जुनाट कुंड्यांचा फ्रेश मेकओव्हर

By Admin | Published: April 2, 2017 06:59 AM2017-04-02T06:59:37+5:302017-04-02T06:59:37+5:30

नुसते झाडंच नाही तर झाडाच्या कुंड्याही पाहणाऱ्याला आनंद देवू शकतात. फक्त त्यासाठी जुनाट आणि मातकट कुंड्याचं रूपडं तेव्हढं बदलता यायला हवं.

Fresh makeover of the old knob | जुनाट कुंड्यांचा फ्रेश मेकओव्हर

जुनाट कुंड्यांचा फ्रेश मेकओव्हर

googlenewsNext

 नुसते झाडंच नाही तर झाडाच्या कुंड्याही पाहणाऱ्याला आनंद देवू शकतात. फक्त त्यासाठी जुनाट आणि मातकट कुंड्याचं रूपडं तेव्हढं बदलता यायला हवं. 

घराच्या बाल्कनीत, टेरेसमध्ये, दिवाणखान्यात सुंदर फुलझाडं, इनडोअर प्लाण्ट्स लावून आपलं घर आपण ‘हराभरा’ करत असतो. त्यामुळे घर प्रफुल्लित होतं हे खरं. मात्र ज्या कुंड्यांमध्ये ही झाडं आपण लावतो, त्या कुंड्या मात्र त्याच त्या रंगातील, मातकटलेल्या अवतारात असतात. आता या कुंड्याचाही ‘वॉव’ म्हणण्या इतपत मेकओव्हर करता येतो. 
1) कुंड्यांना प्लेन सोनेरी रंगात रंगवा. सोनेरी रंगाचा एक आपला रूबाब अन मिजास असतो. तो आपोआपच कुंडीला रॉयल लूक देतो. 
2) डेपॉज पद्धतीनं कुंडी सजवा. यासाठी मॉड पॉज नावाचा ग्लू मिळतो. तो वापरु न ब्लॅक अ‍ॅॅण्ड व्हाईट स्ट्रिप्स असलेले फेब्रिक कुंडीवर चिकटवून टाका. कुंडीचा मॉडर्न मेकओव्हर मिनिटात होऊन जाईल.
3) एखाद्या फ्लोरल प्रिंटच्या कापडावरील फक्त फुलं, पानं कापून घ्या. मॉड पॉज ग्लू वापरूनच ती कुंडीवर चिकटवा. मात्र चिकटवण्यापूर्वी कुंडीला क्र ीम, आॅफ व्हाईट अ‍ॅक्र ेलिक रंगाचा कोट बॅकग्राऊंड म्हणून द्या. फुलांचा बहर कुंडीत आणि कुंडीबाहेरही दिसेल.
4) बांधकाम करताना वापरले जाणारे प्लॅस्टरही कुंडी डेकोरेट करु शकतो. त्यासाठी प्लॅस्टर आॅफ पॅरिस सूचनेनुसार पाण्यात मिक्स करा. त्यात काळा, ब्राऊन आणि हिरवा रंग घाला (प्रमाण अनुक्र मे 1:2:2), थोडी बारीक वाळू घाला. हातानं कालवा. या मिश्रणाचा थर कुंडीवर सर्व बाजूनं लावा. हा थर चांगला वाळू द्या. जास्तीचा थर सॅण्ड पेपरनं घासून काढून टाका. कुंडीला एकदम अ‍ॅण्टिक लूक मिळेल.
5) कुंडीवर पांढऱ्या रंगाचा प्लेन कोट देऊन घ्या. चांगला वाळला की, सोनेरी रंगाच्या मार्करनं त्यावर रेषांच्या सहाय्यानं जाळीचे डिझाईन (हेरिंगबोन) साकारा. 
6) सध्या तपमानाच्या पाऱ्याने सगळीकडेच चाळीशी ओलांडली आहे. अशा रणरणत्या उन्हात घरात सॉफ्ट लूक हवा असेल तर कुंड्यांना पेस्टल कलर्समध्ये (अगदी फिकट आकाशी, गुलाबी, क्र ीम) रंगवूून घ्या. रणरणत्या उन्हात नुसतं कुंड्याकडे बघूनही मग हायसं वाटतं. 
7) एका कुंडीला प्लेन रंगात (शक्यतो ब्राईट कलर्स वापरा) रंगवून घ्या. नंतर टेराकोटाचीच प्लेट (डिनर प्लेट नाही), जी चिमण्यांकरिता पाणी ठेवण्यासाठी वापरतो तिलाही रंगवून घ्या. वाळल्यानंतर कुंडी पालथी घाला आणि त्यावर प्लेट पालथी घालून चिकटवून घ्या. कुंडीसाठी छान स्टॅण्ड तयार होईल!

- सारिका पूरकर - गुजराथी

Web Title: Fresh makeover of the old knob

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.