तडकफडक उडता टॅटू
By admin | Published: June 17, 2016 07:50 AM2016-06-17T07:50:22+5:302016-06-17T07:50:22+5:30
उडता पंजाबचा वाद कितीही चिघळला आणि चघळलेला असो, सिनेमा कसाही असो, त्या साऱ्याहून एक एकदम स्ट्रायकिंग गोष्ट दिसलीये का तुम्हाला ? उडती उडती नाही, तर ठळक दिसतेय ती गोष्ट! रटाळ चर्चा करण्यापेक्षा ती गोष्ट पहा, काहीतरी स्टायलिश सापडेल!
उडता पंजाबचा वाद कितीही चिघळला आणि चघळलेला असो, सिनेमा कसाही असो, त्या साऱ्याहून एक एकदम स्ट्रायकिंग गोष्ट दिसलीये का तुम्हाला ? उडती उडती नाही, तर ठळक दिसतेय ती गोष्ट!
रटाळ चर्चा करण्यापेक्षा ती गोष्ट पहा, काहीतरी स्टायलिश सापडेल!
तर शाहीदचे फोटो पहा.
टॅटूच टॅटू आहेत त्याच्या अंगावर! जागा मिळेल तिथं टॅटूच दिसताहेत.
मानेवर, दंडावर, छातीवर एवढंच काय पण हाताच्या बोटांवरही ते टॅटू दिसताहेत.
कुठं १० डिजिट नंबर दिलेला दिसतोय. तर कुठं लिहिलेलं आहे मम्मा दा बॉय, कुठं पंख पसरलेले दिसताहेत..
हिरो आहे की टॅटूचं पोस्टर, असा प्रश्न आपल्याला पडूच शकतो.
पण आता स्टाईल मारुपणाच करायचा म्हटल्यावर हल्ली टॅटूला पर्याय नाही.
तशीही टॅटूची क्रेझ आहे. प्रियांका चोप्रा ते अॅँजलिना जोली जो तो टॅटू गोंदवून घेत सुटलाय!
पण तुम्हाला काय वाटतं, टॅटू काढणं हे काय सोपं काम नाही!
एकतर त्यासाठी डेअरिंग लागतं, आपल्या अंगावर काहीबाही चित्तारुन घ्यायचं, ते ही कायमसाठी हे काय सोपं का नाही!
हिंमत लागतेच!
पण जगात काही दिवाने तर असेही आहेत की, त्यांनी प्रेमात पडून नावं गोंदवून घेतली आणि मग ब्रेकप झाल्यावर तो टॅटू खोडायचा कसा म्हणून वणवणत राहिले.
काहींचे टॅटूंचे नावांचे स्पेलिंगच चुकतात मग ते स्पेलिंग दुरुस्त करायचे म्हणून ते जातात आणि जास्त चुकवून ठेवतात.
अशा चुकलेल्या टॅटूंच्या अनेक कहाण्या आॅनलाइन पहायला आणि वाचायला मिळू शकतात. आणि तो प्रकार अत्यंत मनोरंजक आहे. खतरनाक विनोदी आहे.
शाहीद जरी सिनेमात टॅटूचं चालतंबोलतं पोस्टर दिसत असला तरी अशी सगळ्या अंगावर रंगरंगोटी काही फार बरी दिसत नाही, आता हे त्याला कोण सांगणार म्हणा!
-ऋषी कुलकर्णी