गॉगल दबंग
By Admin | Published: August 6, 2015 04:24 PM2015-08-06T16:24:36+5:302015-08-06T16:24:36+5:30
मोठ्ठाले, रंगीत, चकाकते गॉगल नेमकं घालतं कोण?
>- आता कॉलेज ख:या अर्थानं सुरू झालं आहे.
नुकताच फ्रेण्डशिप डे झाला. आता कॅम्पसचा रंग खुलायला लागेल आणि कॅम्पस फॅशनवाले दिलखुलास, बिंधास्त आपल्या फॅशन जगायला लागतील.
त्यात ब:याच गोष्टींचा समावेश असला तरी आता पाऊस कमी होऊन कदाचित ऊन पडेल असं वाटणारे दिवसही येऊ घातलेच.
आणि स्टायलिश दिसायचा सगळ्यात सोपा आणि सगळ्यात स्टायलिश प्रकार म्हणजे आपले सनग्लासेस. ज्याला अनेकजण गॉगल म्हणतात. पण गॉगल म्हणणं आताशा थोडं जुनाटच मानलं जातं. त्यातल्या त्यात स्पेक्स किंवा सनग्लासेस म्हणणं ट्रेण्डी. त्यात स्पेक्सला चष्म्याचा शिक्का. म्हणून मग होता होईतो सनग्लासेसच म्हणायचं.
तर कॉलेजच्या या दिवसांत अनेकांना सनग्लासेस घ्यायची हुक्की येते. तशी तुम्हालाही येणार असेल आणि पुढचा सगळा फेस्टिव्ह सिझन डोक्यात ठेवून जर तुम्ही सनग्लासेस घेणार असाल तर तुम्हाला काय घ्यायचं हे तरी माहिती हवं!
होतं काय की, आपण दुकानात जातो, गॉगल दाखवा म्हणतो, आणि मग दुकानदार जे दाखवतो ते घेतो. अनेकांना तर घरी आल्यावर आपण जे गॉगल्स घेतले ते आवडतही नाहीत.
मग यावर उपाय काय?
तर सध्या तरुण मुलांमधे कुठल्या सनग्लासेसची चलती आहे, ट्रेण्डी काय आहे याचा होमवर्क करून जाणं, त्यापैकी काही आपल्याला आवडतंय का हे तपासून घेणं!
तर मग सध्या सगळ्यात ट्रेण्डी कुठले सनग्लासेस आहेत? ब्रॅण्ड कुठलाही घ्या, या मुख्य स्टाईल्स लक्षात असलेल्या ब:या!!
स्क्वेअर अॅण्ड मोअर
चौकोनी, मोठे आणि डोळ्याला चपखल बसणारे हे गॉगल, त्याचं नावच आहे, स्क्वेअर अॅण्ड मोअर! तुमच्या चेह:याला, व्यक्तिमत्वाला ते सूट होतात का, हे पहा. शक्यतो खूप बारकुडया लोकांनी ते न घेतलेलेच बरे!
साईज्ड
जरासे मोठे, चेहरा पूर्ण झाकला जाईल असे हे गॉगल्स, ते गोल असतात. षटकोनीही असतात. तुम्हाला जर मोठ्ठाला गॉगल घ्यायची हौस असेल तर बिंधास्त हे साईज्ड गॉगल घ्या.
कलर्ड
हे म्हणजे एकदम दबंग स्टाईल काम. कलर्ड गॉगल, तुम्हाला वेगवेगळ्या रंगात मिळतात. साईज छोटी-मोठी, तुम्ही घ्याल तशी! त्यामुळे एकदम बिंधास लूक हवा असेल तर हे कलर्ड गॉगल सध्या हीट आहेत.
अॅव्हिएटर
यांना टिण्ट गॉगलही म्हणतात. ते मोठ्ठाले, दुरंगी, तिरंगीही असतात. वेगवेगळ्या रंगात तर मिळतातच पण जरासे चकाकतातही. त्यामुळे जर तुम्हाला दबंग्पेक्षा थोडं स्टायलिश काही हवं असेल तर हे अॅव्हिएटर.
रेट्रो
ही रेट्रो स्टाईल पुन्हा एकदा चर्चेत आहे. सगळ्याच रेट्रो फॅशन आता इन आहेत. त्यात हे गॉगल आलेच! मोठे, मस्त आणि एकदम खास लूक त्यातून येऊ शकतो.
- श्रवणी बॅनर्जी