फॅशनेबल लेगिंग्जचा ट्रेंड

By admin | Published: June 24, 2016 04:12 PM2016-06-24T16:12:27+5:302016-06-24T16:12:27+5:30

येत्या पावसाळ्याचा विचार करता तरुणींना भूरळ घालणाºया विविध प्रकारचे लेगिंग्ज बाजारात आले आहेत. सेलेब्रिटीज आणि डिझायनर्स यांनीसुद्धा लेगिंगला पसंती दिली आहे

Fashionable leggings trends | फॅशनेबल लेगिंग्जचा ट्रेंड

फॅशनेबल लेगिंग्जचा ट्रेंड

Next
>- रवींद्र मोरे
येत्या पावसाळ्याचा विचार करता तरुणींना भूरळ घालणाºया विविध प्रकारचे लेगिंग्ज बाजारात आले आहेत. सेलेब्रिटीज आणि डिझायनर्स यांनीसुद्धा लेगिंगला पसंती दिली आहे. इतर कपड्यांच्या तुलनेने पावसाच्या पाण्यात लेगिंगची जास्त ओली होण्याची भीती नसते. चिखल, गाळ यापासून आपल्या कपड्याचे संरक्षण होत असते. एवढेच नव्हे तर जीन्सला चांगला पर्याय आणि घालून वावरताना जाणवणारा सुटसुटीतपणा यामुळे लेगिंग फॅशनचा ट्रेंड वाढत आहे.
 
पार्टी वेअर लेगिंग्ज 
पार्टी म्हटले म्हणजे प्रयेकाला वाटते की आपला प्रभाव पडावा. त्यासाठी एखाद्या पार्टीला किंवा डिस्कोमध्ये जाताना छान, स्टायलिश टुनिक किंवा क्रॉप टॉप घालायचा असल्यास त्यासोबत नेहमीच्या कॉटन किंवा लायक्राच्या लेगिंग शोभून दिसत नाहीत. त्यासाठी खास पार्टी स्टाईल लेगिंग्ज हवेत. सिक्वेन्स लेगिंग्ज, लेदर लेगिंग्ज, डिस्को लेगिंग या प्रकारांत मोडतात. नावाप्रमाणे सिक्वेन्स लेगिंग पूर्णपणे सिक्वेन्सनी भरलेल्या असतात. डिस्को लेगिंगना सेल्फ शाईन असते. या लेगिंग्जच दिसायला स्टायलिश असतात, त्यामुळे अगदी सिम्पल टुनिक किंवा टॉपसोबतसुद्धा या ग्लॅमरस दिसतात. 
 
फुटेड अ‍ॅण्ड स्ट्रीप स्टाईल लेगिंग्ज 
बºयाचदा चालताना लेगिंग काही प्रमाणात वर सरकते किंवा हिल्स घातल्यावर लेगिंगची उंची आखूड दिसते. मात्र यावर फुटेड आणि स्ट्रीप स्टाईल लेगिंग्ज एक उत्तम पर्याय आहेत. या लेगिंग्ज थेट पायाच्या तळव्यापर्यंत जातात. स्ट्रीप स्टाईलमध्ये लेगिंगला खालच्या बाजूने स्ट्राईप असते, तर फुटेड लेगिंग स्टोकिंगप्रमाणे पूर्ण पाय झाकते. या लेगिंग्ज हिल्ससोबत शोभून दिसतात. पार्टीसाठीतर या लेगिंग्ज एक अफलातून पर्याय आहेत. स्टायलिश टुनिक, टॉप्ससोबतही घालता येऊ शकते तर फुटेड लेगिंग्ज ड्रेस, स्कर्टसोबत इनर म्हणून वापरता येतात.
 
काफ लेंथ लेगिंग 
येत्या पावसाळ्याचा ऋतू लक्षात घेता काफ लेंथ लेगिंग तुमच्या जवळ हव्याच. पण फक्त पावसाळयातच नव्हे तर, इतर ऋतूंमध्येसुद्धा या प्रकारच्या लेगिंग्ज दिसायला फॅशनेबल असतात. साधारणत: गुडघ्याच्या चार-पाच इंच खालपर्यंत या लेगिंगची लांबी असते. त्यामुळे पावसाळ्यात चिखल उडणे, पाण्यात पाय पडून लेगिंग ओले होण्याची समस्या नसते.  कॉटन, लायक्रा कापडांमध्ये वेगवेगळ्या रंगात आणि पिंर्ट्समध्ये या लेगिंग उपलब्ध आहेत. 
 
अँकल लेंथ लेगिंग 
आपण रोज वापरतो त्या लेगिंग अँकल लेंथ असतात, साधारत: त्यांची उंची पायाच्या घोटापर्यंत असते. कॉटन, लायक्रा, स्पेंडेक्स कापडात या लेगिंग असतात. कॉटनच्या लेगिंगना चुडीदार पद्धतीने खालच्या बाजूला चुण्यादेखील असतात. वेगवेगळ्या रंगांत, पिंर्ट्समध्ये या लेगिंग उपलब्ध आहेत. कॉटनच्या लेगिंग्स कुर्तीसोबत घालायला उत्तम असतातच, पण लायक्रा लेगिंग्ज लांब शर्ट, टुनिक, टॉप्ससोबतसुद्धा घालता येतात. 
 
जेगिंग
जीन्स घालायला प्रत्येकाला आवडते, मात्र उन्हाळ्यातील गरमीमुळे ती नकोशी वाटते. यावर उत्तम पर्याय जेगिंग आहे. जेगिंग हा लेगिंगचाच प्रकार असून त्या दिसायला जीन्सच्याच असतात. लायक्राच्या लेगिंग ह्या सुटसुटीत असतात आणि वेगवेगळ्या ड्रेसेससोबत मॅच होतात. 
 
लेगिंग्ज विकत घेताना ही काळजी घ्या 
 लेगिंग्ज विकत घेताना त्यांच्या कापडाचा दर्जा तपासून घ्या. कमी व हलक्या दर्जाच्या कापडाची शिलाई उसविण्याची शक्यता असते. आपली उंची कमी असेल तर काल्फ लेंथ, मोठया छपाईचे लेगिंग्ज वापरू नका. तसेच अतिबारीक असाल तर उभ्या पट्टांच्या छपाईच्या लेगिंग वापरू नका. जास्त फिटेड लेगिंगमध्ये पायाचा आकार दिसून येतो. लेगिंग ब्राईट पिंर्ट्स किंवा पॅटर्नची असेल तर टुनिक, कुर्ता साधाच वापरायला हवे.

Web Title: Fashionable leggings trends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.