कोरोनाकाळात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत लर्निग प्लॅटफॉर्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 05:09 PM2020-07-16T17:09:46+5:302020-07-16T17:18:09+5:30

दोन वर्षापूर्वी काही तरु ण इंजिनिअर्सनी ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व्होपा या संस्थेची सुरुवात केली. कोरोनाकाळात त्यांनी दहावीच्या विद्याथ्र्यासाठी मोफत लर्निग प्लॅटफॉर्म तयार केला आहे. व्हीस्कूल

A free learning platform for tenth graders in the Corona era | कोरोनाकाळात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत लर्निग प्लॅटफॉर्म

कोरोनाकाळात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत लर्निग प्लॅटफॉर्म

Next
ठळक मुद्दे दोन वर्षापूर्वी काही तरु ण इंजिनिअर्सनी ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व्होपा या संस्थेची सुरुवात केली.

प्रफुल्ल शशिकांत

मार्च महिन्यात नुकतीच लॉकडाऊनची सुरुवात झाली होती. आम्ही शिक्षक प्रशिक्षणाचं काम बाजूला ठेवून गरजूंना अन्नधान्याची मदत करत होतो.
पण जसाजसा लॉकडाऊन वाढत गेला, तसं आम्ही शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण कसं सुरू करता येईल यासाठी प्रयत्न करू लागलो. तेव्हा शाळा व शिक्षक जे अॅप्स वापरून शिकवत होते, शासकीय अधिकारी ज्याचा पाठपुरावा करत होते, हे अॅप्स पाहिले तर लक्षात आले की मुख्यत: व्हिडिओ व प्रशमंजूषा यांचा विद्याथ्र्यावर भडिमार होत आहे. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय दिलेले व्हिडिओ विद्यार्थी अनेकदा रँडमली पहातात, त्यात नियोजनाचा अभाव असतो,
अंतिम उद्दिष्ट काय आहे व ते साध्य होतेय का याचा अजिबात विचार नसतो असंही लक्षात आलं. त्यात स्वाध्यायाला वाव, छोटय़ा चाचण्या, गृहपाठ, तो तपासण्याची सोय, गुणांकन या गोष्टींचा प्रचंड अभाव दिसत होता. त्यात बाजारातील ऑनलाइन शिक्षणाची चांगली उपकरणं 2क् ते 5क् हजार रुपयांना. प्रत्येकाला ती कशी परवडणार? ज्या विद्याथ्र्याचे पालक सुशिक्षित नाहीत, पोटापाण्याच्या प्रश्नात अडकलेले आहेत, त्यांच्या पाल्यांना कुठलेही मार्गदर्शन
नसेल त्याचं काय होईल, ते शिकण्याच्या प्रक्रियेतून बाहेर जातील का या प्रश्नाने आम्ही अस्वस्थ झालो. 
जेव्हा गरिबाचं पोर शासकीय शाळेत जाऊन खिचडी खाऊन आलं तरी त्याच्या पालकांना समाधान वाटत असतं त्याच वेळेला श्रीमंताचं पोरं शाळेत आणि क्लासला मोबाइल, कम्प्युटर, इंटरनेट वापरून प्रोग्रामिंग इ. शिकून जगण्याच्या स्पर्धेत दहा पट पुढे गेलेला असतो. कारण त्या स्पर्धेत ही दोन्ही पोर एकाच लाइनवर ठेवून रेस सुरू करायची व्यवस्था आपल्याला प्रिय आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण व न्याय्य संधी सर्वाना परवडेल त्या दरातच मिळाली पाहिजे. वाईट वेळ आलीये म्हणून निकृष्ट दर्जाचे शासकीय/ स्थानिक अॅप्स किंवा व्हॉटसअॅप फॉरवर्डचे शिक्षण लादणं हा सामान्य विद्याथ्र्यावर मोठा अन्याय आहे.


या प्रश्नाला उत्तर देताना जन्म झाला व्हीस्कूल या प्रकल्पाचा!
बीड जिल्हा मागास म्हणून ओळखला जातो, तिथूनच या प्रकल्पाला सुरुवात व्हायला हवी, तो एक सामाजिक संदेश असेल या ध्येयाने आम्ही पछाडलो. त्याला जिल्हाधिकारी  रेखावार व मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार यांनी पाठबळ दिले.
त्यातून महाराष्ट्रातील इयत्ता दहावीच्या सर्व विद्याथ्र्यासाठी ऑनलाइन लर्निगचा प्लॅटफॉर्म मोफत उपलब्ध करून देण्यात आम्हाला यश मिळालं.
या प्लॅटफॉर्मची वैशिष्टय़ म्हणजे लॉगिन किंवा इन्स्टॉलेशनची गरज नाही, कमीत कमी इंटरनेटचा वापर, स्क्र ीन टाइम कमी - वही-पेन, कृतियुक्त अभ्यास, पालक-शिक्षक यांची भूमिका महत्त्वाची  व्हिडिओ सोबतच इमेजेस, ऑनलाइन टेस्ट यांचा वापर
गेल्या 30 दिवसात 16 लाखांहून अधिक पेज व्ह्यूज, दीड लाखाहून अधिक विद्याथ्र्यानी त्याचा वापर केला आहे. बीड जिल्ह्यातील तज्ज्ञ शिक्षकांनी वोपाचे ऑनलाइन प्रशिक्षण घेऊन केवळ एका महिन्यात हे तयार केलं. दोन वर्षापूर्वी काही तरु ण इंजिनिअर्सनी ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता
सुधारण्यासाठी व्होपा या संस्थेची सुरुवात केली. त्याचा उपयोग या कोरोनाच्या अवघड काळात आता अशाप्रकारे करता येतो आहे.


संचालक, व्होव्हेल्स ऑफ द पीपल असोसिएशन 

 

Web Title: A free learning platform for tenth graders in the Corona era

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.