इस मोड से जाते है.

By Admin | Published: October 23, 2014 03:37 PM2014-10-23T15:37:46+5:302014-10-23T15:37:46+5:30

इस मोड से जाते हैं, कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहें.

Going from this mode. | इस मोड से जाते है.

इस मोड से जाते है.

googlenewsNext
इस मोड से जाते हैं,
कुछ सुस्त कदम रस्ते,
कुछ तेज कदम राहें.
-हरवून जातो मी रोजच गुलजारच्या या शब्दांत. 
 लता आणि किशोरच्या आवाजात, 
रोज वाटतं की हे जग म्हणजे 
खरंच पत्थर की हवेलीच आहे.
काचेचीच आहेत सगळी घरं.
शिशोंके घरोंदेच सगळे.
आणि या अशा दुनियेत मी एकटा,
सोबत गुलजार साहेबांचे शब्द 
मला माङोच वाटतात.
आंधी की तरह उडकर
एक राह गुजरती है.
=====
काळजात कालवतं हो, माङया हे शब्द ऐकून.
आणि मग सारखं वाटतं,
माझा रस्ता कुठला.
सुस्त-शांत पावलांचा
की तेज एक्स्प्रेस हायवेंचा.
माङया जगण्याचाच पार सातरस्ता होऊन गेलाय.
एका ठिकाणी थांबून पहावं तर शंभर वाटा फुटताना दिसतात.
पुन्हा गुलजार म्हणतात तसंच,
एक राह मुड गयी तो और जुड गयी.
पण मग माझी वाट कोणती?
की वाट फुटेल तसं, 
वाट वळेल तसं मी फक्त चालत राहू.
नेईल जिकडे वाट तिकडे जाऊ?
मी पायवाट चालू की वहिवाट?
मी डांबरी रस्त्यांवर पोळू देऊ पाय
की मी बसू एखाद्या हायस्पीड वाहनात
आणि इकडंतिकडं न बघता जाऊ बुंगाट?
पण जाऊ? म्हणजे कुठं जाऊ?
=====
माङया आईबाबांना,
मित्रंनाही  वाटतं की,
मी कन्फ्यूज आहे?
मित्रही म्हणतात कधी कधी वैतागून
‘यार तेरा कुछ नहीं होगा, तू ठरव काहीतरी, तुला नक्की करायचंय काय लाईफमधे, सोड कन्फ्यूजन.’
अरे यार, पण का ठरवू?
मी नाहीये कन्फ्यूज.
मला फक्त सतराशे साठ वाटा दिसतात.
त्या मला हाका मारतात.
मला वाटतं हे करुन पहावं, नी ते ही करुन पहावं.
माझं नाहीये काहीच फर्म ठरलेलं.
म्हणजे जेव्हा कॉलेजातल्या कट्टय़ावर 
अट्टल चहाबाज आणि 
शोऑफबाज कॉफीवाले मित्र भांडतात ना,
चहा ग्रेट की कॉफी.?
तेव्हाही मला असंच वाटतं,
जे ज्यावेळी मिळेल ते मी पितो,
माझं नाहीये असं काही ठरलेलं.
मला चहा आवडतो,
कॉफीही आवडते,
मला ज्यूस आवडतं,
कोल्डड्रिंक आवडतं
आणि हो, घरी आई करते ते मुगाचं कढणही
मला आवडतं
आणि बिटाचं सूपही मला टेस्टीच वाटतं.
आता आहेत ना एवढे ऑप्शन्स?
मग मला कंपलसरी एकच काहीतरी आवडलं पाहिजे हा तुमचा अट्टाहास का?
=====
आणि चॉईस ठरवायची,
आपण काय करायचं हे पक्कं ठरवायचं,
आधी ड्रिगी, मग नोकरी, दरम्यान साईडबाय साईड प्रेम, मग ब्रेकप वगैरे,
मग ठरवून लगAबिगA,
जमल्यास अमेरिका
तिथं जाऊन पटकन गाडी किंवा घर
नाहीतर मग इथंच ऐन पंचविशीत घर,
दे दणादण करिअरमध्ये प्रमोशन
हे असं पॉवर पॉईण्ट प्रेङोंटेशन केल्यासारखं आयुष्य म्हणजे ‘फोकस्ड’ असणं का?
एकच एक पक्कं ठरवून आपली मतं बनवून
नुस्तं करिअर एके करिअर करत धावत सुटणं,
म्हणजे पक्का निर्धार करणं का?
आणि आयुष्यात हेच म्हणजे हे असंच सगळं नाकासमोर केलं की तुम्ही ग्रेट?
थोर? फोकस्ड?
आणि मी?
मी नाहीये फोकस्ड?
मग माझं काय होणार भजं?
माङया घरच्यांना तर वाटतं की, 
भजं नाही नव्या जगात माझं पुरतं 
माकड झालेलं आहे.
=====
हा असा डोक्यात चिखल झाला ना की, 
हळूच माङया कानात हेडफोनमधला आवाज 
म्हणू लागतो,
मुसाफिर हूं यारो,
मुङो चलते जाना है.
बस चलते जाना है.!
आणि मग मी स्वत:लाच सांगतो,
जाऊ दे यार, 
लोकांना जे कन्फ्यूजन वाटतं,
ते आपल्याला वाटत नाहीये ना,
आपण करुन पाहू चार गोष्टी एक्सप्लोअर.
मज्जा येईल किंवा धडपडू.
लागेल, फुटतील ढोपरं.
खड्डय़ात पडू.
पण जे होईल ते माझं माझं होईल.
कहते है ना, 
जो कुछ नहीं करते,
वो कमाल करते है.
=====
आता प्लीज विचारू नका,
ते कमाल म्हणजे काय.?
कारण मला काही कुणाला सिद्धबिद्ध करायचं नाही.
मै खुश हूं.
और खुंश रहूं.
खुशिया बांटू ये ही सबसे बडा कमाल है..
=====
डोण्ट वरी,
करिअर भी कर लुंगा यार.
पैसावैसा भी कमाउंगा.
आखीर हूं तो मै मुसाफिर,
मी रस्ता सोडून पळालो,
तर रस्ता मला सोडणार नाहीच.
क्या समङो?
समङो की हो गए, कन्फ्यूज.
 

 

Web Title: Going from this mode.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.