लग्न ठरवताय? जोडीदार कसा निवडाल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 02:54 PM2019-02-07T14:54:06+5:302019-02-07T14:54:45+5:30
जोडीदाराची ‘विवेकी’ निवड हा उपक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं राज्यभर तरुण मुला-मुलींसाठी राबविण्यात येत आहे. त्यानिमित्तानं जोडीदाराची निवड करताना काय विचार करायला हवा, हे सांगणारा हा विशेष लेख.
कृष्णात स्वाती
लग्न या घटनेला एकूणच भारतीय समाजव्यवस्थेत खूपच महत्त्व आहे. आपल्या समाजात लग्न हा केवळ दोन व्यक्तींचा मामला असत नाही तर ती दोन कुटुंबांची आणि त्याही पलीकडे जाऊन एक महत्त्वाची सामाजिक घडामोड असते. तरीही घरात ‘यंदा कर्तव्य आहे’ अशी अपरिहार्य स्थिती असल्याशिवाय आपल्याकडे सामान्यतर् लग्न या विषयाची गांभीर्याने चर्चाच होत नाही.
एकीकडे ठरवून लग्न. दुसरीकडे तरुण मुलं अनेकदा आकर्षणालाच प्रेम समजतात त्यातून पुढे लग्न होतात याविषयी पालक आणि समाज अस्वस्थ असतो. एकीकडे लग्नाची पारंपरिक पद्धत म्हणजे ‘पाहण्याचा कार्यक्र म’ करून लग्न करणं याविषयी
तरु ण पिढी, विशेषतर् मुली समाधानी दिसत नाहीत. 15 ते 20 मिनिटांच्या पाहण्याच्या कार्यक्र मात जन्मभर एकत्र राहण्याचा निर्णय घ्यायचा, माणसाची पारख कशी होणार, असा रास्त प्रश्न त्यांना पडतो. दुसरीकडे प्रेमात पडूनही निवड चुकत नाही का, असा पारंपरिक प्रश्न समोर येतो.
समाज अशा एका दोलायमान टप्प्यावर असताना 2012 साली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं ‘जोडीदाराची विवेकी निवड’ हा उपक्र म सुरू केला.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी जोडीदार निवडीविषयी काही मूलभूत मुद्दे मांडले.
ते म्हणजे - 1) प्रेम आणि आकर्षण यातील फरक समजून घेणं, 2) परस्परांची बौद्धिक, भावनिक आणि मूल्यात्मक अनुरूपता पाहणं, 3) हुंडा, पत्रिका आणि व्यसनांना नकार देणं, 4) लग्न साधेपणानं (किमान कर्ज न काढता) करणं आणि 5) आंतरजातीय, आंतरधर्मीय (जात-धर्म निरपेक्ष) विवाहाची शक्यता पडताळून पाहणं.
जोडीदाराची निवड केवळ भावनिक लाटेवर स्वार होऊन, शारीरिक सौंदर्याला भुलून किंवा केवळ भौतिक संपत्तीचा विचार करून न करता ती अधिक डोळसपणे करण्याची प्रक्रि या आहे, असा विचार या उपक्र मातून मांडला जातो. ‘संवाद’ हा या उपक्र माचा गाभा आहे. हा संवाद तीन पातळीवर घडावा असा आग्रह आहे.
संवाद कुणाशी?
तर पहिला स्वतर्शी संवाद, दुसरा कुटुंबाशी करावयाचा संवाद आणि तिसरा होणार्या जोडीदाराशी संवाद. यापैकी प्रत्येक संवाद हा प्रामाणिक आणि पारदर्शक असायला पाहिजे. स्वतर्शी केलेल्या संवादातून स्वतर्चं व्यक्तिमत्त्व कसं आहे हे समजतं. कुटुंबाशी सातत्यानं आणि संयमाने केलेल्या संवादामुळे जोडीदाराविषयीच्या आपल्या कल्पना, लग्न पद्धतीविषयी आपलं मत, सहजीवनातील जबाबदार्या, त्यासाठी आपली असलेली तयारी या सर्वाची स्पष्टता येते. तर आपल्याला अपेक्षित असणार्या जोडीदाराशी केलेल्या संवादातून आपण एकमेकांसाठी अनुरूप आहेत की नाही हे लक्षात येतं.
खरं तर जोडीदार निवडीसाठीच नव्हे तर प्रत्येक नात्यासाठी ते निकोपपणे पुढे नेण्यासाठी विशिष्ट प्रशिक्षणाची गरज असते. बदलत्या काळात अशी प्रशिक्षण तंत्नं आणि व्यक्तीही उपलब्ध आहेत. त्याचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. प्रत्येकवेळी चुका करत त्यातून शिकण्याची गरज नाही. लग्न करणं हे विहिरीत उडी मारणं असेल (प्रेम विवाहात ती उडी स्वतर् मारलेली असते तर पाहून ठरवलेल्या लग्नात कुटुंबीयांनी आपल्याला ढकलेलं असतं असं फार तर म्हणता येईल!) तर पाण्यात पडल्यावर पोहायला येईल या भाबडय़ा समजावर अवलंबून न राहाता पोहण्याचं प्रशिक्षण घेऊन उडी मारलेली कधीही चांगली. ‘जोडीदाराची विवेकी निवड’ हा उपक्र म म्हणजे जोडीदाराच्या निवडीच्या क्षेत्नातले अधिकाधिक परिपूर्णतेकडे नेणारं प्रशिक्षण आहे.
जोडीदार कसा निवडावा, याचं प्रशिक्षण म्हणजे आम्ही तयार केलेली मानवी गुणांची कुंडली. एका बाजूला शास्त्नाच्या कसोटीवर न टिकणार्या ज्योतिषाच्या कुंडलीला नकार देत असताना तिला पर्याय म्हणून आम्ही मानवी गुणांची आधुनिक कुंडली तयार केली आहे. त्यामध्ये जोडीदार निवडीविषयी कालसुसंगत आणि आवश्यक बाबींचा समावेश केला आहे. बदलत्या काळात जोडीदार निवडीच्या रुढ पद्धतींच्या पलीकडे जाऊन जोडीदाराच्या निवडीत असणारे युवक-युवतींची परस्पर संमती, त्या दोघांची लग्नानंतर येणार्या शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक जबाबदार्या पेलण्याची क्षमता, परस्परांच्या आवडी-निवडी, स्वभाव, शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि भावनिक सुदृढता, व्यक्तिगत आणि कौटुंबिक विचारसरणी, भविष्यातील स्वप्नं यांविषयीचे दृष्टिकोन यांचे महत्त्व समजून घेतलं पाहिजे. व्यसन असणं, हुंडा देणं किंवा घेणं आणि जन्मपत्रिका पाहणं या बाबींना स्पष्टपणे नकार देत शक्यतो साधेपणानं लग्न करण्याचा आग्रह केला पाहिजे. हे सर्व करत असताना कुणा एकाची फसवणूक होऊ नये, एकमेकांच्या आरोग्याची सद्यर्स्थिती समजावी, भविष्यात त्यानुसार काळजी किंवा उपचार घेता यावेत आणि सुखी संसार करता यावा यासाठी लग्न ठरवण्यापूर्वी मुलगा आणि मुलगी या दोघांचीही आरोग्य तपासणी करण्याची आवश्यकता विचार म्हणून ‘काहीजणांना’ मान्य झाली असली तरी ती सर्वमान्य होऊन कृतीच्या पातळीवरही आणली गेली पाहिजे. ही आरोग्य तपासणी केवळ एचआयव्ही किंवा लैंगिक आजार जाणून घेण्यासाठी नाही, तर एकूणच आरोग्यविषयक स्थिती जाणून अधिक सजग निरोगी सहजीवन जगण्यासाठी महत्त्वाची आहे. या सर्वाच्या पलीकडे जाऊन लग्नानंतर त्या दोघांना दोन्ही कुटुंबांसोबत जे जीवन जगायचे आहे तो केवळ संसार न ठरता ते परस्परांचे भावजीवन जपत फुलवलेलं सहजीवन ठरावं यासाठी त्यामध्ये खर्या अर्थाने समानता असली पाहिजे. लग्न करणार्या दोघांसह दोन्ही कुटुंबांतील प्रत्येकाचे स्वतंत्न व्यक्तिमत्त्व आणि प्रत्येकाचा स्वतंत्न अवकाश मान्य करत विचार, निर्णय आणि कृतीच्या पातळीवर संवाद आणि समानता असणं आवश्यक आहे.
****
आरती, महेंद्र, सचिन, निशा आणि दीक्षा या संवादकांनी महाराष्ट्रभरातील ‘लग्नाळू तरुण-तरुणी आणि त्यांच्या पालकांसाठी’ आजवर 40हून अधिक ‘संवादशाळा’ घेतल्या. समाजाला या उपक्र माची गरज पाहून यावर्षीपासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती 12 जानेवारी - राष्ट्रीय युवा दिवस ते 14 फेब्रुवारी - आंतरराष्ट्रीय प्रेम दिवसदरम्यान लग्नाळू तरुण-तरुणी आणि त्यांच्या पालकांशी संवाद करणारे ‘जोडीदाराची विवेकी निवड राज्यव्यापी युवा संकल्प अaभियान’ राबवत आहे. 14 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे या अभियानाचा समारोप होत आहे. अर्थातच हे विशेष अभियान संपले तरीही ‘लग्नाळू तरु ण-तरु णी आणि त्यांच्या पालकांशी’ सुरू असलेल्या संवादाचा हा सिलसिला असाच चालू राहील.