लवचिक

By Admin | Published: November 27, 2014 09:51 PM2014-11-27T21:51:06+5:302014-11-27T21:51:06+5:30

नव्या काळात फ्लेक्झिबल असलं पाहिजे, असे उद्गार तुम्ही येता जाता ऐकत असाल. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता या शब्दाला कार्पोरेट जगात फार महत्त्व आलंय.

Flexible | लवचिक

लवचिक

googlenewsNext
>विनोद बिडवाईक -
नव्या काळात फ्लेक्झिबल असलं पाहिजे, असे उद्गार तुम्ही येता जाता ऐकत असाल.
फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता या शब्दाला कार्पोरेट जगात फार महत्त्व आलंय. लवचिकता म्हणजे काय तर पारंपरिक पद्धती न स्वीकारता समोर येणार्‍या बदलांना सामोरं जाण्याची वृत्ती.  वेगवेगळ्या  वृत्ती - प्रवृत्तींसोबत डील करतांना तुम्हाला तुमच्या स्वभावातही लवचिकता दाखवावी लागते. आणावी लागते. 
संस्थेमध्ये वेगवेगळे बदल होत असतात. टेक्नॉलॉजी बदलत असते, तिच्या वापराची, कामाची पद्धत बदलते. प्रॉडक्ट लाइन बदलावी लागते.  अशावेळेस काम करण्याची पद्धतही बदलावी लागते. त्यामुळेच नव्या संदर्भात नोकरी देताना उमेदवाराचं व्यक्तिमत्त्व कितपत लवचिक आहे, तुम्ही किती वेगानं एखादी गोष्ट आत्मसात करू शकता हे आवर्जून तपासलं जातं. त्यानुसार एखादा प्रश्न विचारला जातो आणि तुमची मानसिक अवस्था जोखण्याचा प्रयत्न केला जातो.
बदल हा सृष्टीचा नियम आहे,  हे वाक्यं तर काय घासून गुळगुळीत झालं. पण माणसं सहजी बदलायला तयार नसतात. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते, तेव्हाच नाईलाजानं आपण बदल स्वीकारण्याचा, पचवण्याचा प्रयत्न करतो.
अन्यथा बदल म्हटलं की, अनेकजणांना त्रासच वाटतो. जिवावरच येतं. बदल न स्वीकारण्याची, बदल नाकारण्याचीच काही कारणं असतात. बदलण्याची, बदल करण्याचा आवश्यकता आहे याची माहितीच नसणं. हे एक मोठं कारण. उदाहरणार्थ,  उत्कृष्ट आणि यशस्वी ‘कस्टमर केअर’ प्रतिनिधी व्हायचं असेल, तर सर्व प्रथम बेसिक मॅनर्स आणि एटिकेट्सची आवश्यकता असते, पण अनेकांना हे माहितीच नसतं. त्यामुळे ते स्वत:त काही नवे मॅनर्स. एटीकेट्स रुजवतच नाही.
दुसरं म्हणजे बदलांसाठी आवश्यक ते कौशल्यच नसणं.  इंग्रजी ही सध्याची ज्ञानभाषा आहे. इंग्रजी बोलता येत नसेल तर कदाचित चांगली नोकरी मिळण्यात निश्‍चितच अडचणी येऊ शकतात. मग आपण इंग्रजी उत्तम शिकून घ्यावं. आवश्यक तेव्हा वापरावं. पण अनेकांची शिकण्याची तयारीच नसते. काहीजणांना आयुष्यात आपल्याला नेमकं काय कमवायचं आहे, हेच माहीत नसतं. तर काहींना बदल म्हटला की लगेच धोका वाटतो. रिस्क नकोच, आहे ते बरंय असंच कायम वाटत राहतं. त्यांना अपयशाचीच नाही तर यशाचीही भीतीच वाटते. अशी काही नेमकी कारणं असतात. नीट पाहिलं तर ही सारी बदल न स्वीकारण्याची कारणं मानसिक आहेत.  आपण बदललं पाहिजे हे ज्याला चटकन कळतं, जो वेळेत, स्वत:हून चांगले बदल स्वीकारतो तो पुढे जातो. मात्र अनेकजण बदलण्याची गरज जाणवत नाही, तोपर्यंत बदलतच नाहीत. नुस्तं मी बदलतो असं म्हणूनही चालत नाही. त्या बदलासाठी आवश्यक कौशल्य शिकावी लागतात. बदलानुसार होणारा खडखडाट पचवावा लागतो. 
मला सगळं येतं, माझ्या कामाची पद्धत बेस्ट असं ज्याला वाटतं, त्याचं नव्या जगात टिकणं अवघडच आहे. तेव्हा यापुढे एखाद्या ठिकाणी नोकरीला जाल, कामाविषयी, काम करण्याच्या वृत्तीविषयी प्रश्न विचारले गेले आणि तुम्हाला ती नोकरी मिळाली नाही तर त्याचा दोष मुलाखत घेणार्‍याला देऊ नका. आपण कुठे कमी पडलो आणि कुठे बदलण्याची गरज आहे, याचा विचार करा. 
बदलणं, लवचिक असणं म्हणजे आपण स्वत: नव्या जगाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणं, ते शिकावंच लागेल.
 
 

Web Title: Flexible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.