लागीर झालेल्या भय्याचा आणि गॅरीचा फ्लोरल शर्ट पाहिला का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 03:43 PM2018-11-22T15:43:26+5:302018-11-22T15:44:02+5:30
गॅरी, डॉ. साबळे आणि लागीर झालेला भय्या एकदम फ्लोरल शर्ट घालून का अवतरले?
- श्रुती साठे
इतकी र्वष फ्लोरल प्रिण्ट्सवर बायकांची मक्तेदारी होती; पण काळ बदलला आणि पुरु षांसारखे ब्लेझर, पॅण्ट, स्ट्राइप्स तरुणीही वापरू लागल्या. आताशा तर महिलांसाठीचेच रंग असे लेबल चिकटविलेले रंग पुरुषही वापरू लागलेत. पुरुषांच्या कलेक्शनमध्ये गुलाबी, जांभळ्या रंगाचे शर्ट, टी-शर्ट, फ्लोरल प्रिंटेड कुर्ता, शर्ट, जॅकेट यांचा समावेश होऊ लागला.
फ्लोरल प्रिंट हे बॉलिवूडमध्ये रणवीर सिंग, करण जोहर यांनी खूपदा अत्यंत सफाईदारपणे कॅरी केलेत; पण आता आपल्या मराठी टीव्ही सृष्टीतल्या नटांनासुद्धा फ्लोरल प्रिंट्स आपलेसे वाटू लागलेले दिसतात.
टीव्ही मालिकेमध्ये राजकारण्याची भूमिका साकारणारा किरण गायकवाड सिरिअलमध्ये नेहमीच पांढर्या ड्रेसमध्ये दिसतो; परंतु मध्यंतरी एका अवॉर्ड शोमध्ये किरण फ्लोरल प्रिंटेड वेस्ट कोट आणि त्याला कॉन्ट्रास्ट अशा निळ्या कुत्र्यात सुरेख दिसला.
माझ्या नवर्याची बायको फेम अभिजित खांडकेकर त्याच्या उत्तम स्टाइल सेन्ससाठी ओळखला जातो. मालिकेमध्ये त्याचा लूक अतिशय फॉर्मल, क्लीन फिट कपडय़ांमध्ये आहे. अभिजितने या अवॉर्ड शोसाठी निवडलेला फ्लोरल प्रिंटेड शेरवानी आणि धोती लूक त्याला शोभून दिसला.
नीलेश साबळेसुद्धा या शोमध्ये फ्लोरल प्रिंटेड वेस्ट कोटमध्ये पाहायला मिळाला. पांढर्या कुत्र्यावर त्याने वापरलेला डार्क फ्लोरल कोट हा लूक तरुणांनी नक्की ट्राय करून पाहावा असा आहे.
सणासुदीचे दिवस असले की ऑफिस, कॉलेजमध्ये हटकून ट्रॅडिशनल डे असतो. त्यावेळी समस्त तरुणांनी आपले खाकी रंगाचे नेहरू/मोदी जॅकेट बाजूला ठेवून यावेळी काहीतरी बदल म्हणून नक्की फ्लोरल प्रिंटेड जॅकेट ट्राय करावेत. ट्राय करनेमें क्या जाता है?