फोन मेमरी सारखी FULL होतेय

By Admin | Published: April 2, 2015 06:03 PM2015-04-02T18:03:09+5:302015-04-02T18:03:09+5:30

मोबाइल भरपूर वापरणार्‍यांच्या आयुष्यात कठीण समय म्हणजे जेव्हा फोन म्हणतो, ‘नो मेमरी स्पेस’!!

FULL like phone memory | फोन मेमरी सारखी FULL होतेय

फोन मेमरी सारखी FULL होतेय

googlenewsNext

 -अमृता दुर्वे

मोबाइल भरपूर वापरणार्‍यांच्या आयुष्यात कठीण समय म्हणजे जेव्हा फोन म्हणतो, ‘नो मेमरी स्पेस’!!
प्रत्येकावर कधी ना कधी दर काही दिवसांनी ही अवघड वेळ येतेच. मग अशावेळी नाईलाजास्तव काही गोष्टी डीलिट कराव्या लागतात. म्हणजे काय तर व्हॉट्स अँपवर आलेले फोटो, ऑडीओ मेसेजे्स, व्हीडीओ अशा गोष्टी निवडून निवडून डीलिट करूनही खूप मेमरी स्पेस भरलेलीच असते. मग फोटोबिटो वैतागून डीलिट करून तेवढय़ापुरती गरज भागवली जाते. 
पण यावर परमण्टंट काही उपाय आहे का? तर आहे, काही सोपे अगदी सोपे उपाय आहेत.
 १) सगळ्यात आधी असं समजा की, ड्रॉप बॉक्स, गूगल ड्राईव्ह, गूगल प्लस अल्बम्स हे तुमचे बेस्ट फ्रेण्ड्स आहेत. तुमच्या फोटोंचा ऑटो बॅकअप या तीनपैकी कोणत्यातरी सेवेला द्या. २) गूगल प्लसवर तुम्ही सगळे फोटो अपलोड करूनही प्रायव्हेट ठेवू शकता. त्यामुळे तुमच्या फोनमधले फोटो तुम्हाला सहज डीलिट करता येतील आणि गरजेच्या वेळी ते तुम्हाला चटकन मिळतीलही. बहुतेकांच्या फोनमध्ये सगळ्यात जास्त जागा फोटोच खातात. फोटो कमी केले की मेमरी फ्री होईल!
३) ड्रॉप बॉक्स आणि गूगल ड्राईव्हवर तुम्हाला इतरही फाईल्स ठेवता येतील.  हे करूनही जर मेमरी स्पेस पुरत नसेल, तुमच्या फोनमध्ये आणखीन जास्त कपॅसिटीचं मेमरीकार्ड घालता येणार नसेल किंवा तुम्हा मोटो-जी किंवा ई वापरत असाल तर हा मेमरी वाढवण्याचा ऑप्शनच नसेल, तर मग काय??
 
लक्षात ठेवा OTG
 
OTG केबल
ही केबल जादूच्या कांडीचं काम करेल. या केबलमुळे तुम्हाला तुमच्या फोनला पेनड्राइव्ह जोडता येईल. केबल घ्या. पेनड्राइव्ह  लावा आणि हवा तेवढा, हवा तसा डेटा साठवा किंवा ट्रान्सफर करा. मेमरी स्पेसची अडचण कधी येणारच नाही आणि ही ओटीजी केबल ऑनलाइन अगदी दीडशे रुपयांपासून उपलब्ध आहे. काही दुकानांमध्ये याहीपेक्षा स्वस्त मिळू शकेल.
OTG पेनड्राइव्ह
 
केबल लावण्याची झंझट करायची नसेल तर मग विकत घ्या ओटीजी पेनड्राइव्ह. हा पेनड्राइव्ह थेट तुमच्या फोनला अटॅच होईल आणि तुम्हाला डेटा अँक्सेस करता येईल. सध्याच्या बहुतेक सगळ्या फोन्सना हा ओटीजी पेनड्राइव्ह लावता येतो. साधारण: ५00 रुपयांपासून असे पेनड्राइव्ह मिळतात. मेमरीचा प्रॉब्लम सॉल्व!!

Web Title: FULL like phone memory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.