एक्स्प्रेस टू इम्प्रेस..

By admin | Published: August 4, 2016 04:43 PM2016-08-04T16:43:35+5:302016-08-04T16:43:35+5:30

आपण बोलतो खूप; पण प्रत्यक्ष काही करायचं, लिहायचं म्हटलं की हिंमत होत नाही. होतं ना असं तुमचंही? पण घुसमटीतून बाहेर यायचंय, आपल्यातला अभिनेता, चित्रकार, फोटोग्राफर बाहेर काढायचा तर मैदानात यायलाच हवं..

Express to Improve .. | एक्स्प्रेस टू इम्प्रेस..

एक्स्प्रेस टू इम्प्रेस..

Next
>- प्रवीण दाभोळकर 
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत सहायक उपसंपादक आहेत.)
 
आपण बोलतो खूप; पण प्रत्यक्ष काही करायचं,  लिहायचं म्हटलं की हिंमत होत नाही. होतं ना असं तुमचंही? पण घुसमटीतून बाहेर यायचंय, आपल्यातला अभिनेता, चित्रकार, फोटोग्राफर बाहेर काढायचा तर मैदानात यायलाच हवं..
 
तुमच्यासोबत असं होतंय का?? म्हणजे बघा ना छानशी पोस्ट लिहिलेय; पण फेसबुकवर अपलोड करू का नको असा विचार येतोय.. अ‍ॅक्टिंग करायची इच्छा होतेय; पण हिम्मत होत नाहीये... त्यावेळी छानसं गाणं सुचलेलं; पण विचार करण्यातच वेळ निघून गेला.. मोबाइलच्या टेक्स्ट बॉक्समध्ये काहीतरी लिहिलंय; पण पाठवू की नको धाकधूक होतंय.. असं काही?..
वेळ मिळत नाहीए .. लोक काय म्हणतील अशी कारण देतो आपण, की मरो.. बघू नंतर कधीतरी.. असं बोलून वेळ मारून नेतो आपण??.. 
एखाद्या प्रसंगावर, व्यक्तीवर, चालू घडामोंडीवर किती बोलायचं असतं आपल्याला.. किती लिहायचं असतं आपल्याला ‘पण’ लिहिण्याची वेळ येईपर्यंत कित्येक प्रसंग नजरेखालून भुर्रकन निघून गेलेले असतात किंवा कोणीतरी व्यक्त झालेला असतो.. मग पुन्हा त्यावर तेच तेच कसं बोलणार असा विचार करून आपण ती वेळदेखील मारून नेतो...
आठवा तो प्रसंग.. आपण कधीतरी आपल्याला पाहिजे तसे व्यक्त झालेलो असतो. खूप भरभरून बोललेलो असतो.. मन रित करून काहीतरी लिहिलेलं असतं.. मग कोणतरी हळूच येऊन सांगतं किती छान बोललात.. खूप छान लिहिलंय वगैरे.. आपल्याला खूप भारी वाटतं सगळं... सारखे सारखे आठवतात एखाद्याचे ते कौतुकाचे शब्द आणि तुम्ही एकटेच गालातल्या गालात हसत असता. पण ठरावीक तीच तीच गोष्ट आपण गिरवत राहतो आणि स्वत:चेच गालगुच्चे घेत असतो. यामध्ये सातत्य ठेवलं तर आयुष्यातल्या आनंदाचं गमक सापडू शकेल.. आपल्या या दाखवलेल्या हिम्मतीसोबत थोडी मेहनत तर आपल्याला घ्यावी लागेलच.
आपल्याला काय वाचायला आवडतं काय नाही आवडत, काय महत्त्वाचं आहे, काय अतिमहत्त्वाचं आहे याचं छानंसं वर्गीकरण करावं लागेल. कोणत्या वक्त्याची शैली कशी आहे या गोष्टींचा थोडाथोडका का होईना विचार करायला हवा... कोणत्या लेखकाचं लिखाण वाचताना स्फूरण चढलेलं असतं.. कोणीतरी वक्ता बोलत असतो; पण आपल्या अंगात रोमांच संचारलेला असतो.. या प्रत्येकाचा स्वत:चा एक चाहता वर्ग असतोच...
अजून किती दिवस बोलत रहायचं? लिहायचंय; पण हिम्मत होत नाही.. यावर एकच उपाय सरळ लिहत सुटायचं.. कोणी वाचो.. न वाचो.. वेळप्रसंग पाहून एखाद्या विषयावर मुद्देसूद बोलायचं.. कोणाला आवडोन आवडो... लोक काय म्हणतील.. याचा विचार आपण कशाला करायचा? थोडक्यात काय तर व्यक्त व्हायचं... एक्स्प्रेस टू इम्प्रेस हा लाईफचा फंडा आहे.. आपण आत्ताच असं मनाशी ठरवू कोणी कौतुक करो अथवा न करो मला स्वत:साठी व्यक्त व्हायचंय.. माझ्यातली घुसमट बाहेर काढायची आहे... आपल्या आतला अभिनेता, चित्रकार, फोटोग्राफर बाळंतपणासाठी धडपडतोय.. पोटातल्या पोटात लाथा मारतोय.. आपल्याला कळतही... पण आपण त्याला वाट मोकळी करून दिली पाहिजे.. वाढवलं पाहिजे... जोपासलं पाहिजे.. लिहायला, बोलायला, व्यक्त व्हायला सुरुवात केल्यानंतर आपल्यातले आपण जेव्हा सापडत जाऊ तो आनंद खूप वेगळा असेल...
अरे, विचार काय करताय?
कल करे सो आज.. और आज करे सो अभी..
 

Web Title: Express to Improve ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.