फोफसे - पिझ्झा, बर्गरच्या शौकीन मंडळींना एक जोरदार झटका!

By admin | Published: July 21, 2016 07:49 PM2016-07-21T19:49:40+5:302016-07-21T19:49:40+5:30

केरळ सरकारनं फॅट टॅक्सच लागू केल्यावर देशभर एक नवी चर्चा सुरू झाली, वाढत्या चरबीची, आणि त्या लठ्ठपणावर लागू होणा:या

Foze - Pizza, a bumper blow to the burgers! | फोफसे - पिझ्झा, बर्गरच्या शौकीन मंडळींना एक जोरदार झटका!

फोफसे - पिझ्झा, बर्गरच्या शौकीन मंडळींना एक जोरदार झटका!

Next
>केरळ सरकारनं फॅट टॅक्सच लागू केल्यावर
देशभर एक नवी चर्चा सुरू झाली,
वाढत्या चरबीची, आणि
त्या लठ्ठपणावर लागू होणा:या कराचीही!
वेगानं वाढणा:या चरबीवर
काही अन्य उपाय आहेत का?
 
गेल्या काही वर्षात पिङझाने सगळ्यांच्याच पोटावर राज्य केले आहे. चीज आणि डबल चीज मारके पिङझा खाल्ल्यावरचा आनंद तर काय वर्णावा. आहाहा! 
45क् ते 5क्क् रुपये वसूल होतात आपले. या आनंदात आपलं पोट फूल पॅक कधी होऊन जातं ते आपल्यालाही कळतं नाही. थोडक्यात, आजकाल सगळ्यांनाच जंकफूड आपलंस वाटू लागलं आहे. त्यामुळे होणा:या दुष्परिणामांकडे मात्र आपण सर्रास दुर्लक्ष करतोय. मात्र केरळ सरकारने लोकांची ही आवड त्यांच्या शरीरावर बराच परिणाम करतेय हे जाणून तरुणाईला जरा जास्तच मोठ्ठा धक्का दिलाय. जे लठ्ठ लोक पिङझा खाणार त्यांना 14.5 टक्के चरबी कर आता भरावा लागणार आहे. त्याला म्हटलंय त्यांनी फॅट टॅक्स !
 
अर्थात त्यावरही आता पुनर्विचार सुरू आहे. हा कर रद्द होईल की जाईल हे लवकरच कळेल!
मात्र आपल्या जनतेच्या, त्यातही तरुण मुलांच्या आहारात पिङझा, सॅण्डविचेस, बर्गर आणि टाकोज यांचं प्रमाण वाढतंय. हे सगळं मैद्याचं बनलेलं असतं. त्यात फॅट्सही भरपूर असतात. त्यामुळे लोकांमध्ये चरबी वाढण्याचं आणि त्यातून लठ्ठपणा वाढण्याचं प्रमाणही वाढतं आहे. हे लक्षात आल्यानं जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘खा, पण निरोगी खा’ या तत्त्वानुसार आता केरळ सरकारने हा कर लागू करणार असल्याची घोषणा केली.  केरळचे अर्थमंत्री थॉमस इसहाक यांच्या या घोषणोमुळे तरुणाई मात्र चांगलीच अस्वस्थ झाली आहे. सरकारवर दबाव वाढतंय की हा कर रद्द करावा.
 
त्याचं पुढे जे होईल ते होईल; पण खरंच जागतिक स्तरावरच लठ्ठपणामुळे होणारे आजार किंबहुना लठ्ठपणा हा चिंतनाचा विषय बनला आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी काय काय करता येईल यासाठी मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न होत आहेत. त्यामुळे तरुणाईनेही आता स्वत:च्या आरोग्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. आवड जपायची; पण त्याचा त्रस शरीरावर होऊ द्यायचा नाही हे तत्त्व अंगीकारलं आणि जरा कानोसा घेतला तर चरबीवर नियंत्रण ठेवणारे अनेक पर्याय आपल्याला समोर दिसतील. पण ते शोधायला तर हवे!
 
तुम्ही एक निरीक्षण केलंय का. तुम्ही भरपेट पिङझा खाल्ल्यावरही काही तासाने  सणकून भूक लागते. मग आपल्यालाही प्रश्न पडतो, अरे एवढा पिङझा खाऊन आपण उपाशीच कसे? कारण आपल्याला खुणावतो तो गरम पिङझा आणि त्यातलं भरपूर चीज.  हे जंकफू ड खाताना आपण शरीराच्या गरजेपेक्षा जास्त फॅटी पदार्थ खातोच आणि या सगळ्यामुळे होणा:या दुष्परिणामांकडे मात्र आपण सर्रास दुर्लक्ष करतोय.
 
आधीच कामाचं प्रेशर, दैनंदिन ताणतणाव यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असताना आता त्यात या पदार्थाची भर पडून आपल्या शरीराचं मैद्याचं पोतं होणं ही चिंताजनक बाब आहे. आपण जे खातो त्यातून आपल्याला काय मिळतं, याचा जरा विचार करायला हवा?
 
नुस्ती चरबीच साठणार असेल आणि ती आपल्याला फोफसं करणार असेल तर निव्वळ आवडतं म्हणून खाण्यात काय हाशील आहे? तसंही आता जगभर आहारतज्ज्ञ सांगतात की, जेही खाल ते ‘लोकल फूड’ असलं पा¨हजे. जे तुमची आजी खात नव्हती ते खाऊ नका, जे ती खात होती ते डोळे झाकून खा. हाच पौष्टिक खाण्याचा सोपा मंत्र आहे असं अनेक तज्ज्ञ सांगतात. उगीच क्रेझ म्हणून काहीबाही खात सुटायचं आणि त्यामुळे पैसे तर जास्त खर्च होतातच; पण शरीरालाही अपाय होतो, हेही जरा तपासून घेतलं पाहिजे.
 
उगीच सरकारी कारभाराची ढवळाढवळ आपल्या खाण्यापिण्यार्पयत येण्यापेक्षा आपणच आपल्या तब्येतीची काळजी घेणं उत्तम !
 
 
प्रमाणात, कधीतरी खा!
एखाद्या पदार्थावर फॅट टॅक्स बसवायला लावण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. पिङझा, पास्ता, बर्गर या पदार्थावर सरकारने लावलेला कर अतिशय योग्य आहे. कारण आपण खूपच या पदार्थाच्या आहारी जात आहोत. आपल्या शरीरात व्हिटामिन, प्रॉटिन, कार्बाेहायड्रेड आणि आवश्यकतेनुसार फॅट हे चार घटक अत्यंत आवश्यक असतात. ते संतुलित प्रमाणात घेणो अत्यावश्यक आहे. पिङझासारखे पदार्थ हे मैद्यापासून तयार होतात. त्यात फायबर कंटेट नसल्यामुळे ते पोटात आतडय़ात जाऊन गच्च बसतात. आतडय़ात छोटय़ा विलाईज असतात.
 
जर आपण असे मैदा आणि फॅटयुक्त पदार्थ खाल्ले तर तिकडेच ब्लॉक होतात. त्यामुळे शरीरात पोषकतत्त्वांचं अवशोषण होतं. परिणामी पचनसंस्थेवर आणि शरीरावर परिणाम होऊन फॅट्स वाढतात. पिङझाबरोबरीनेच प्रोसेस्ड चीजही खाल्लं जातं. त्यात मिठाचं प्रमाण 1.7क्5 असते. खरं तर आपल्या शरीराला साधारणपणो दिवसाला 2 ग्रॅमच सोडियम क्लोराइटची गरज असते. आपण त्याचाही वापर गरजेपेक्षा जास्तच करतो. या सगळ्याचा वाईट परिणाम शरीरावर होऊन लठ्ठपणा, बद्धकोष्ठता वाढते. आपल्या शरीराला फॅट्सची गरज आहेच; पण ते अतिप्रमाणातही चालणार नाही, हेही तेवढेच खरे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट खाताना प्रमाणातच खायला हवी.
कांचन पटवर्धन, 
आहारतज्ज्ञ 
 
मग पर्याय काय?
मैद्याचा पिङझाबेस वा पाव वापरण्याऐवजी गहू, नाचणी, तांदळाच्या पिठाचा वापर बेससाठी करणो सहज शक्य आहे. तर प्रोसेस्ड चीजच्या ऐवजी गाईच्या दुधाचे लो फॅट पनीर वापरता येईल. बर्गरमध्ये चीज स्लाईसप्रमाणोच पनीरचा स्लाईस देता येईल. आजकाल टोफूचाही (इंडियन कॉटेज चीज)वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो आहे.  याशिवाय मॅयोनिज म्हणून चक्क्यात मीठ, मिरची, लिंबू पिळून त्याचा डिप म्हणून उपयोग होईल.  आजकाल तर गहू आणि ओट्सपासूनही विविध पदार्थ मिळू लागले आहेत. 
 
हे कमी खा
 
मैद्याचे पदार्थ
पाव
भरपूर चीज 
मॅयोनिज
 
 
 
भक्ती सोमण
(लेखिका लोकमत मुंबईमध्ये उपसंपादिका आहेत.)       

Web Title: Foze - Pizza, a bumper blow to the burgers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.