मैत्र, मज्जानी लाईफ
By admin | Published: November 27, 2014 10:07 PM2014-11-27T22:07:25+5:302014-11-27T22:07:25+5:30
हाच विषय डोक्यात चालला होता, नेमकं तेच कसं वाचायला मिळालं, असं काही वाटलं असेल तुम्हाला.
Next
डीअर फ्रेण्डस.
पाहिलंत या अंकाचं पहिलं पान !
हाच विषय डोक्यात चालला होता, नेमकं तेच कसं वाचायला मिळालं, असं काही वाटलं असेल तुम्हाला.
कारण थंडी सुरू होताच बॉडी बनाने का खयाल अनेकांच्या मनात सुरू होतोच.
आता तर काय मुलांइतक्याच मुली अत्यंत काटेकोरपणे ‘फिटनेस’चा विचार करतात. सुंदर दिसण्याच्या पलीकडे फीट अँण्ड फाईन राहणं जास्त महत्त्वाचं हे सामान्य ज्ञान तर काय आता सगळ्यांकडेच असतं.
एरव्ही आपल्या आयुष्यात जे घडतं ना, त्याच्याबरोबर उलटं या संदर्भात घडतं. म्हणजे काय तर, नेहमी आपला निर्णयच होत नाही, डिसिजनच घेता येत नाही का खरा प्रश्न असतो.
पण इथे प्रकरण त्यापेक्षा वेगळं.
आपला निर्णय पटकन होतो. एकदम फिट बॉडी करण्याचा, आहे ते वजन घटवण्याचा, नसेल ते वाढवण्याचा आणि मसल टोन करण्यापासून ते थेट स्टॅमिना वाढवण्याचा.
पण काम सुरूकेलं की घोळ, एकतर सकाळी लवकर उठण्याचा घोळ.
त्यात नियमितपणा नाहीच,
एक दिवस जोरदार खुराक, दुसर्या दिवशी फक्त वडापाव.
हे सारं कमीच म्हणून व्यायाम करताना करू नयेत अशा सार्या चुकाही आपल्या नकळत होऊ लागतात.
आणि मग उत्साह संपतो, काहीच घडत नाही म्हणून वाईट वाटतं.
असं होऊ नये म्हणून काय करायचं हे तर तुम्ही या अंकात वाचालच.
पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे.
जे ठरवाल ते नक्की करा, जान है तो जहान है.!