इंजिनिअरींगला जाताय? चांगलं कॉलेज कसं निवडाल?

By admin | Published: June 10, 2016 11:37 AM2016-06-10T11:37:41+5:302016-06-10T11:37:41+5:30

इंजिनिअरिंगच करायचं. हे अनेकांचं स्वप्न. त्यात अमूकच साईडला जायचं हे मनात पक्कं असतं.

Go to engineering? How to choose a good college? | इंजिनिअरींगला जाताय? चांगलं कॉलेज कसं निवडाल?

इंजिनिअरींगला जाताय? चांगलं कॉलेज कसं निवडाल?

Next
>इंजिनिअरिंगच करायचं.
हे अनेकांचं स्वप्न. त्यात अमूकच साईडला जायचं हे मनात पक्कं असतं.
पण सीईटीचा स्कोअर जेमतेम. सरकारी कॉलेजात अॅडमिशन मिळत नाही, बडय़ा कॉलेजातही प्रवेश मिळत नाही. पण इंजिनिअरिंग तर करायचंच. पालकही पैसे उभे करतात, कर्ज काढतात. आणि एखाद्या बडय़ा, चकाचक, खाजगी कॉलेजात प्रवेश घेतात.
उंच इमारती आणि पॉश माहौल पाहुन हुरळून जातात. मात्र हे आणि एवढंच म्हणजे कॉलेज नव्हे. आपल्या कॉलेजात अमूक सिरीयलचं शुटिंग होतं हे सांगणं भूषणावह नव्हे.
कॉलेज म्हणून ते उत्तम आहे का?
हे तपासा.
त्यासाठीची ही एक चेकलिस्ट.
 
1) आपण ज्या शाखेला अॅडमिशन घेतो आहोत त्या शाखेला त्या कॉलेजला मान्यता आहे. विद्यापीठाची मान्यताच नाही आणि मुलांना प्रवेश दिला जातो असं अनेकांचं होतं. त्यामुळे ते तपासा.
2) प्राध्यापक पुरेसे आहेत का? त्यांचं शिक्षण, अनुभव काय हे तपासा. आदल्या वर्षी बीई उत्तीर्ण झालेले थेट काही ठिकाणी शिकवायला येतात.
 
3) प्रयोगशाळा, लायब्ररी आहे का, कशी आहे हे तपासा.
 
4) कॅम्पस सिलेक्शनचा, प्लेसमेण्टचा दावा कितीही होत असला तरी खरंच मुलांना काय पगाराच्या नोक:या, कुठे मिळाल्या याची चौकशी करा.
5) महाविद्यालयाचं मुल्यांकन हे नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडेशन यांच्या मार्फत झालेलं आहे का हे पहा.   महाविद्यालयाच्या  ज्या शाखेला आपण प्रवेश घेतो त्या शाखेला एनबीएची मान्यता आहे का, हे तपासा.
 
-ऑक्सिजन टीम
 
इंजिनिअरिंगला जाताना कुठली शाखा आणि कुठलं कॉलेज
कसं निवडायचं?
यासंदर्भातला विशेष तपशिलवार लेख वाचा
उद्या ‘ऑक्सिजन’मध्ये!

Web Title: Go to engineering? How to choose a good college?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.