आता नोकरी शोधून देणार गुगलचं जॉब अॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 05:52 PM2020-08-27T17:52:53+5:302020-08-27T18:03:31+5:30

वाट्टेल ती माहिती हवी असली तरी आपण गुगल करतो, म्हणून आता गुगलनेच एक जुनंच अॅप ‘जॉब्ज’ पुन्हा एकदा रिब्रॅण्डिंग करतं आणलं आहे.

Google's job app will find jobs- kormo jobs | आता नोकरी शोधून देणार गुगलचं जॉब अॅप

आता नोकरी शोधून देणार गुगलचं जॉब अॅप

Next
ठळक मुद्दे‘अॅड मी टू सर्च’ पर्यायाच्या मदतीने गुगल वापरकर्ते या सेवेचा वापर करू शकणार आहेत

- प्रसाद ताम्हनकर

स्पर्धा मोठी, त्यात कोरोना. नोकरी शोधणा:यांच्या अडचणी त्यामुळे अजूनच वाढवलेल्या आहेत. 
नक्की कोणत्या क्षेत्नात आणि कोणत्या प्रकारच्या नोक:या उपलब्ध आहेत याची माहिती असणं, ती वेळेत मिळणं आणि त्या नोकरीसाठी स्वत:ला तयार करणं, आपला सीव्ही तयार करणं अशा अनेक कामांसाठी बेरोजगार युवक सध्या लिंकडीन, नोकरी डॉट कॉम, मॉनस्टर यासारख्या जॉब्ज पोर्टलची मदत घेतात.
मात्र आता या जॉब्ज जायंट्सना टक्कर देण्यासाठी गुगलनं आपलं 
एक जुनंच अॅप ‘जॉब्ज’ पुन्हा एकदा रिब्रॅण्डिंग करत Kormo Jobs  या नावानं आणलं आहे.
सर्वात आधी गुगलने 2018 मध्ये हे  अॅप बांगलादेशमध्ये आणलं होतं.
 त्यानंतर 219 मध्ये हे अॅप इंडोनेशियात त्यांनी आणलं. आणि आता भारतात या जॉब अॅपच्या मदतीने नोकरी शोधण्याबरोबरच, नोकरीसाठी अर्ज करणं, आपला डिजिटल सीव्ही तयार करणं अशी कामंही सहज करता येणार आहेत. 
गुगलच्या पूर्वीच्या ‘जॉब्ज’ अॅपची व्याप्ती फारशी मोठी नव्हती. या ‘जॉब्ज’ अॅपवरती साधारण हॉटेल, हॉस्पिटॅलिटी, घरोघरी सामान पोहोचवणा:या कंपन्या, रिटेल क्षेत्न अशा मर्यादित क्षेत्नातील नोक:याच उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
मात्न आता या जुन्या अॅपला नवीन स्वरूपात सादर करताना, गुगलने त्याची सर्वच क्षेत्नातील व्याप्ती मोठय़ा प्रमाणात वाढवली आहे. 


कोरमो जॉब्ज अॅपवरती 20 लाख व्हेरिफाइड जॉब्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. 
त्यासह या अॅप्समध्ये काही अत्यंत उपयोगी अशी टुल्सदेखील देण्यात आली आहेत. या टुल्सच्या मदतीने उमेदवार आपले विविध क्षेत्नातील स्किल्स वाढवू शकतो, तसेच आपला डिजिटली सीव्ही बनवून त्याच्या प्रिंट काढणं, तो इतरांशी शेअर करणं ही कामेदेखील सहजपणो करू शकतो. 
गुगल प्लेवरून हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करून, आपापल्या स्किल्सप्रमाणो उमेदवार यावरती स्वत:ला रजिस्टर करू शकेल. त्यानंतर त्याच्या प्रोफाइलचा अभ्यास करून, त्याला त्या त्याप्रमाणो जॉब्ज ऑफर केले जातील. गूगलच्या या अॅपला चांगलाच प्रतिसाद मिळत असून, लॉँच झाल्यापासून 10 लाखांपेक्षा जास्ती लोकांनी यावरती नोंदणी केली आहे.
गुगलने या अॅपबरोबरच व्हच्यरुअल ‘व्हिजिटिंग कार्ड’ ही अनोखी सेवादेखील उपलब्ध करून दिली आहे. 
मोजक्या शब्दात मनुष्याची अथवा एखाद्या व्यवसायाची ओळख करून देण्यासाठी जगभरातच व्हिजिटिंग कार्ड हे अत्यंत उपयोगी मानलं जातं.
 सध्याच्या डिजिटल जमान्यात आता व्हच्यरुअल व्हिजिटिंग कार्ड ही जबाबदारी पार पाडणार आहे. कोणीही व्यक्ती गुगलवरती लॉग इन करून आपलं व्हिजिटिंग कार्ड लीलया बनवू शकणार आहे. या कार्डवरती व्यक्तीचं नाव, मोबाइल क्र मांक, ई-मेल आयडी, शिक्षण, पत्ता, त्याची स्किल्स, उपलब्ध असल्यास त्याच्या वेबसाइट अथवा ब्लॉगचा वेब अॅड्रेस, तसेच त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्स प्रोफाइलच्या लिंक्स अशा विविध पर्यायांना उपलब्ध करून देता येणार आहे. 
गेली दोन वर्षे गुगलच्या या सेवेची जगभरात प्रतीक्षा होत होती. मात्न गुगल दोन वर्षे या सेवेची चाचणी घेण्यातच मग्न होती. अखेर विलंबाने का होईना; पण ही सेवा भारतीय गुगल वापरकत्र्याना आता उपलब्ध झाली आहे. 
अनेकदा गुगलवरती एखाद्या व्यक्तीची माहिती शोधत असताना खोटय़ा किंवा चुकीच्या माहितीला सामोरे जावे लागते. अशा माहितीने, ही माहिती शोधणा:या व्यक्तीची दिशाभूलच होत असते. 
मात्न आता गुगलने उपलब्ध करून दिलेल्या या व्हच्यरुअल व्हिजिटिंग कार्ड सेवेनंतर, अशा प्रकारांना मोठय़ा प्रमाणावरती आळा बसण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 
‘अॅड मी टू सर्च’ पर्यायाच्या मदतीने गुगल वापरकर्ते या सेवेचा वापर करू शकणार आहेत.
 एकदा का तुमचे व्हिजिटिंग कार्ड तयार झाले, की गुगल त्यांच्या सर्च डेटामध्ये ते सामावून घेणार आहे. यामुळे एकल व्यावसायिक जसे की प्लंबर, संगणक वा इतर दुरुस्ती करणारे, इलेक्ट्रिशियन शोधणं सोपं होऊ शकेल.
 त्याचबरोबर विविध कंपन्यादेखील एखाद्या नोकरीसाठी विशिष्ट जॉब स्किल असलेला उमेदवार सहजपणो मिळवू शकतील.
हे अॅप नोकरी शोधणा:या आणि देणा:यांना किती फायदेशीर ठरतं ते बघायचं.


( लेखक विज्ञान/तंत्रज्ञान पत्रकार आहेत.)

Web Title: Google's job app will find jobs- kormo jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.