लुटू कर्तृत्वाचं सोनं.

By admin | Published: October 2, 2014 08:16 PM2014-10-02T20:16:24+5:302014-10-02T20:16:24+5:30

आपणपण खूप पुढे गेलो असतो. पण नाही ना, नाही आपल्याकडे इंग्रजी मीडियमं हायफाय शिक्षण, नाही येत आपल्याला फाडफाड इंग्रजी बोलता

Gold of Lootu Kurtvata | लुटू कर्तृत्वाचं सोनं.

लुटू कर्तृत्वाचं सोनं.

Next
>आपणपण खूप पुढे गेलो असतो. पण नाही ना, नाही आपल्याकडे इंग्रजी मीडियमं हायफाय शिक्षण, नाही येत आपल्याला फाडफाड इंग्रजी बोलता. लिहिण्याचं तर नावच सोडा.
इंग्रजी लिहिता आलं असतं चांगलं तर आज आपण कुठच्या कुठं निघून गेलो असतो. बड्या बड्या एण्ट्रन्स एक्झाम्स चुटकीसरशी ‘क्रॅक’ करुन टाकल्या असत्या.
पण नाही ना. इंग्रजीपायी घोडं अडतं आपलं. 
-असं म्हणजे नेमकं असंच वाटतं का तुम्हाला?
इंग्रजी यायलाच पाहिजे यात शंका नाही, उत्तम लिहिता-वाचता-बोलता आलंच पाहिजे. नसेल येत तर शिकलं पाहिजे. मात्र ‘ते’ येत नाही म्हणून आपण मागे पडलो ही तक्रार साफ खोटी.चुकीची.आणि आपलं लंगडं सर्मथन करण्याची. खरं नाही वाटत? म्हणूनच तर आजच्या अंकात ही एक खास भेट.
यशाचं सोनं लुटणारी दसर्‍याचं सोनं लुटून खरी कर्तबगारी सिद्ध करणार्‍या आणि देशाला थेट मंगळावर नेऊन पोहचवणार्‍या तरुण शास्त्रज्ञांना भेटा. त्यांच्यातले जेमतेम २ टक्के आयआयटीत शिकलेले आहेत.
बाकीचे सारे लहानमोठय़ा गावातून, शहरातून इंजिनिअरिंग आणि एमएसस्सी फिजिक्स करुन ‘इस्त्रो’पर्यंत पोहचले आहेत. जगानं आश्‍चर्यानं तोंडात मनगटं घालावीत इतकी उत्तुंग कर्तबगारी करत आहेत. त्यांच्याकडून आपण हीच ‘सीमोल्लंघनाची’ प्रेरणा आपण घेऊ शकू का?
खोटी, लटकी आणि धादांत तकलादू कारणं न सांगता लागू शकू झडझडून कामाला?
हे नाही म्हणून ते जमत नाही, ते केलं नाही अशी सततची रडगाणी न गाता आणि आपल्याकडे जे नाही तेच कसं महत्त्वाचं आहे असं कारण पुढे न करता जे आहे त्या भांडवलावर निघायचं का जग जिंकायला? निदान लढायला, प्रयत्न तरी करायला काय हरकत आहे?
आज दसरा.
आज या मुहूर्तावर आपण आपल्याच विचारायला हवं की, आहे का आपली तयारी खरंच कर्तबगारी दाखवण्याची.? आणि असेल. तर आज या मुहूर्तावर लागू कामाला. करू सीमोल्लंघन आणि हरवू आपणच आपल्याला.मिळवू नवं यश ! दसर्‍याच्या खूप खूप शुभेच्छा.

Web Title: Gold of Lootu Kurtvata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.