हाडं लवकर ठिसूळ होण्याचं भय

By Admin | Published: July 25, 2016 01:10 PM2016-07-25T13:10:33+5:302016-07-25T13:23:18+5:30

ड जीवनसत्व आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळतं हे आपण शाळकरी विज्ञानात शिकलो आहोतच, मात्र तरीही सध्या आपल्याकडे अनेकांमध्ये डी जीवनसत्वाची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे.

Fear of bone loss early | हाडं लवकर ठिसूळ होण्याचं भय

हाडं लवकर ठिसूळ होण्याचं भय

googlenewsNext
>- रवींद्र मोरे 
ड जीवनसत्व आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळतं हे आपण शाळकरी विज्ञानात शिकलो आहोतच, मात्र तरीही सध्या आपल्याकडे अनेकांमध्ये डी जीवनसत्वाची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे. 
भारतात पूरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश असूनही व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेने मोठी समस्या निर्माण होताना दिसत आहे. विटॅमिन ‘डी’च्या अभावाने केलेल्या अभ्यासात एक खूलासा झाला आहे की, सुमारे ६५-७० टक्के भारतीयांमध्ये विटॅमिन ‘डी’ची कमी आहे. त्यातून हाडं लवकर ठिसूळ होण्याचं प्रमाणही वाढतं आहे.
व्हिटॅमिन ‘डी’ एक अत्यावश्यक पोषक तत्त्व आहे, जे कॅल्शियमचे अवशोषण आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर हे तत्त्व त्वचेत संश्लेषित होते. हे स्टेरॉयड हॉर्मोन आहे. 
सुप्रसिद्ध अमेरिकी इंडोक्रइनोलॉजिस्ट आणि व्हिटॅमीन ‘डी’ उपचारावरील वैश्विक प्राधिकारी डॉ. मायकेल होलिक यांनी सांगितलं की, ‘विटॅमिन डी च्या कमतरतेने फक्त पश्चिमी देशच नव्हे तर भारतीय उपमहाद्वीपमध्येही चिंताजनक स्थिती आहे, जेथे सूर्य प्रकाश पूरेशा प्रमाणात आहे.
इंडोक्र ाइनोलॉजिस्टचे प्रमुख तथा भारतीय अस्थी तथा खनीज शोध सोसायटीचे माजी अतिरिक्त निदेशक तथा प्रमुख आणि अध्यक्ष, सेवानिवृत्त मेजर जनरल डॉ. रमन के. मारवा हे म्हटले की, ‘आम्ही  ११ ते १५ वयोगटातील समुहाच्या भारतीय मुलांवर दोन मुख्य संशोधन केले आहे, ज्यांना ओस्टियोपोरोसिस इंटरनॅशनल अ‍ॅण्ड ब्रिटीश जर्नल आॅफ डर्मेटॉलॉजी’मध्ये प्रकाशित केले आहे. 
संशोधनात असे आढळून आले की, उन्हाळा आणि  हिवाळा या दोन्ही ऋतूत दिवसापर्यंत प्रत्येक दिवशी ३०  मिनीटापर्यंत सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहूनही ते व्हिटॅमिन ‘डी’च्या त्या स्तरापर्यंत पोहचू शकले नाहीत, जे सुदृढ हाडांसाठी पुरेसे मानले जाते. 
दिल्लीच्या ८० टक्यांपेक्षा जास्त नागरिकांमध्ये व्हिटॅमिन ‘डी’ चा स्तर सामान्यपेक्षा कमी आहे. शहरी आणि ग्रामीण भागात व्हिटॅमिन ‘डी’ च्या अभावाची समस्या मोठी आहे.  लहान मुले, गर्भवती महिला आणि वृद्ध व्यक्ति यांच्यात व्हिटॅमिन ‘डी’च्या अभावाचा जास्त धोका आहे, असेही संशोधनातून आढळून आले आहे.

Web Title: Fear of bone loss early

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.