आभासाचा थरार

By admin | Published: March 4, 2016 11:59 AM2016-03-04T11:59:20+5:302016-03-04T11:59:20+5:30

‘सोशल टेक्नॉलॉजी’. तंत्रज्ञानाचा एक वेगळा टप्पा, एक नवीन परीभाषा. येत्या काळात हे ‘तंत्र’ आपल्या जगण्याचं ‘तंत्रच’ बदलून टाकेल अशी चिन्हं आहेत!

Feeling of Thrill | आभासाचा थरार

आभासाचा थरार

Next
VR is the Next Big Thing...
दस्तूरखुद्द मार्क झुकेरबर्ग हे वाक्य एकीकडे जगभर सांगत हिंडतोय आणि दुसरीकडे त्याच्या फेसबुकने एक नवीन श्फ टीम तयार केली आहे, जी रात्रंदिवस फेसबुकवर या व्हीआरचा प्रचार-प्रसार करणार आहे.
शक्यता अशीही आहे की, लवकरच आपापल्या फेसबुक टाइमलाइनवर हे ‘व्हीआर’ एक्सप्लोअर करून पाहा असे संदेश यायला लागतील. आणि आपण आपल्याही नकळत त्याच्या प्रेमात पडू.
या टीमचं तर असंही म्हणणं आहे की, येत्या दोनपाच वर्षात तुमचा बॉस तुम्हाला फोन करणारच नाही! म्हणजे काय तर आता जसा तो कायम व्हॉट्सअॅपवर ऑनलाइन राहून हुकूम सोडत असतो तसा तो हुकूम तर सोडेलच; पण त्याला दिसूही शकेल की तुम्ही त्या क्षणी नक्की काय करताय?
बॉसच कशाला, तुमची आईसुद्धा तुम्हाला दरडावू शकेल की, लाव तो हेडसेट, बघू ते आत्ता तुझं ध्यान कुठं आहे नी काय करतंय ते!
आणि या सा:यातून सुटका होणं अटळ. 
(कारण त्यातून सुटका करून घेण्याचं स्वातंत्र्यही आपल्याला उरणार नाही!)
हे एकीकडे आणि दुसरीकडे जगाच्या कानाकोप:यात असलेले मित्र कट्टय़ावर बसल्यासारखे एकावेळी कल्ला करत एकमेकांना पाहू शकतील. सिनेमा पाहताना त्या विशिष्ट काळात, त्या परिस्थितीत आपण उभं आहोत असा अनुभव येऊ शकेल!
आणि ही कमाल असेल ती एका नव्या ‘सोशल टेक्नॉलॉजीची’! बरोबर वाचलाय हा शब्द नुस्ती टेक्नॉलॉजी नाही तर ‘सोशल टेक्नॉलॉजी’ ही एक नवीन परीभाषा आता रुळणार आहे. आणि ‘सोशली अॅक्टिव्ह’ राहणारे अनेकजण हा नवा अनुभव जगूनही पाहणार आहेत.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, हा अनुभव म्हणजे पहिल्यांदा खूप दारू प्याल्यावर वाटतं तसा असेल किंवा पहिल्यांदा मेरी गो राउण्डमधे बसल्यावर वाटतं तसं वाटू शकेल. म्हणजे एकदा वाटल्यावर भीती वाटेल, पोटात गोळा येईल पण नंतर त्याचं व्यसन लागू शकतं इतकं ते अॅडिक्टिव्ह आणि थ्रिलिंग आहे.
आणि म्हणूनच सोशल टेक्नॉलॉजीच्या एका नव्या पर्वात आपण प्रवेश करतो आहोत असं अभ्यासकांचं म्हणणं आहे.
त्याचं निमित्त आहे, नुकतीच स्पेनमध्ये बर्सिलोनात झालेली मोबाइल वर्ल्ड कॉँग्रेस. या कॉँग्रेसमध्ये मोबाइलपेक्षा अॅप्सचा आणि त्यातून बदलणा:या ‘एक्सपिरीअन्स’चाच अधिक बोलबाला होता.
आणि फेसबुकनं नुकतीच विकत घेतलेली कंपनी ऑक्युलसनं तिथं सॅमसंगबरोबर ‘व्हीआर’ अर्थात व्हर्च्युअल रिअॅलिटीचा एक डेमो दिला.
येत्या वर्षभरात जगभर फाइव्ह जी सह या व्हच्यरुअल रिअॅलिटीची धूम असेल अशी सध्या चर्चा आहे.
हे प्रकरण नक्की काय आहे?
 
भविष्य आभासी आहे!
 
- ऑक्सिजन टीम

Web Title: Feeling of Thrill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.