जीना इसी का नाम है..
By admin | Published: October 9, 2014 06:44 PM2014-10-09T18:44:41+5:302014-10-09T18:44:41+5:30
तीन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या कार्यालयात एक बाई आल्या. हातातल्या पिशवीत एक अल्बम. तो काढून दाखवत म्हणाल्या, हे माझ्या मुलाचे फोटो. तीन महिने झाले त्यानं आत्महत्त्या केली. घरातच गळ्याला फास लावून घेतला. आणि मी उत्तर शोधतेय की, का त्यानं असं केलं.?
Next
>तीन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या कार्यालयात एक बाई आल्या. हातातल्या पिशवीत एक अल्बम.
तो काढून दाखवत म्हणाल्या, हे माझ्या मुलाचे फोटो. तीन महिने झाले त्यानं आत्महत्त्या केली. घरातच गळ्याला फास लावून घेतला. आणि मी उत्तर शोधतेय की, का त्यानं असं केलं.?
आता मी मरेपर्यंत हे दु:ख कमी होणार नाहीच पण ही बोच मला खात राहील की,
आपल्या मुलानं जीव का दिला
हेसुद्धा आपल्याला कळू नये?
तुम्ही लिहा तुमच्या पुरवणीत,
म्हणा नका करू असं.
नका असं संपवू स्वत:ला.
आईबापाला अशा जिवंतपणी मरणयातना तरी नका देऊ.
मग जरा थांबून, रडण्याचा आवेग कमी झाल्यावर म्हणाल्या.
आणि कुणी दुर्दैवानं लावूनच घेतला असा फास, तर निदान दोन ओळीत लिहून तरी सांगा, की काय चुकलं आईबापाचं, का करताय तुम्ही असं?
-शब्दच नव्हते त्या माउलीशी बोलायला.
आज हा विषय तुमच्यासमोर मांडतानाही त्या बाईंचा आक्रोश आठवतोय.
विचाराल स्वत:ला.
का करतात अशी शिक्षा मुलं आईबापाला.?
स्वत:ला?
हे सगळं टाळता येईल.
जगता येईल.
मरण हा कुठल्याच प्रश्नावरचा तोडगा नाही.
जगण्याची कारणं मात्र अनेक आहेत.
शोधली तर जगण्यासाठीची कारणंही सापडतील.
इच्छाही. उमेदही.
त्या उमेदीसाठी.
आज हे कडवट वास्तव.
ते पचवणं अवघड असलं तरी,
पचवून म्हणायलाच हवं,
जी लो जी भरके.
- ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com