नकोशा प्रश्नांची उत्तरं शोधताना.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 06:00 AM2019-02-21T06:00:00+5:302019-02-21T06:00:04+5:30

वयात येताना काहीही प्रश्न विचारले, लैंगिक शंका विचारल्या की, पालक उत्तर देतात ‘गप्प बस!’ ती उत्तरं पौगंडावस्थेतल्या मुलांना देण्याचं काम करणार्‍या माधवी आणि दिव्या.

to girls for Satara works for sex education. | नकोशा प्रश्नांची उत्तरं शोधताना.

नकोशा प्रश्नांची उत्तरं शोधताना.

googlenewsNext
ठळक मुद्देदॅट मेट हा त्यांचा उपक्रम आता शाळाशाळांत जातो आहे.

- प्रगती जाधव-पाटील

आपण वयात येतो म्हणजे काय?
 ‘ते’ आल्यावरच मुली मोठय़ा होतात का?
कंठ फुटला, ओठांवर लव वाढायला लागली की नेमकं काय होतं?
कोणावरून आपल्याला चिडवलं तर ‘कुछ कुछ होता हैं’वाली फिलिंग का येते?
 हे आणि असे शेकडो प्रश्न आजच्या पौगंडावस्थेत असलेल्या पिढीच्या डोक्यात आहेत. आपल्या शरीरात होणार्‍या बदलांविषयी त्यांना वैज्ञानिक ज्ञान देण्याची संकल्पना प्रचलित शिक्षण व्यवस्थेत नाही, त्यामुळे भरकटलेली काही मुलं मग इंटरनेटचा आधार घेऊन भलतंच काहीतरी पाहतात, ऐकतात, शिकतात आणि मग गैरसमजुतींच्या प्रदेशातील त्यांचा प्रवास अव्याहत सुरू राहतो.
निमशहरी भागातील पौगंडावस्थेतील मुला-मुलींच्या डोक्यातील हे प्रश्न ओठांवर आणण्यासाठी सातार्‍यातील दोन युवती गेल्या दीड वर्षापासून झटत आहेत. त्यांनी या काळात हजारो विद्याथ्र्र्याशी संवाद साधला. ‘दॅट मेट’तर्फे  त्यांनी स्त्री-पुरुष शरीररचनेपासून लैंगिकतेर्पयत सर्वच विषयांबाबत प्रबोधन करून समृद्ध पिढी निर्मितीकडे आश्वासक पाऊल टाकायला सुरुवात केली आहे.  
सातार्‍यातील करंडी येथील माधवी जाधव ही तरुणी पेट्रोलियम इंजिनिअर आहे. वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने देशाच्या अनेक भागांमध्ये वास्तव्य करण्याची संधी तिला लाभली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये तिने नोकरीही केली. एकदा मुंबईत आपल्या भाचीला भेटायला गेलेल्या माधवीपुढे भाचीने पाळी येणं म्हणजे काय? असा प्रश्न तिच्या आईला विचारला! या प्रश्नावर उत्तर देण्याचं टाळत तिच्या वहिनीने ‘शांत बस,’ असं ऐकवलं. आपल्या शरीरातील बदलांविषयी कुटुंबात होणारी ही घुसमट पाहून माधवी अस्वस्थ झाली. याविषयी आपल्या लहानपणीही आपण हेच उत्तर ऐकलं होतं, हे आठवून तर ती पुरती हादरली. काळ बदलला, शिक्षणाने पिढी समृद्ध झाली, मोबाइलच्या निमित्तानं अवघं जग जवळ आलं, असं असतानाही आपल्याच शरीरातील बदलांविषयी बाळगल्या जाणार्‍या चुप्पीने तिच्या मनात घर केलं होतं.
माधवीने आपल्या भाचीला तिच्यापरीने शरीरातील बदलांविषयी माहिती दिली आणि भविष्यातही याविषयी निर्‍संकोचपणे बोलण्यासाठी आश्वासित केलं. 
मुंबईच्या या किस्स्यानंतर माधवी अस्वस्थ होती. नोकरीच्या ठिकाणी आपल्या सहकार्‍यांशी ती याविषयी बोलली. आपल्याच शरीराविषयी इतकी गोपनीयता का पाळायची? नैसर्गिक बदलाविषयी इतका संकोच का असावा? आपण नाही सांगितलं तर ही मुलं कुतूहलापोटी भलत्या मार्गाने याची माहिती काढण्याचा प्रय} करतील. मार्ग योग्य आणि वैज्ञानिक नसेल तर चुकीच्या माहितीच्या आधारे मनोग्रह करून घेऊन काहीतरी विचित्र मानसिकतेत जातील. या विचारांच्या फेराने माधवीला चांगल्या पगाराची नोकरी सोडायला भाग पाडले. महानगरांमध्ये काही करण्यापेक्षा छोटय़ा-छोटय़ा शहरांमध्ये पौगंडावस्थेतील मुलांना लैंगिक शिक्षण द्यावं, हे ठरवून तिनं सातारा गाठलं.
पौगंडावस्थेतील मुलांशी संवाद काय साधायचा, त्यांना कोणत्या भाषेत सांगायचं? याचा सुमारे तीन महिने व्यावसायिक अभ्यास केला. यासाठी तिने या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदतही घेतली. क्लिष्ट गोष्टी समजावून सांगण्यासाठी तिने काटरूनचाही आधार घेतला. विविध शाळा, भिशी ग्रुप, महिला मंडळे, खासगी क्लासेस आदी ठिकाणी जाऊन तिने याविषयीची माहिती देण्यास सुरुवात केली. त्यानंतर उन्हाळी शिबिर घेऊन तिनं जागृती निर्माण करण्याचे प्रय} सुरू केले. माधवीच्या या जागृतीने प्रभावित होऊन अनेकांनी तिला शाळा आणि खासगी क्लासेसची कवाडे खुली केली. 
शिबिरे आणि अन्य माध्यमातून माधवीच्या कार्याचा प्रचार सुरू झाला. त्याची माहिती ऐकून दिव्या शहा ही आणखी एक तरुणी तिच्याबरोबर या कामात जोडली गेली. गेल्या काही महिन्यांत या दोघींनी कोल्हापूर, मुंबईचा झोपडपट्टी परिसर, हुबळी, नागपूर, नाशिक, सांगली येथे ‘दॅट मेट’चे काम पौगंडावस्थेतील मुलांर्पयत पोहोचवले आहे. शाळेच्याच वेळातील एक तास घेऊन सुरू असलेल्या या कामाला विविध भागांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं माधवीने सांगितले. जास्तीत-जास्त ग्रामीण भागात जाऊन पौगंडावस्थेतील मुलांना अधिकाधिक आरोग्य शिक्षित करण्याचा त्यांचा प्रय} आहे.



स्पेशल फ्रे ण्डचे आकर्षण
पौगंडावस्थेत असणार्‍या मुला-मुलींमध्ये ‘आपलाही एक स्पेशल फ्रे ण्ड असावा,’ ही भावना तीव्र स्वरूपात आढळते. आपली काळजी घेणारा, आपले हट्ट पुरविणारा, आपल्या मागे-पुढे करणारा बॉयफ्रेण्ड असा पाहिजे, अशी मनीषा बाळगून असणार्‍या मुलींची संख्या दिवसेंदिवस बळावते आहे. तर सत्ता गाजवता यावी, आपल्या नियंत्रणात असावी, आपलं ऐकणारी एक गर्लफ्रेण्ड असावी, असं काही मुलांना वाटते. या पद्धतीच्या जाणिवा अगदी पाचवी-सहावीमध्येच मुलांच्या मनात डोकावू लागल्या आहेत, हे विशेष!

पालकांची भूमिकाही जबाबदार
माधवी आणि दिव्या राज्यातील विविध भागांमध्ये पौगंडावस्थेतील मुलांबरोबर काम करतात. त्यांच्या मते ज्या घरांमध्ये मुला-मुलींवर अधिक बंधने असतात, त्यांच्यातच बंडखोर वृत्ती जागृत होते. आपल्या मुलाच्या मैत्रिणी किंवा मुलीचे मित्र ज्या घरामध्ये निषिद्ध आहेत, तिथेच बंडाचे शिंग फुंकले जाते. त्यामुळे घराची शिस्त आणि संस्कार देण्याबरोबरच पालकांनी आपल्या पाल्याच्या नजरेतूनही जगाकडे पाहणे आवश्यक असल्याचे त्या सांगतात.

माधवीचे वडील भिलाई स्टील प्लँटमध्ये नोकरीस होते. त्यामुळे तिचे नववीर्पयतचे शिक्षण भिलाईत झाले. त्यानंतर ती सातार्‍यामध्ये आली. बारावीनंतर पुण्यात एमआयटीमधून तिने ‘इंजिनिअरिंग’ केले. नोकरीच्या निमित्ताने तिला जगभरातील 23 देशांत काम करण्याची संधी मिळाली. सातार्‍यात परत आल्यानंतर माधवी व दिव्या शहा यांनी ‘दॅट मेट’ ही संस्था स्थापून काम सुरू केले. बेंगलोरमध्ये काम करताना दिव्या शहा हिने पौगंडावस्थेतील मुला-मुलींचे एक सर्वेक्षण केले होते. शरीरशास्त्र आणि पौगंडावस्थेतील मुला-मुलींचे प्रश्न आणि उत्तरे ‘कॉमिक बुक’च्या माध्यमातून या पिढीर्पयत परिणामकारकपणे पोहोचवता येईल, असं दिव्याला वाटले.
माधवी आणि दिव्याच्या भेटीनंतर ‘दॅट मेट’च्या कामाला सुरुवात झाली. सुरुवातीचे सहा महिने त्यांनी कॉमिक बुक आणि या संबंधीच्या कार्यशाळेतील कंटेण्टवर काम केलं. विविध शाळांना भेटी देऊन या दोघी पौगंडावस्थेतील मुला-मुलींशी शास्त्रीय परिभाषेत संवाद साधतात.



 

Web Title: to girls for Satara works for sex education.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.