गार्बिनी मुगुरुझा तिला भेटाच.
By admin | Published: June 10, 2016 11:48 AM2016-06-10T11:48:42+5:302016-06-10T11:48:42+5:30
गार्बिनी मुगुरुझा नाव गेलंय ना कालपरवापासून कानावर? नसेल गेलं तर तिच्याविषयी जरुर माहिती करून घ्या. नुकतीच ती टेनीसची सम्राज्ञी, वर्ल्ड नंबर वन बनली आहे.
Next
>गार्बिनी मुगुरुझा
नाव गेलंय ना कालपरवापासून कानावर? नसेल गेलं तर तिच्याविषयी जरुर माहिती करून घ्या.
नुकतीच ती टेनीसची सम्राज्ञी, वर्ल्ड नंबर वन बनली आहे. दी ग्रेट सेरेना विल्यम्सला फ्रेंच ओपनमध्ये धूळ चारत तिनं पहिलं ग्रॅण्ड स्लॅम जिंकलं.
तिच्याविषयी माहितीच असाव्यात अशा या 5 गोष्टी.
1) दोन देशांची नागरिक
गार्बिनीचे वडील स्पॅनिश, आई व्हेनेझुएलन. वयाच्या सहाव्या वर्षी ती स्पेनमध्ये रहायला गेली. आणि तिस:या वर्षी टेनीस रॅक हातात घेत तिचं प्रशिक्षण सुरू झालं. दोन दोन देशांचा वारसा लाभल्यानं गार्बिनी या दोन्ही देशांची नागरिक आहे.
2) सुपरटॉल
ती सुपरटॉल आहे. उंचंच उंच. सहा फूट उंच आहे. त्यामुळे टेनीस कोर्टवरही अतीउंच खेळाडू म्हणून तिची नोंद आहे.
3) अत्यंत वेगानं श्रीमंत होणारी खेळाडू
जगभरात जे खेळाडू वेगानं श्रीमंत होतात त्या टेनीसपटू अव्वल असतातच. मात्र त्यांच्यातही गार्बिनी अतीव वेगानं श्रीमंत होत आहे. हे ग्रॅण्डस्लॅम जिंकत तिनं 89 लाख डॉलर्सची कमाई केली आहे. यापुढे जाहिराती, ब्रॅण्डस प्रमोशन हे सारं निराळं. अत्यंत श्रीमंत व्यक्तींमध्ये आजच तिची गणना होते आहे.
4) पहिलं ग्रॅण्डस्लॅम
तिनं फ्रेंच ओपन जिंकून पहिलंच ग्रॅण्ड स्लॅम जिंकलं असलं तरी सेरेना विल्यम्सला हरवल्यानं आणि ते ही फ्रेंच कोर्टावर, त्यामुळे तिची जगभर चर्चा आहे.
5) स्वयंपाक येतो, पण फक्त गोडाचा!
अर्थात तिला स्वयंपाक करता येतो. पण फक्त स्पॅनिश स्वीट्स बनवता येतात. बाकी रोजचा स्वयंपाक काही जमत नाही असं ती सांगते!