गोव्यात भेटली फेनी
By admin | Published: February 15, 2017 05:25 PM2017-02-15T17:25:03+5:302017-02-15T18:05:13+5:30
‘चावडी बाजार बसस्टॉप हाच का?’ ‘... हो.’ ‘ही बस इथे थांबेल?’ तिनं समोर धरलेल्या तिकिटावर लिहिलंय, सरस ट्रॅव्हल्स. पॅसेंजर : फेनी डिमेलो, जर्नी : गोवा टू बँगलोर.
- प्रसाद सांडभोर
‘चावडी बाजार बसस्टॉप हाच का?’
‘... हो.’
‘ही बस इथे थांबेल?’
तिनं समोर धरलेल्या तिकिटावर लिहिलंय, सरस ट्रॅव्हल्स.
पॅसेंजर : फेनी डिमेलो, जर्नी : गोवा टू बँगलोर.
‘... हो.’
‘आर यू शुअर?’
‘येस. मी बँगलोरहून आलो तेव्हा इथेच उतरलो होतो.’
‘ओह - ओके... तू बँगलोरचा आहेस?’
‘बँगलोर’चा नाहीये - पण सध्या बँगलोरला काम करतो आणि तू ?’
‘अं.. मी लंडनला राहते. आॅगस्टपासून भारतात आहे - कोचीला - आश्रमात शिबिरासाठी आले होते. त्यानंतर गेली काही महिने नुसती भटकतेय... ’
‘‘कसलं भारी! काय काय पाहिलंस आत्तापर्यंत?’
‘अं.. सगळ्यात आधी कोची. मग कन्नूर, अलेप्पी, कन्याकुमारी, पॉण्डिचेरी, कोडाईकनाल, कूर्ग, हंपी, गोकर्णा आणि मग इथे - गोवा!’
‘बाप रे !, मी फक्त पॉण्डिचेरी आणि गोवा फिरलोय आजवर - भारतातच राहत
असूनसुद्धा! मग.. इथून पुढे काय प्लॅन?’
‘...पुढे प्लॅन. उद्या रात्रीची रिटर्न फ्लाइट. बँगलोरहून...’
‘ ओह, दॅट्स सॅड. काय करतेस तू लंडनला?’
‘ काम?, आॅगस्टपर्यंत मी एका आर्ट गॅलरीत क्युरेटर होते. पण इतकी लांब सुटी हवी होती म्हणून जॉब सोडून दिला. आता परत गेल्यानंतर काय करायचं अजून नक्की नाहीये. कदाचित थोडं शिकेन पुढे किंवा काहीतरी सुरू करीन स्वत:चं. या प्रवासात इतकी बदललेय मी! यापुढे कुणा बॉसच्या हाताखाली काम नाही जमणार ! बस येतेय बघ, माझी आहे का?’
‘...अं - नाही. ही विरल ट्रॅव्हल्स. माझीवाली. तुझी मोस्टली हिच्यानंतर येईल.’
‘ओह - ओके...’
‘चलो, मस्त वाटलं भेटून - हॅप्पी जर्नी! बाय!’
‘सेम हिअर! हॅप्पी जर्नी टू यू टू! बाय बाय!’’