ग्लो इन द डार्क हेअर

By admin | Published: January 29, 2016 01:21 PM2016-01-29T13:21:38+5:302016-01-29T13:21:38+5:30

काळ्याभोर केसात चमचमणा:या लाल-हिरव्या-निळ्या-केशरी-जांभळ्या रंगांच्या छटांचा एक नवा ट्रेण्ड.

Glow in the Dark Hair | ग्लो इन द डार्क हेअर

ग्लो इन द डार्क हेअर

Next
>काहीही हं.
असं वाटू शकेल हा ट्रेण्ड वाचून, पण हा ट्रेण्ड सध्या तरुणांच्या जगात धुमाकूळ घालतो आहे.
त्याचं नाव आहे, ग्लो इन द डार्क हेअर!
केसातली चमचमती छटा असं याचं वर्णन करता येऊ शकतं. म्हणजे काय तर, आपले केस काळे असो, तपकिरी असोत नाहीतर पांढरे असोत.  त्या केसात हायलाइट करून घेण्याची फॅशन आहेच.
आता हा ग्लो त्याच्या पुढचा. म्हणजे केसातली एकच एक बट हायलाइट करून घ्यायची. किंवा माथ्यावरचा वतरुळाकृती भाग हायलाइट करायचा. केसांची फक्त टोकं हायलाइट करायची. फ्लिक्स कापून फक्त तेवढेच हायलाइट करायचे किंवा भांग पाडतो तसे निम्मे केस हायलाइट करायचे.
असं काहीही.
पण ते केस हायलाइट करताना जे कलर्स वापरले जाताहेत, तो हा ग्लो.
म्हणजे शब्दश: कुठलाही म्हणजे आपल्याला आवडेल तो कुठलाही कलर त्यासाठी वापरला जातो आहे.
पण आघाडीवर आहेत ते लाल, पिवळा, जांभळा, निळा हे रंग.
कल्पना करा, आपल्या केसात काही केस पूर्ण लाल किंवा पूर्ण जांभळे, निळे झाले तर?
ते कसं दिसेल?
ज्यांना हे आवडतं, त्यांना ते भन्नाट वाटतं आणि आपला हा बिंधास्त लूक कॅरी करण्याची हिंमतही त्यांच्यात असते.
मग ते असलं काहीतरी भन्नाट करतात, कधी कधी तर दोन फ्लोरोसण्ट रंग एकत्र करूनही केसांवर चढवतात.
आणि एकदा कलर झाले केस की सुरू होतं फोटोसेशन.
काढायचे स्वत:चे फोटो आणि टाकायचे सोशल साइट्वर. आणि मिरवायचा एक हॅशटॅग.
ज्याचं नाव आहे, ग्लो इन द डार्क हेअर.
सध्या हा हॅशटॅगही धुमाकूळ घालतो आहे.
आणि कॉलेज डेच्या या काळात तर असे केस रंगीत करून मिरवणं हा नवीन फॅशन सिम्बॉल बनतो आहे.
केस कलर करून घेण्याचा हा ट्रेण्ड फेस्टिव्ह सिझनमध्ये आणखी वाढण्याची शक्यताही आहे.
पण ट्रेण्ड आहे म्हणून हे सारं करताना काही जणांच्या वाटय़ाला पस्तावा करण्याचीही पाळी येते आहे.
आणि त्याचीही कन्फेशन्स ऑनलाइन वाचायला मिळत आहेत.
 
 
चमचमती बट, पण पुढे?
 
अनेकजण हौशीनं केस हायलाइट करवून घेतात. अगदी फ्लोरोसण्ट रंगात रंगवतातही. काही दिवस ते सारं मस्त वाटतं. आपला बोल्ड लूक कॅरी करणं हे हिमतीचंही वाटतं. मात्र भावनेच्या भरात कलर केलेले हे केस काही दिवसांतच काही जणांना नकोसेही होतात. कारण काय?
तर त्यांना वाटतं की, हायलाइट करताना जो कलर वापरला त्याचा चॉइस चुकला.
म्हणजे हौशीनं लाल, पिवळा, जांभळा, निळा, हॉट-ब्लड रेड असे रंग लावून काही केस त्या रंगाचे केले जातात.
पण नंतर वाटतं की, आपल्या स्किन टोनला हा रंग सूट होत नाही. जरा जास्तच बोल्ड झालंय प्रकरण किंवा अतीच गॉडी दिसतंय असं काहीही वाटू लागतं.
तरुण मुलांना या सा:याचा पस्तावा फार होत नाही, पण अनेक मुली मात्र पस्तावतात.
कारण इतरांच्या डोक्यावर अधिक चांगले रंग दिसू लागतात आणि त्या तुलनेत आपला रंग फिका वाटतो.
दुसरं म्हणजे, असे भन्नाट केस डोक्यावर दिसणा:या मुलींना म्हणो असं वाटू लागतं की आपल्याला लोक सिरीयसली घेत नाहीत. किंवा गांभीर्यानं आपण काम करू असं त्यांना वाटत नाही.
अर्थात या वाटण्याला तसा काही आधार नसतो, कारण हे सगळे भावनिक चढउतार आणि भला उसका कलर मेरे कलरसे अच्छा कैसे असाच मामला असतो.
पण आपले केस आपण ज्या रंगात रंगवतो आहोत तो रंग निदान पुढचं वर्षभर तरी आपल्याला आवडेल याची खात्री बाळगता यायला हवी. नाहीतर केसांवर ग्लो दिसतो पण चेह:यावरचा उडतो असेही काही अनुभव आहेत.
 
तुम्ही केस हायलाइट करताय?
 
1) सगळे केस कलर करवून घेणं, हे आता जरा कमी होतं आहे.
ज्यांचे केस खूपच पांढरे झाले आहेत त्यांचं  ठीक आहे, पण ज्यांचे केस पांढरे नाहीत, ज्यांना निव्वळ फॅशन करायची आहे, ते केस कलर करत बसत नाहीत. त्याचं काम हायलाइटने भागतं.
2) पण हायलाइट करताना काही गोष्टीचं पथ्य पाळायला हवं. त्याआधी सगळ्यात पहिले म्हणजे ठरवायला हवं की, आपण जी बट हायलाइट करणार ती आपल्याला कॅरी करता येणार आहे का?
3) काही मुली लाल-हिरव्या रंगात हायलाईट करतात. ते दिसतं सुंदर, पण कॅरी करण्यासाठी आवश्यक ती हिंमत नसेल तर ते अगदी बेंगरूळ दिसतं.
4) त्यामुळे लाल-हिरवा-निळा-केशरी अशा भडक रंगात केस हायलाइट करण्यापूर्वी चॉकलेटी, तपकिरी, ब्राऊनच्या अनेक शेड्सचा विचार करा. 
5) एकाआड एक बट हायलाइट करण्याची सध्या फॅशन आहे. पण त्यानं खूप डार्क लूक येऊ शकतो, तो आपल्याला आवडेल का, निभेल का हे तपासा.
6) सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे सोबर कलरची एक बट, तीही कानाच्या जवळची हायलाइट करून पाहावी. ती आवडली तर मग अधिक पुढचे पर्याय निवडावेत.
 
हे महत्त्वाचं.
 
केस हायलाइट केले की फोटो काढून सोशल मीडियावर टाकले जातातच. पण तिथं त्यावर काहीही रिमार्क येतात, टीकाही होते. त्याकडे दुर्लक्ष करणं. त्या लाइक्सवर आपले फॅशनेबल निर्णय ठरवू नयेत.
- श्रवणी बॅनर्जी
 

Web Title: Glow in the Dark Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.