दिल ढुंढता है.
By admin | Published: October 23, 2014 03:31 PM2014-10-23T15:31:26+5:302014-10-23T15:31:26+5:30
चल ना यार, उद्या सकाळी, मिसळ खायला जाऊ? नेहमीचा अड्डा!’
Next
चल ना यार, उद्या सकाळी, मिसळ खायला जाऊ? नेहमीचा अड्डा!’
माङया मैत्रिणीनं, प्रियानं परवाच आमच्या व्हॉट्स अॅपच्या ग्रुपवर मेसेज टाकला.
धडाधड सगळ्यांनी थम्स अप करत नाईस आयडिया म्हणत आयडिया उचलूनही धरली.
मग पुढचा टप्पा.
कुणाकुणाला जमेल?
झालं, एकेक करत सगळ्याजणी गळायला लागल्या.
कॉलेज संपून दोन-दोन वर्ष झाली,
जी ती नोकरीला लागली.
पैसे बरे मिळायला लागले, कुणी कुणी प्रेमात पडल्या, कुणाची लगA झाली.
सगळ्या म्हणायला मार्गी लागल्या, सेटल झाल्या.
करिअर करायचं म्हणत धावत सुटल्या.
आणि उद्या सकाळी भेटायचं या प्रश्नाच्या उत्तरादाखल मिळू लागली ती फक्त कारणं.
उद्या? उद्या नाही गं-डेडलाइन आहे डोक्यावर?
उद्या नको, परवा माझंही एक प्रेङोंटेशन आहे.
ऑडिट सुरूये आमचं, मरायला फुरसत नाही.
माझी तर उद्या महत्त्वाची मिटिंग आहे, बॉस नुस्ता रगडा मारतोय, नको जीव करुन सोडलंय आम्हाला.
किती कारणं, इतकी मोठी यादी की,
प्रियालाच असं झालं की झक मारलं आणि मिसळ खाऊ म्हटलं.
******
हे असं आता नेहमीच होतं.
सध्या काय विशेष असं कुणी विचारलंच तर, उत्तर साच्यातलंच, काही नाही नेहमीचंच.
विशेष काही नाही.
पण रोजच्या आयुष्यात कुणालाच मरायलाही फुरसत नाही.
ढकलतोय रोजचा दिवस असं कधीतरी वाटतं,
पण एरव्ही दिवस कधी उजाडला कधी मावळला कळतही नाही.
कित्येक दिवसांत सकाळी सूर्योदय पाहिलेला नाही,
संध्याकाळ कशी होते हे तर माहितीच नाही.
कित्येक दिवसांत मित्रंशी निवांत फोनवरसुद्धा गप्पा मारलेल्या नाही, कट्टय़ावर भेटलेलो नाही, कुठला प्रवास नाही.टाइमपास म्हणून काहीच केलेलं नाही.
कॉलेजात असताना तासंतास गप्पा व्हायच्या, खिदळणं व्हायचं, विषय संपायचे नाहीत, आता मित्रमैत्रिनींशी भेटले तरी किंवा फोनवर बोलत असलो तरी चारदोन वाक्यांनंतर लगेच एकच प्रश्न येतो,
‘और क्या?’ ‘काय विशेष?’
आणि मग तीच टेप पुन्हा लागते, करिअर, तिथली स्पर्धा काम, आपल्यावर असलेला कामाचा भार, स्ट्रेस, न संपणारं काम, पाय ओढणारे कलिग्ज, छळणारा बॉस, ऑफिसातलं पॉलिटिक्स.
आणि सा:यांच्या शेवटी एकच भरतवाक्य.
कॉलेजातले दिवस काय भारी होते नाही, नुस्ती धमाल, आता काय नुस्तं पळतोय.
******
पण पळून पळून कुठं पळतोय आपण.
स्वत:ला बर्न करतोय म्हणजे किती बर्न करतोय, कशासाठी करतोय.
किती ती हूसहूस, किती ती दमछाक.
किती तो भयंकर आटापिटा सगळंच करण्याचा.
हा असा विचार केला की मला आठवतं, ये जवानी है दिवानीमधला तो एक सीन आठवतो. उदयपूरमधला. बनी आणि नयना आदितीच्या लगAासाठी उदयपूरमध्ये आलेले असतात. सारं उदयपूर पहायचं म्हणून फिरत असतात.आणि मग एका संध्याकाळी सनसेट पहायला एका टेकडीवर जाऊन बसतात.
नयना शांतपणो मावळता सूर्य पाहत असते.बनी मात्र रेस्टलेस होतो म्हणतो अमूक एक पहायचं राहिलंय, ते ही राहिलंय, लेझर शो मिस होईल चल लवकर..
नयना मात्र म्हणते, ‘बस रे, कंपलसरी आहे का आपण सारं पाहणं.’
बनी तिला ही भलीमोठी लिस्ट दाखवतो, हे एवढं सारं पाहणं बाकी आहे म्हणतो.
नयना ती लिस्ट त्याच्या हातातून घेते आणि फेकून देते म्हणते, बघ आता काहीच नाही उरलं पहायचं, संपली यादी. त्याला ते कळत नाही.
मात्र ती सांगते त्याला, ‘ कशासाठी एवढा अट्टाहास, सगळंच पहायची आणि करायची घाई, त्यापेक्षा आपण आज जिथं आहोत ते, तो क्षण आपण पूर्ण आनंदानं जगू नाही शकत नाही.जिथं आहोत, ते अनुभवू नाही शकलो तर या यादीइतकंच कोरडं होईल ना सारं.’
नयनाचं म्हणणं आपल्याला पटतं, पण वळत नाही. कारण आपल्यातला बनी आपल्या शांत बसू देत नाही.
त्याला सतत धावायचंय.
त्या धावण्यालाच तो जगणं म्हणतोय.
आणि काहीच न अनुभवता, न जिरवता तो त्या सगळ्या धकाधकीत ‘बर्न आउट’ होतोय.
थकतोय. कंटाळतोय आणि गमावून बसतोय आपल्यातलं कोवळेपण.
******
सो बॉस, नो मोअर बर्नआउट फिलिंग.
मी जरा तरी रिलॅक्स करणार आहेच.
कामाच्या वेळी काम, जीव तोडून काम.
पण म्हणजे कुतरओढ नव्हे.
मी मस्त सिनेमे पाहणार, फिरायला जाणार, एक नाही वाटलं तर दोन प्लेट मिसळ चोपणार, मित्रंना खिलवणार.
मैत्रिणींशी भरपूर गॉसिपही करणार.
मी जगून घेणार.
सोडणार मोकळं स्वत:ला.
मला आता वाटू लागलंय की, मोठं होणं, यशस्वी होणं म्हणजे जळून कोळसा होणं नव्हे.
मला नकोय ही बर्नआउट राख.
त्यापेक्षा मी फुल होऊन उमलेल.
आणि ‘फुरसत’ शोधेल आयुष्यात.
अजिबात कुढत नाही बसणार की,
दिल ढुंढता है फिर वहीं, फुरसत के रान दिन.