कोरोनाकाळात जॉब मिळवण्यासाठी, आहे तो टिकवण्यासाठी आवश्यक 10 स्किल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 05:36 PM2020-08-20T17:36:19+5:302020-08-20T17:43:54+5:30

फक्त टेक्नॉलॉजीवाल्यांना काम मिळेल आणि बाकीचे सगळे ‘बिनकामाचे’ असं काही होणार नाही; पण जर ‘ही’ कौशल्यं हातात नसतील तर निभाव लागणं अवघड आहे.

To get a job in Corona time, 10 Must skills needed to sustain | कोरोनाकाळात जॉब मिळवण्यासाठी, आहे तो टिकवण्यासाठी आवश्यक 10 स्किल्स

कोरोनाकाळात जॉब मिळवण्यासाठी, आहे तो टिकवण्यासाठी आवश्यक 10 स्किल्स

Next

- नितांत महाजन

कोरोनाची भीती, त्याहून मोठी भीती हाताला काम मिळेल की नाही?
नोकरी मिळेल की नाही?
आहे ती नोकरी टिकेल की नाही?
आणि करिअर? पगारवाढ? प्रमोशन?
ही सारी तर आता स्वप्नात भेटावेत असे शब्द आहेत. कारण प्रत्यक्ष आयुष्यात पगारकपात घेऊन नोक:या टिकल्या यातच भाग्य मानणारे अनेक आहेत.
मात्र मग येत्या काळात नोकरी मिळायची, टिकायची, करिअर करायचं तर हातात काय हुनर हवा?
सगळ्यांनाच टेक्नॉलॉजी जॉब्ज मिळतील का?
हे कितीही खरं असलं की जग डिजिटल होतं आहे. डिजिटल जगात ऑनलाइन व्यवहार, तंत्रज्ञान यांना मोठं महत्त्व येणार आहे, तरीही सगळेच काही तंत्रज्ञानात काम करूशकत नाहीत.
मात्र तेच आणि एकमेव स्कील असलं तर नोक:या मिळतील आणि बाकी काही नको असंही नाही.
येत्या काळात एम्प्लॉएबल व्हायचं, नोकरीसाठी पात्र ठरायचं तर अजून काही कौशल्यं आपल्याकडे हवीत.
ती कोणती?
कोरोनानंतरच्या जगात ही टॉप टेन स्किल्स अनेकांना उत्तम संधी देतील अशी शक्यता आहे.
मात्र त्यासाठी ती कौशल्यं आपल्याकडे हवी किंवा ती शिकून तरी घ्यायला हवीत.

1. सेल्फ मोटिव्हेशन

सतत कोण आपल्याला प्रेरणा देणार, कुठून सतत सेल्फ हेल्प बुक्स वाचत बसायची? त्यावर उपाय हाच की आपणच आपल्याला प्रेरणा द्यायचं. हरायचं नाही. लढायचं.
आणि अत्यंत पॉङिाटिव्हली, एकेक पाऊल पुढे जात राहायचं.
असे स्वयंप्रकाशित दिवेच आपली वाट आणि आपला प्रकाश दीर्घकाळ शोधत पुढे जातात.

2. कल्पकता
कल्पकता म्हटलं तर सगळ्यांकडेच असते; पण लोक काय म्हणतील या भीतीपोटी आपण वेगळा विचार करत नाही. प्रत्येक गोष्टीचं उत्तर शोधताना, नव्यानं विचार करताना जरा डोक्याला चालना दिली तर त्या कल्पकतेतून आपल्याला अनेक पर्याय सापडू शकतात.

3. चिकाटी
त्याबाबतीत आपण अगदी राहुल द्रविडला गुरु करावं हे उत्तम. चिकाटी आणि सातत्य या दोन महत्त्वाच्या गोष्टी. धरसोड केली, आज मूड आहे, नाहीये, जमतच नाहीये असं म्हणत रडत बसलं तर काहीच होणार नाही.
चिकटून राहायचं आपल्या कामाला, विषयाला हे एक उत्तम आणि दीर्घ फलदायी व्रत आहे.

4. टाइम मॅनेजमेंट
हा शब्दच फार घिसापिटा आहे. सगळ्यांना कळतं आपलं टाइम मॅनेजमेंट चांगलं नाही, तरीही कुणीच त्यावर धड काम करत नाही.
जे करतात ते तुफान वेगानं पुढे निघून जातात आणि तेवढय़ाच वेळात भरपूर काम करतात. जगातल्या सर्व अपयशी आणि यशस्वी लोकांकडे दिवसाचे 24 तासच वेळ असतो हे लक्षात ठेवलेलं बरं.

5. कम्युनिकेशन स्किल्स
हे अजून एक दुसरं कौशल्य, ज्याविषयी सतत बोललं जातं. सतत चर्चा, ऑनलाइन कोर्सेस पण करतात काहीजण.
पण परिणाम? शून्य असतो. साधं-सोपं, आपण जसं बोलतो तसं, अधिक प्रेमानं, खरं आणि नम्रपणो बोलणं, उत्तम संवाद साधणं म्हणजे नेमकं आणि कमी बोलणं हे जरी करायला सुरुवात केली तरी उत्तम कम्युनिकेशन स्किलच्या दिशेनं आपण जाऊ शकू.

6. लर्न-रीलर्न
आता तर पंतप्रधानांनीही सांगितलं आहे की लर्न-रीलर्न-अपस्किलिंग ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.
एक डिग्री आहे, येतं मला सगळं, मी नवीन काहीच शिकणार नाही, किंवा सतत काही काही नवीन शिकत राहीन की कशातलंच काही धड येणार नाही असं करूनही चालणार नाही.
सतत नव्या गोष्टी शिकायला उत्सुक असणं, पटकन शिकून, त्याप्रमाणो कामाला लागणं ही मनोवृत्तीच महत्त्वाची आहे.

7. मी माझं, नाय नेव्हर
टीम स्पिरीट हवं बोलणं वेगळं, पण टीममध्ये काम करणं, लोकांमध्ये राहून उठून दिसणं, टीमला सपोर्ट करणं, क्रेडिट-चुका स्वीकारणं आणि तरीही वैयक्तिक प्रगती करणं ही काही सोपी गोष्ट नाही.
त्यामुळे माझं माझं आणि वाही ओझं करण्यातही अर्थ नाही. तर सगळ्यांशी जमवून घेता येणं, त्याला पर्याय नाही. मी-माझं करत बसलात तर फसलात.

8. धोका. रिस्क वगैरे.
रिस्क घेतल्याशिवाय करिअर पुढे सरकत नाही हे खरं; पण ती केव्हा घ्यायची हे ठरवताही आलं पाहिजे.
मुळात रिस्क नोकरी बदलात घ्यायची की काम बदलात, काम नव्या पद्धतीनं करण्यात हे ठरवा.
त्याचं एकदा उत्तर मिळालं की धोका असला तरी चौका मारता येऊ शकतो.

9. स्वीकार
काही लोक फार रडे असतात. सतत रडतात. सतत स्वत:ला व्हिक्टिम समजतात. ते रडणं बंद करा. जे आहे ते स्वीकारा मग ते बदलायचं कसं याचा विचार करा. त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेत मग त्यात बदल करणं हे ही एक कौशल्य आहे.
जर बदलता आलं नाही तर मागे पडणं वाटय़ाला येतं.

10. इमोशनल इंटिलिजन्स
इथंच अनेकजण मार खातात. मन सांभाळता येत नाही, भावनांवर कंट्रोल नाही. त्यामुळे आपलं मन, भावना ओळखून, त्यांना नीट नियंत्रण ठेवून भावनिक शहाणपण शिकून घेणं, त्याप्रमाणो स्वत:च्या स्वभावातल्या चांगल्या गोष्टींचा फायदा घेऊन उणिवांवर काम करता येतं.
हे जमणं सोपं नाही; पण त्या दिशेनं विचार तरी करायला हवा.

 

Web Title: To get a job in Corona time, 10 Must skills needed to sustain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.