दे धक्का..
By Admin | Published: April 5, 2017 03:53 PM2017-04-05T15:53:08+5:302017-04-05T17:42:23+5:30
छोटे छोटे टप्पे करा, त्या टप्प्यावर थांबायचे फायदे काय? ‘सेन्स ऑफ अचिव्हमेंट’, ‘सेन्स आॅफ कम्प्लिशन’ हाच तो मोठा फायदा.
>छोटे छोटे टप्पे करा, त्या टप्प्यावर थांबायचे फायदे काय? ‘सेन्स ऑफ अचिव्हमेंट’, ‘सेन्स आॅफ कम्प्लिशन’ हाच तो मोठा फायदा. मी अमुक गोष्ट ठरवू शकतो/शकते. मी अमुक गोष्ट पूर्ण करू शकतो/शकते. मी अमुक यशाचा टप्पा पार पाडू शकतो/शकते. याबद्दलचा आत्मविश्वास एकदा वाढला की आपण यशाच्या ट्रॅकवर गाडी सुसाट सोडलीच समजा. मला ना काही जमतच नाही. काहीच प्लॅनिंग होत नाही. कितीही ठरविले तरी काहीतरी अडथळे येतातच. वेळच पुरत नाही. हवं तसं यश मिळत नाही. सुरू केलं तर अर्धवट सुटून जाते. मध्येच तरंगत राहतात प्लॅन्स. ते पूर्ण कधी होणार? कसे होणार? अशा शेकडो नकारात्मक खुंट्या आपण मनात ठोकलेल्या असतात. आपल्यातला सगळा उत्साह त्या खुंट्यांवर लटकून पडलेला असतो. नियोजन तिथेच लोंबत पडलेले असते. एकदा का ते तिथून उतरविले, छोट्या छोट्या स्वयंसूचनेतून गाडीला धक्का देत पुढे जात राहिले, तर अडकलेली टेप मोकळी होते. गाणं नीट वाजू लागते. पुढे सरकते. त्या प्रत्येक कडव्याला दाद द्यायची. मनापासून त्या सुरावटींमध्ये रमायचं. तिथेच तुमची टेप पुढे न अडकायची ताकद असते! नवीन सूर कानी पडतात. जुनी गाणी नव्याने समजतात. अजून नवीन सुरांची साथ मिळते. एकदम सोडलेला ताण हळूहळू वाढविता येतो. तारेला नीटसा ताण पडला की वाद्य सुरात लागतं. एकदा का ते सुरात लागलं की आपलं गाणं पूर्ण झालंच समजा. छोट्या छोट्या गोष्टींमध्येच मोठ्या ध्येयासाठी ऊर्जा मिळवायची ताकद असते. जॉय आॅफ स्मॉल थिंग्स...