिळणारी आर्थिक मदत बंद झाली. आर्थिक उत्पन्न शून्यावर येऊन ठेपलं.
कंपनीच्या कामातूनही कोणत्याही प्रकाराचं उत्पन्न मिळत नव्हतं. माङया घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे मला तसा आर्थिक संघर्ष कुठेच नव्हता. मात्र मी घरून पैसे न घेण्याचा निर्णय घेतला आणि इंटर्नशिपमध्ये कमावलेल्या पैशातून खर्च करायला लागलो. पहिले तीन महिने सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. परंतु पुढचे काही महिने जर आर्थिक उत्पन्नाचं काहीच साधन नाही मिळालं तर परिस्थिती खूपच गंभीर होईल, असं लक्षात आलं. मग मी कंपनीच्या कामासाठी ठरावीक वेळ ठरवून उरलेले तास स्वतंत्नरीत्या काम करून पैसे कमावायचे ठरवले. ज्यातून मी माङया मूलभूत गरजा भागवू शकतो. या पूर्ण प्रवासात माङया विचारांमध्ये एक मोठा बदल झाला तो म्हणजे मी फिक्स्ड माइण्डसेटकडून ग्रोथ माइण्डसेटकडे वळालो. मी माती परीक्षणाच्या कामावर टिकून रहायचं असं ठरवलं. जवळ जवळ आठ महिन्यांच्या कालावधीनंतर एप्रिल 2क्18 मध्ये मला निर्माणची करके देखो फेलोशिप मिळाली.
दुसरीकडे माती परीक्षणाच्या कामात बरेच अडथळे येऊ लागले. आमच्या आर अॅण्ड डीमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या, आमच्याकडे त्यासाठी लागणारी एक्सपर्टाइजही नव्हती. त्यासाठी बराच पैसा गुंतवावा लागणार होता जो त्यावेळेस उपलब्ध नव्हता. शेवटी स्टार्टअप बंद करण्याचा निर्णय घेतला. हाताशी दुसरा बॅकअप प्लॅन नव्हता. नंतरचे दोन महिने हे प्रचंड मानसिक ताण देणारे ठरले. कंपनी बंद करावी लागली. हाती काहीच उरलं नाही अशी अवस्था असताना काहीतरी करायचंय ही जिद्द मात्न सुटली नव्हती, पुन्हा एकदा मी नव्याने काही प्रश्नांवर काम करायला सुरु वात केली.
कर के देखो फेलोशिप सुरूच होती. अनेक गोष्टी करून पाहिल्या. बघता बघता ही फेलोशिप संपत आली. तेव्हा मी अमृत बंगशी चर्चा करून ठरवलं की आपलं उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग स्पष्ट होईर्पयत आपण अशा व्यक्तीसोबत काम करायचं ज्याला या बाबतची स्पष्टता असेल आणि मी सह्याद्री फार्म्स सोबत कामाला सुरु वात केली.
शेतक:यांनी शेतक:यांसाठी उभी केलेली ही अग्रगण्य फार्मर प्रोडय़ुसर कंपनी आहे. इथे माङयाकडे प्रभावी व्यवस्थापन आणि अत्याधुनिक संगणकीय व डिजिटल तंत्नज्ञानाचा वापर करून शेतक:यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळतो हे सुनिश्चित करणो, शेतीउत्पादन खराब होऊ नये किंवा वाया जाऊ नये म्हणून प्रयत्न करणो, ग्राहकांना उत्तम दर्जाचे व सुरक्षित अन्न पोहचत आहे की नाही याची खात्नी करणो यासारख्या महत्त्वाच्या जबाबदा:या आहेत.
निर्माणच्या कर के देखो या अप्रोचमुळे मी अनेक प्रश्नांवर विचार करायला लागलो. सह्याद्री सोबत काम करत असताना मला मानसिक स्थैर्य प्राप्त झालं. माङया काही प्रश्नांची उत्तरे शोधायला मदत मिळाली, सोबतच नवीन प्रश्न पडायला लागले.
आणि त्यासोबतच शेतीमध्ये ग्लॅमर कसं आणता येईल या प्रश्नाचा नव्याने शोध सुरू झाला. सुरू आहे.
निर्माणमध्ये सहभागी व्हायचं आहे?
तरुणांना अर्थपूर्ण जगण्याचा शोध घ्यायला मदत करणा:या निर्माण या उपक्रमाच्या अकराव्या बॅचसाठीची निवडप्रक्रिया सुरू झाली आहे.
त्यात सहभागी व्हायची इच्छा असेल तर
http://nirman.mkcl.org
या संकेतस्थळावर
उपलब्ध असलेला अर्ज भरता येईल.
अधिक माहितीही याच संकेतस्थळावर मिळू शकेल.