विशीतल्या सहा मित्रांची दोस्ती

By admin | Published: February 19, 2016 02:45 PM2016-02-19T14:45:39+5:302016-02-19T15:16:59+5:30

अमेरिकन टेलिव्हिजन इंडस्ट्रीतला ख्यातनाम दिग्दर्शक जेम्स बुरोच्या सन्मानार्थ आयोजित एका कार्यक्रमात ‘फ्रेण्ड्स’ या अत्यंत गाजलेल्या मालिकेतले कलाकार नुकतेच एकत्र आले होते. त्यांच्या ‘रियुनियनची’ बातमी अनेकांच्या मनात आपल्या तरुण जगण्याच्या आठवणी जागवून गेली..

Friends of six friends | विशीतल्या सहा मित्रांची दोस्ती

विशीतल्या सहा मित्रांची दोस्ती

Next
 - अनघा पाठक
या दोस्तांनी तरुण होताना बिनधास्त जगायचं कसं हे आलम दुनियेला शिकवलंय!
 
 
गोष्ट तर पक्की राव, की आपल्याला जसं आपण पहिल्यांदा कधी बोलायला शिकलो ते आठवत नाही, फ्लॉवरची भाजी नक्की कधीपासून नावडायला आणि शेजारचा मुलगा कधीपासून आवडायला लागला, कट्टय़ावर बसून गप्पा ठोकायला, टीटीएमएम करतानाही ‘बस का भाई ! आता दोस्तीत हिशोब करतो कां’ असं कधी म्हणायला सुरुवात झाली हे आठवत नाही.
तसंच ‘फ्रेण्ड्स’ नावाच्या मालिकेचा पहिला इपिसोड कुठला, तो आपण पहिल्यांदा कधी पाहिला हे अनेकांना आठवत नाही. कधीतरी असंच ही सिरीज समोर आलेली असते. मग कुणाच्या तरी कम्प्युटरमधून उधा:या-पाधा:या करून नाहीतर एकाचा पेनड्राईव्ह दुस:याकडून घेऊन तो तिस:याला देऊन, रात्रभर जागून सगळे सीझन्स कॉपी करायचे, ते स्वत:च्या ‘पर्सनल लॅपटॉप’ किंवा ‘आयपॅड’वर ठेवून द्यायचे आणि रोज रात्री फ्रेण्ड्सचा एक तरी इपिसोड बघितल्याशिवाय झोपायचं नाही इथर्पयत जे सारं घडतं ना, ते म्हणजेच फ्रेण्ड्स!
आज पन्नास इंग्लिश चॅनेल्सवर ढीगभर सिरीयल्सचा रतीब असला तरी भारतात तुफान लोकप्रिय होणारं आणि ख:या अर्थाने आम जनतेर्पयत पोहोचणारं पहिलं इंग्लिश मिटकॉम म्हणजे फ्रेण्ड्स. त्याआधी इंग्लिश सिरियल्स, नाटकांची करमणूक ही फक्त एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती. (इंग्लिश सिनेमे चालायचे; पण त्याची ‘कारणं’ भलतीच होती.) फ्रेण्ड्सने ही मक्तेदारी मोडीत काढली आणि जोई, मोनिका चॅकलर, किबी, स्वेल नी रॉयला आपल्या गँगचा मेंबर बनवलं.
1991 साली भारतात मुक्त अर्थव्यवस्थेला कवाडं खुली झाली आणि जगायचं कसं याचे तरुण मुलांचे सारे मापदंडच बदलून गेले.  त्यानंतर बरोबर तीन वर्षानी 1994 मध्ये ही सिरीयल लॉन्च झाली. तरुण, त्यांचे मित्रमैत्रिणी आणि त्यांच्या आयुष्यात येणारे प्रॉब्लेम्स याभोवती फिरणारी ही पहिली मिटकॉन. नव्या-जुन्याच्या कात्रीत सापडलेल्या एका आख्ख्या तरुण पिढीने स्वत:ला या सिरीजमध्ये पाहिलं. जुन्या कौटुंबिक मूल्यांची चौकट सोडून नव्या स्वतंत्र आणि व्यक्तिकेंद्री लाईफस्टाईलकडे निघालेल्या भारतीय तरुणांना ही सिरीयल तुफान आवडली.
गंमत अशी आहे की, ही सिरीज बंद होऊन आता अकरा वर्ष झालीत, तरीही ती अजूनही तरुण पिढीला प्रत्येक नव्याने आकर्षित करते आहे. नव्वदचं दशक आता रेट्रो बनलंय. हिस्ट्री चॅनलसारखं चॅनल त्यावर भूतकाळ म्हणून डॉक्युमेंटरी काढतंय/ तरीही मग 2क्क्क्नंतर जन्मलेली आजची तरुण पिढीही तितक्याच प्रकर्षाने त्या सहा मित्रमैत्रिणींकडे आजही आकर्षित का होते आहे.
कारण सोपं आहे. फ्रेण्ड्सची पात्र. ते जे आयुष्य जगत जातात, त्यात मोठं होण्याचा प्रवास आहे. जो स्थळ, काळ, भाषा, संस्कृतीच्या पलीकडे जातो. स्ट्रगल आहे तो सहा भिन्न व्यक्तिमत्त्वांचा. स्वत:ला काय हवं ते फिगर आउट करण्यसाठी, आयुष्यात सेटल होण्यासाठी, प्रेम मिळवण्यासाठी, पैसा कमावण्यासाठीचा तो संघर्ष आहे.
पण या सगळ्याला एक विनोदाची झालर आहे. ‘कर लेंगे यार’ हा आत्मविश्वास आहे. पहिल्या सीझनचा पहिल्या इपिसोडमध्ये मोनिका रेचलला म्हणते, ‘वेलकम टू द रिअल वर्ल्ड, इट सक्स! बट यू आर गॉना लव्ह इट!’ 
हेच फ्रेण्ड्सच सूत्र आहे. आयुष्यात सारं काही आलबेल नाहीये; पण तरीही मजा आहे.
दुसरी गोष्ट फ्रेण्ड्सने आपल्याला दिली ती म्हणजे मित्रमैत्रिणींच्या असण्याला मान्यता. मित्रमैत्रिणी आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात किंबहुना आयुष्याच्या एका टप्प्यावर ते तुमच्या कुटुंबापेक्षाही महत्त्वाचे असतात आणि त्यात काही गैर नाही हे फ्रेण्ड्सने शिकवलं. नवस्वातंत्र्याचं वारं  लागलेल्या तरुणाईला ते अधिकच भावलं.
खरं तर काय नाही दिलं तरुण मनांना या फ्रेण्डस्ने?
सख्खे बहीणभाऊ पक्के मित्रमैत्रिणी असू शकतात हे दाखवलं. चार यार जमले की काही ना काही जुगाड करता येतो हे दाखवलं, चुकीचं करिअर निवडलं असेल तर ते बदलून पुनश्च हरिओम करता येतं हे शिकवलं. समलिंगी लोक असतात; पण तसं असणं हा त्यांचा लैंगिक कल असतो हे समजवलं. चुका करण्याचं स्वातंत्र्य दिलं. बावळटपणा करायला वावं दिला. सॉरी म्हणायला सांगितलं. सोफा सोडून जमिनीवर फतकल मारून बसायला, एखाद्या मित्रचं लव्हलाईफ कुठं अडकलं असेल तर त्यावर फिदीफिदी हसायला, नकचढय़ा मैत्रिणीच्या मदतीला अपरात्री धावून जायला. आपल्याला डोंबलं काही येत नसलं तरी तत्तवेत्त्याच्या आवेशात मित्रंना सल्ले द्यायला, तोंडावर आपटायला परत उठून उभं राहायला, काय काय नाही करायला शिकवलं आपल्याला या फ्रेण्ड्सनी!
पण त्याहीपेक्षा  महत्त्वाचा, लाईफटाईम पुरेल असा मंत्र दिला. तुझा जॉब भंगार असला तरी, तू सकाळी उशिरा उठलीस म्हणून तुला ऑफिसला उशीेर झाला तरी, तू स्वयंपाक जाळलास तर, तुङयाकडे पाच पैसे नसले तरी मित्र म्हणून तुङयासाठी मी आहे! कारण मित्र म्हणून तूही माङयासाठी आहेच. ही मैत्रीची भक्कम भावना या फ्रेण्ड्सनी अनेक तरुण पिढय़ांना मोठं होता होता दिली आहे.
 
 
 
आता ‘फ्रेण्ड्स’ होणे नाही
दहाव्या सीझननंतर ह्या सिरीजचा अकरावा सीझन कधी येणार याची कायम चर्चा होत राहिली. नवा सीझन आला आला अशा वावडय़ाही उठत राहिल्या. मात्र फ्रेण्ड्सची को-क्रिएटर मार्था काऊफमॅनने एका मुलाखीत ह्या सर्व चर्चाना पूर्णविराम  दिला. तिने सांगितलं की, फ्रेण्ड्सचा नवा सीझन कधीच येऊ शकत नाही कारण ती कथा होती विशीत असणा:या, आयुष्यात बरंच काही मिळवण्यासाठी धडपडणा:या, घरच्यांपासून दूर राहताना एकमेकांची काळजी घेणा:या दोस्तांची. ते दोस्तच एकमेकांची फॅमिली होते. पण त्या कथेत जेव्हा प्रत्येकाची वैयक्तिक फॅमिली बनली तेव्हा आम्ही थांबलो. तिथे सगळं बदललं, फ्रेण्ड्सच्या जबाबदा:या, समाजातलं स्थान, एकमेकांपासून असणा:या अपेक्षा. फ्रेण्ड्स विशीतून तिशीत गेले आणि सगळं बदललं. कदाचित विशीतून तिशीत गेल्यावर ज्या प्रमाणो फ्रेण्ड्स बदलले, त्याप्रमाणो त्यांचे प्रेक्षकही बदलत असतील. विशीतून तिशीत जाणा:या पिढीला फ्रेण्ड्स आठवणीचं गाठोडं देत असेल; पण नुकत्याच विशीत येणा:या पिढीला मात्र खुल्या दिलाने जवळ घेत असणार !  ‘या बाबांनो ! आता पुढची काही वर्ष तुम्हाला असं जगायचं आहे. इट सक्स ! बट यू आर गॉन लव्ह इट!’

Web Title: Friends of six friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.