फायनल परीक्षा
By admin | Published: May 26, 2016 11:12 PM2016-05-26T23:12:47+5:302016-05-26T23:12:47+5:30
पुन्हा नॉर्मल रुटीन सुरू झालं. अभ्यास, परीक्षा, करिअर ही मोठीच टेन्शन्स आता पिच्छा पुरवायला लागली.
Next
>- शची मराठे
पुन्हा नॉर्मल रुटीन सुरू झालं.
अभ्यास, परीक्षा, करिअर
ही मोठीच टेन्शन्स आता
पिच्छा पुरवायला लागली.
डोक्यावर केसांनी
आणि डोक्यात नव्या प्रश्नांनी
पुन्हा फेर धरला.
कॅन्सर डेज्
ऐन विशीत कॅन्सरशी सामना करून
मिळवलेल्या हिमतीची जिगरबाज गोष्ट
डॉक्टर म्हणाले,
‘ऑल इज वेल’!
कॅन्सरचे दिवस संपले. ‘ऑल इज वेल’ आता पुढे काही ट्रीटमेंट घ्यायची गरज नाही. फक्त वर्षातून दोन वेळा फॉलो अपसाठी यायचं. पण हेल्थ सांभाळायची. नो स्ट्रेस..’
- हे शब्द होते डॉ. राजेंद्र बडवे यांचे.
आठ महिन्यांपूर्वी याच ठिकाणी उभं राहून त्यांनी मला कॅन्सर असल्याचं सांगितलं होतं. आणि आता मी पूर्णपणो बरी झाल्याचंही ते सांगत होते. तेव्हाही माङया डोळ्यात पाणी होतं आणि आत्ताही!
‘पण.’ ते पुढे म्हणाले, ‘तुमची केस आम्ही जेनेटिक्स विभागाला रेफर करतोय. कारण तुमच्या घराण्यात कॅन्सरची हिस्ट्री आहे’. (ओह!! मी पण हिस्ट्रीमध्येच एम.ए. करतेय. मी मनातल्या मनात एक जोक मारला आणि पुन्हा लक्षपूर्वक ऐकू लागले.) तुम्ही जेनेटिक्स कौन्सिलिंगसाठी गेलं पाहिजे. मी आणि बाबांनी मान डोलावली. ‘कारण तुम्हाला आणखी एक मुलगी आहे ना, म्हणून प्रिव्हेंटिव्ह केअर.’
बाबांनी लगेचच बहिणीला बोलावून घेतलं. जेनेटिक्स विभागाचे मुख्य डॉ. सरीन आणि त्यांच्या टीमला आम्ही भेटलो. डॉ. सरीन मला भेटायला खूप उत्सुक होते. कारण मला कॅन्सर झाला तेव्हा माझं वय फक्त 22 वर्षे होतं. त्यांच्या आजवरच्या प्रॅक्टिसमधली इतक्या कमी वयाची ब्रेस्ट कॅन्सरची मी बहुदा पहिलीच पेशण्ट होते. ब्रेस्ट कॅन्सरला मानवी शरीरातील डीएनएमधील नेमके कोणते जीन्स कारणीभूत असतात, यावर त्यांचं संशोधन चाललं होतं. त्यांनी माझं ब्लड सॅम्पल घेतलं. बहिणीचंही घेतलं. आता आमच्या दोघींच्याही डीएनए टेस्ट होणार होत्या. बाबा या सगळ्या संशोधनामुळे एकदम खूश होते. मग त्यांचं आणि डॉ. सरीन यांचं कोकणस्थ ब्राrाण कुठून आले, ज्यू आणि आर्य यांचं भारतातील कोकणस्थ ब्राrाण यांच्याशी काय कनेक्शन, अशी बरीच संभाषणो झडू लागली. या सगळ्यात जवळपास तास गेला. पुढे पुढे तर बाबा इतके एक्साइट झाले की माझंही ब्लड सॅम्पल घ्या, मी तयार आहे असं म्हणाले. त्यावर डॉक्टरांनी नम्रपणो नाही सांगितलं, कारण या कॅन्सरचा उगम आईकडून झाल्याचं चित्र स्पष्ट होतं.
मी टाटामधली शेवटची कॉफी पिऊन घेतली.
आम्ही निघालो, घरी जाण्यासाठी. उद्या परत न येण्यासाठी.
दुपारचे तीन वाजले असतील. रस्ता तसा शांत होता. मी बाहेर पडल्यावर टाटाच्या बिल्डिंगकडे वळून पाहिलं. मला थोडसं वाईट वाटतं होतं. माझं मलाच आश्चर्य वाटलं. गेल्या आठ महिन्यातलं रु टीन आता थांबलं होतं. आता बेड पकडण्यासाठी धावायची गरज नव्हती. सुई आणि सलाईन नव्हतं. रेडिएशन नव्हतं. उलटी नव्हती. ओपीडी बाहेरच्या रांगेत वाट पाहणं नव्हतं. फिनेलचा वास नव्हता. आठ महिन्यांपूर्वीची ‘मी’ आता पुन्हा मी होणार होते. ‘थॅक्स टाटा’ मी मनातल्या मनात म्हटलं आणि टॅक्सीत बसले. टॅक्सी घराच्या दिशेनं धाऊ लागली. कोप:यावर एक फुट वेअरचं दुकान दिसलं. मी इथून हाय हिल्स सॅण्डल घेतले होते. आणखी पुढे गेल्यावर चित्र थिएटर दिसलं, एकदा रेडिएशन संपल्यावर मी आणि मुकेशनं इथं सिनेमा पाहिला होता. मे ते डिसेंबर या आठ महिन्यांच्या काळात माङया ब:याच आठवणी जमा झाल्या होत्या. आता त्या ठिकाणी परत जाणं होईल, पण संदर्भ बदललेला असेल.
डोक्यावर एव्हाना केसांची बारिक जाळी तयार झाली होती. आता टक्कल दिसत नव्हतं. डोक्याला जाणवणारा वारा बंद झाला. आता आरशात बघायला आवडू लागलं होतं. वीग घालून बाहेर जायला लाज वाटत नव्हती. त्यावर स्कार्फबांधणं मी बंद केलं. वीग सरकला तरीही भीती वाटत नव्हती. कारण आता वीगच्या आत माङो खरे केस होते. काळे, मऊसूत, मी रोज श्ॉम्पू लावून धुवायचे. कितीतरी दिवसांनी मी अशी डोक्यावरून अंघोळ करत होते. एप्रिलमध्ये एम.ए. ची फायनल परीक्षा होती आणि जर्मनचीही. मला अभ्यासाचा जाम कंटाळा आला होता. गेले आठ महिने जाम बागडले होते मी. त्यामुळे अभ्यासाला बसणं, हातात पुस्तक धरणं, लक्ष देणं खूपच कठिण जात होतं. घरी अभ्यास होईना, तेव्हा युनिव्हर्सिटी लायब्ररीत जायला सुरुवात केली. त्यानिमित्तानं मुकेशही भेटायचा. त्याच एम. कॉम. संपलं होतं. तो नोकरी करत होता. त्याला पुढे एमबीए करायचं होतं. त्याबद्दल तो मला विचारायचा. मला माझाच अभ्यास बोअर झाला होता. त्यात त्याच्या एमबीएच्या गप्पा. जाम इरिटेट व्हायचं.
एम.ए. नंतर पुढे काय? मी काहीच ठरवलं नव्हतं. कॅन्सरचे दिवस चांगले गेले होते. पण या परीक्षा आणि करिअरच्या टेन्शननं मी चांगलीच दमत होते. दिवस पुढे सरकत होते. आता केस कानापर्य़ंत चांगलेच वाढले होते. त्यामुळे वीगची ग्रीप सैल पडू लागली. आता वीगला गुडबाय म्हणायची वेळ आली होती तर, मला भीती वाटत होती. सोसायटीतील सगळी दोस्त कंपनी रात्री जेवायला बाहेर जायचं ठरवत होती. तेव्हा ठरवलं रात्रीची वेळ आहे आज विदाउट वीग बाहेर जाऊन बघुयात. मनाची तयारी केली. जीन्स-टी शर्ट घातला. आता इतके कमी केस असतील तर गळ्यात, कानात काय घालायचं. चांगलं दिसेल का, लिपस्टिक लावू का, असे हजारो प्रश्न पडले होते. शेवटी फक्त खडय़ाचे कानातले घातले. तयार झाले, पण घराबाहेर पडायची हिंमत होत नव्हती. शेवटी म्हटलं, मरू दे, इतका काय विचार करायचा, बाबा ऑफिसला गेले होते. बहीण म्हणाली, एन्जॉय!!
बिल्डिंगच्या खाली आले. केसांना एकदम गार वारा लागला. लांब सगळे मित्र-मैत्रिणी जमलेले दिसत होते. एकदा वाटलं, नको ते स्टण्ट करतोय आपण. मागे फिरावं आणि वीग घालून यावं. पण तोवर मी त्यांच्यार्पयत पोहोचले होते. सगळ्यांनी आश्चर्यानं माङयाकडे पाहिलं..
- वॉव, सॉलिड दिसतेस तू -एकजण म्हणाला,
- एकदम हॉलिवूड मॉडेल. दुसरी मैत्रीण (ही मैत्रीण खूप देश फिरली असल्यानं तिचं फिरंगी ज्ञान अफाट होतं.)
- मेकओव्हर केल्यासारखी दिसतेय, मस्त
हुश्श. मी मनात म्हटलं. चला, ओळखीच्या लोकांनी तर कौतुक केलं. एक लेव्हल पास.
हॉटेलमध्ये पोहोचलो तेव्हा इतकी लोकं पाहून मी जाम बावरून गेले. ही सगळी लोकं माङयाकडे विशेष करून माङया डोक्याकडे बघताहेत असंच वाटायला लागलं मला. पण खरं तसं नव्हतं. सगळी लोकं आपापल्या पुढय़ातलं सूप, स्टाटर्स, पनीरची भाजी, जिरा राईस खाण्यात दंग होते. मला खूपच बरं वाटलं. माझा कॉन्फिडन्स वाढला. मग हळूहळू मी लायब्ररीत पण वीग न लावता जाऊ लागले. खूप छान वाटतं होतं. हलकं, फुलकं. मान सटासट कुठेही वळवता येत होती. नो टेन्शन. ओळखीच्या अनेकांनी विचारलं, अचानक बॉयकट का केला!
मी सांगायचे, उन्हाळा किती आहे, किंवा मला कधीपासून करायचा होता, सहज केला. काही मैत्रिणींना माझं कौतुक वाटायचं.
सही यार, कसं जमलं तुला.. मला तर आई-बाबा परवानगीच देणार नाहीत. (मी (मनात)-का?)
माङया बॉयफ्रेंडला लांबच केस आवडतात (मी (मनात)
-मग त्याला वाढवायला सांग),
बापरे, आमचं भांडणच होईल, मी तुङयासारखे केस कापले तर. (मी (मनात )-मग सोड त्याला)
अशा चर्चांच्या फैरी झडायच्या. पण माझं दु:ख मलाच माहीत होतं. आता मी कधीच केस कापणार नाही, पार जमिनीला टच होतील इतके वाढवणार. मी मनाशी ठरवलं. केस हळूहळू वाढत होते आणि त्यामुळे माझा आत्मविश्वासही. कॅन्सर असतानाचं रु टीन मागे पडलं. नव्या रु टीनमध्ये मी रुळायला लागले. अभ्यास, परीक्षा, परीक्षा संपल्यानंतरचं सुट्टीचं प्लॅनिंग आणि ऑफकोर्स, डेटिंग तर सुरू होतच.
( कॅन्सरशी यशस्वी लढा देऊन आशावादी जगणं जगणारी शची ही एक मुक्त पत्रकार आहे. आणि न्यूज चॅनलमध्येही तिनं काम केलेलं आहे.)