गोविंदातील पोरं
By admin | Published: August 20, 2015 03:13 PM2015-08-20T15:13:03+5:302015-08-20T15:13:03+5:30
गोविंदा हे पॅशन मानून स्वत:पुरता खेळ खेळत त्यातला ‘थरथराट’ अनुभवणारी एक तरुण पिढी होती. आता तरुण गोविंदांसमोर पैशाच्या रकमा आहेत, त्याची ओढ आहे. आणि पैशानं झुंजी लावल्यागत गोविंदांना झुंजवता येऊ शकतं, याची खात्री असणारे आयोजकही आहेत.
Next
- स्नेहा मोरे
गोविंदा हे पॅशन मानून स्वत:पुरता खेळ खेळत त्यातला ‘थरथराट’ अनुभवणारी एक तरुण पिढी होती.
आता तरुण गोविंदांसमोर पैशाच्या रकमा आहेत, त्याची ओढ आहे. आणि पैशानं झुंजी लावल्यागत गोविंदांना झुंजवता येऊ शकतं, याची खात्री असणारे आयोजकही आहेत. या सा:यात एक मात्र अजूनही कमअस्सल झालेलं नाही ते म्हणजे, गोविंदा पथकात असणा:या मुलांचं पॅशन, त्यांची मेहनत.
त्या मेहनतीची कदर फक्त व्यवस्थेला नाही. घरची गरिबी, हलाखी आणि आपले दु:ख हे सारंच या तरुणांना विसरायला लावणारा हा गोविंदा. टी-शर्ट, हाफ पॅण्ट, गळ्यात रुमाल, डोक्यावर टोपी आणि नखशिखांत भिजलेली मुलं, कोंबडीबाजा, कच्छी-ढोलच्या तालावर थिरकत दहीहंडी फोडतात. तेव्हा तीच त्यांच्यासाठी मोठी अचिव्हमेण्ट असते. पैसा नव्हे, ते का? हेच अजून दुर्दैवानं आपल्या व्यवस्थेला कळलेलं नाही.
‘ढाक्कूम. ढाक्कूम..’ म्हणत जागेवाल्याला गा:हाणो घालत गुरुपौर्णिमेच्या दिवशी दहीहंडीचा सराव सुरू होतो.
जशी काही ही तरुण मुलं गुरुपौर्णिमेची वाटच पाहत असतात. त्यानंतर मग घडय़ाळाच्या काटय़ावर सुरू होणा:या दिवसाचं वेळापत्रक सांभाळत, काही स्वत:चं कॉलेज, तर काहीजण आपापली कामं, नोक:या सांभाळत एकत्र येतात. आणि ठरलेल्या जागी सरावाला सुरुवात होते. गेल्या वर्षीपासून हा दहीहंडी उत्सवच वादाच्या भोव:यात सापडला असला, तरीही वर जाण्यासाठी एकमेकांना जिद्दीने हात देणारा आणि दुस:यासाठी स्वत:चा खांदा करणारा हा सण या गोविंदांसाठी एक वेगळ्याच प्रकारचं वेड, वेगळंच पॅशन असतं.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या वादानं जास्त भडका घेतला. त्यात दहीहंडी समन्वय समितीनं आपली बाजू लावून धरली. अनेक राज्यभरातील पथकं त्यांच्यासोबत आले. एकीकडे पैसेवाले आयोजक, त्यातलं इव्हेण्ट मॅनेजमेण्ट, नाचनाचून पैसा कमावणारे बॉलिवूडवाले, दहीहंडी बक्षिसाच्या वाढत्या रकमा आणि दुसरीकडे त्यात गोविंदांच्या जिवाला धोका वाढतो म्हणून उसळणा:या विरोधाच्या लाटा. या सा:यात गोविंदांचं यंदा काय होणार हा प्रश्न आहे. त्यातच सरकारनं आता या खेळाला साहसी खेळाचा दर्जा जाहीर केला. पण तसं करताना र्निबधही घातलेत. (हा लेख छपाईला जाईर्पयत तरी) हा वाद पेटलेलाच होता.
मात्र हे सारं ज्यांच्याविषयी चाललंय त्या गोविंदांच्या मनातला ‘थरथराट’ नेमका कसा असतो? त्यांना का वाटतं की आपण गोविंदात सहभागी होऊन थर लावायचेच?
- हेच प्रश्न घेऊन काही गोविंदा पथकांची भेट घेतली. सराव करणा:या गोविंदांशी गप्पा मारल्या.
काही गोविंदा तावातावानं सांगत होते, ‘कोणत्याही यंत्रणोने अडवणूक केली, तरीही आम्ही थर लावणारच!’
ते नुस्तं बोलत नाहीत, तर नेहमीच्याच मेहनतीनं ही ‘पोरं’ रात्रंदिवस जोमाने सराव करताहेत. काही नामांकित गोविंदा पथकं तर नऊ थरांचा विश्वविक्रम मोडीत काढून यंदा दहा थरांकडेही वाटचाल करायचे मनसुबेही रचताहेत.
पथकांमध्ये ठसन!
सराव करणा:या गोविंदांशी बोललं तर त्यांच्यातलं वेड सहज समजतं. अनेक तरुणांना तर पैसे किती मिळणार, हंडी कितीची फोडली, आपण कुठल्या थरात हे असे प्रश्नही पडत नाहीत. गुरुपौर्णिमा ते गोविंदा हा त्यांच्यासाठी वर्षभर जगून घेण्याचा एक काळ असतो. रोज ही मुलं सरावासाठी भेटतात. वडा-चहा काहीतरी खातात आणि प्रॅक्टिसला लागतात. गोविंदाचे प्रशिक्षकही असतात. हे प्रशिक्षक या मुलांना शिकवतात. आपण गोविंदा पथकात आहोत याचीच नशा काहींना अशी चढते की ते कामधाम विसरून फक्त सरावावर लक्ष केंद्रित करतात.
हट्टेकट्टे मुलं खालच्या थरात, किडकिडे, बारके वरच्या थरात असं ठरवून जेव्हा मनोरे रचले जातात तेव्हा एका वेगळ्याच टीम स्पिरीटचा अनुभव ही मुलं घेतात. जणू आपल्या खांद्यावर सा:या टीमचा भार पेलत आणि आपण खाली राहत, वरती जाणा:याला मदत करतात.
गोविंदा पथकातली अनेक मुलं सांगतात, ‘आपला थर लागला पाहिजे, आपलं कायपण झालं तरी चालेल असंच फक्त डोक्यात असतं. बाकी तेव्हा काहीपण आठवत नाही!’
आपल्याच पथकातले दोस्त असतात असं नाही, तर दुस:या पथकातल्या गोविंदांशीही दोस्ती व्हायची. स्पर्धा होती पण ती टोकाची नव्हती किंवा स्पर्धा होती पण खुन्नस नव्हती, ठसन तर नव्हतीच नव्हती.
मात्र या गोविंदांशी गप्पा मारता मारता असं लक्षात येतं की, गेल्या काही वर्षापासून या उत्सवातील एकजूट आणि आपलेपणा काहीसा हरवू लागला आहे. राजकीय आयोजकांचे फुटलेले पेव हे यामागील मुख्य कारण! लाखांच्या दहीहंडय़ाचे आमिष दाखवून गोविंदा पथकांना तासन्तास ताटकळत ठेवायचे, मग एकाच मंडपाखाली दोन पथके आल्यावर त्यांना झुंजविण्याचा प्रकार सुरू करायचा असे प्रकार सर्रास होतात. लोण्याचा गोळा आपल्याला मिळावा यासाठी मग गोविंदा पथकंही उंचच उंच दहीहंडीच्या प्रेमात पडू लागली. त्यातून या पथकांमध्ये म्हणजेच या पथकातल्या गोविंदांमधेही शत्नुत्व निर्माण होऊ लागले आहे.
गोविंदांची पंढरी - माझगाव ताडवाडी
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यातील गोविंदा पथकांचे प्रेरणास्थान म्हणून माझगाव ताडवाडीचे नाव घेतले जाते. माझगाव ताडवाडीला जवळपास सत्तरहून अधिक वर्षाची गोविंदांची परंपरा लाभलीय. ताडवाडी थरांच्या या जिगरबाज उत्सवाचा ‘बाप’ मानली जाते. गेल्या कित्येक वर्षापासून गोविंदा आणि ताडवाडीचे समीकरण जुळले आहे. माझगावच्या बीआयटी चाळींमध्ये सणासुदींचे वातावरण कायम उत्साहाचे. त्यात दहीहंडी म्हणजे कृष्णजन्मापूर्वीपासून सुरू होणारा हा उत्सव जास्त दणक्यात साजरा होतो. चाळीतली तगडी मुले खाली, तुलनेने कमी वजनाची वर अशा पद्धतीने जेमतेम तीन ते चार थर रचायची परंपरा 196क् दरम्यान सुरू होती. पण कालांतराने याच सरावातून ताडवाडीचा गोविंदा एकत्र झाला. आणि मग कसून सराव केल्याशिवाय उत्सवात सहभागी व्हायचं नाही असा निर्धारच करण्यात आला.
ताडवाडीत दक्षिण विभाग सार्वजनिक गणोशोत्सव मंडळ (1946), श्री दत्त क्रीडा मंडळ (1953), अष्टविनायक क्रीडा मंडळ (2क्क्6) , बालमित्न (1975) आणि बाबदेव (1953) ही मंडळे आहेत. शिस्त आणि चपळता यामुळे श्री दत्त गोविंदा मंडळ नेहमीच सर्वाची वाहवा मिळवत आले आहे. त्यामुळेच 1998 साली श्री दत्त क्रीडा मंडळाने कोहिनूर येथील आयोजनात पहिल्यांदा आठ थरांचा विक्रम रचला, तर पहिल्यांदाच नऊ थरांचा विश्वविक्रमाचा प्रयत्नही दत्त क्रीडा मंडळानेच केला आहे. मात्र त्यावेळी त्यांच्या पदरी अपयश आले. मात्र 2क्क्8 साली नऊ थरांचा जागतिक विश्वविक्रमही माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणोशोत्सव मंडळ या पथकाच्या नावावर आहे. दहीहंडीच्या संस्कृतीतून महाराष्ट्राच्या परंपरेचे राजपथावर दर्शन घडविण्याचा मान ताडवाडीतील मंडळालाच मिळाला होता.
गोकुळाष्टमीपूर्वीच्या या काळात जर कुणी या माझगाव परिसरात आलं तर गोविंदाचे दणक्यात चाललेले सराव दिसतात. पथकातल्या मुलांना बोलायला वेळ नसतो. थरावर थर रचले जातात. कोलमडतात. पुन्हा जिद्दीनं उभे राहतात. जोवर चांगलं जमत नाही तोवर सराव होतो. प्रशिक्षकही पथकातील तरुण मुलांकडून जीवतोड मेहनत करून घेतात. थकवा, दमछाक हे शब्दच माहिती नसल्यासारखी ही पोरं थरावर थर रचत राहतात. विशेष म्हणजे, माझगाव परिसरातील ही पथकं दहीहंडीच्या काळात एकमेकांसमोर स्पर्धक म्हणून उभी ठाकत असली तरी गरज असेल तर भावाच्या नात्याने एकमेकांच्या मदतीला धावूनही जातात. इथलीच नाहीतर मुंबईतल्या सर्वच उपनगरांतील, ठाण्यातील पथकांमधली तरुण मुलं कायम आसपासच्या भागात संकटकाळात मदतीला धावतात हा नेहमीचा अनुभव आहे.
197क् च्या दशकापासून नारायण भालेकर, गजानन जाधव, पांडुरंग कदम, सीताराम कदम, मनोहर संगारे, मुरारी आपंडकर आणि अनंत सावंत या ज्येष्ठ गोविंदांनी आपल्या मार्गदर्शनाने ख:या अर्थाने या उत्सवाला मोलाचे योगदान दिले, तर आत्ताच्या घडीला श्री दत्त क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक बाळा पडेलकर हे या परंपरेतील महत्त्वाचे नाव आहे.
एक नक्की, पूर्वीचा गोविंदा वेगळा होता. आता थरावर थर वाढत असताना हंडय़ांची रक्कमही वाढत आहे. गोविंदा हे पॅशन मानून स्वत:पुरता त्याचा खेळ खेळत त्यातला ‘थरथराट’ अनुभवणारी एक तरुण पिढी होती.
आता तरुण गोविंदांसमोर पैशाच्या रकमा आहेत, त्याची ओढ आहे.
आणि पैशानं झुंजी लावल्यागत गोविंदांना झुंजवता येऊ शकतं, याची खात्री असणारे आयोजकही आहेत. या सा:यात एक मात्र अजूनही कमअस्सल झालेलं नाही ते म्हणजे, गोविंदा पथकात असणा:या मुलांचं गोविंदावेड, त्यांचं पॅशन, त्यांची मेहनत.
त्या मेहनतीची कदर फक्त व्यवस्थेला नाही, आणि त्यांच्या जिवाचं मोलही पैशापुढे कुणी मानत नाही, हाच प्रश्न आहे. पण हे प्रश्नही सराव करताना या मुलांना शिवत नाहीत. त्यांना फक्त थरावरचे थर दिसतात.
त्या थरांमधली ऊर्जा वाया जाऊ नये असं मात्र त्यांना भेटलं की जाणवत राहतं.
घरची गरिबी, अनेक प्रश्न, अनेक प्रकारची हलाखी आणि आपले दु:ख हे सारंच या तरुणांना विसरायला लावणारा हा गोविंदा. टी-शर्ट, हाफ पॅण्ट, गळ्यात रुमाल, डोक्यावर टोपी आणि नखशिखांत भिजलेली मुलं कोंबडीबाजा, कच्छी- ढोलच्या तालावर थिरकत दहीहंडी फोडतात तेव्हा तीच त्यांच्यासाठी मोठी अचिव्हमेण्ट असते.
जिंकण्याची ती भावना हंडीच्या पैशापेक्षाही मोठी असते, हेच दुर्दैवानं अजून आपल्या व्यवस्थेला कळलेलं नाही!
गोविंदांची स्पर्धा कॅसलर्सशी
जागतिक कॅनव्हासवर चीन, स्पेन यांच्याशी महाराष्ट्राच्या गोविंदांची तगडी स्पर्धा आहे. महत्त्वाचे म्हणजे, साहसी खेळाचा दर्जा दिल्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धामध्ये गोविंदा सहभागी व्हावा, असे स्वप्न महाराष्ट्रातील पथके बाळगून आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी शासनाचा भक्कम पाठिंबा आवश्यक असल्याचेही त्यांचे म्हणणो आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्राची अस्मिता असणा:या या गोविंदाला आंतरराष्ट्रीय पटलावर नाव कोरण्यासाठी थेट स्पेनच्या कॅसलर्सशी स्पर्धा करण्याचे आव्हान गोविंदा पथकांनी पेलले आहे.
गोविंदांची परंपरा..
भारतावर ब्रिटिशांची सत्ता असतानाच मुंबईत या उत्सवाची सुरुवात झाली. त्याकाळी गोकुळाष्टमीच्या निमित्ताने समाजप्रबोधनासाठी निरनिराळ्या विषयांवरील चित्नरथ काढले जायचे. या उत्सवाच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनजागृती करण्यात आली. एक विलक्षण आपलेपणा त्यावेळी समाजात होता. एकजूट होती. देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि या उत्सवाचे रूप बदलले. समाजप्रबोधनाचा वसा घेऊन चित्नरथ काढणा:या गोविंदा पथकांसाठी मानाच्या दहीहंडय़ा बांधण्यात येऊ लागल्या. परंतु कालौघात हळूहळू चित्नरथ गायब होऊ लागले. आता केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी पथके चित्नरथाच्या माध्यमातून प्रबोधन करताना दिसत आहेत. त्याकाळी कुणी आयोजक नव्हते, मित्नमंडळी-आप्तेष्टच पथकांसाठी दहीहंडय़ा बांधायचे.
त्यावेळी डिलाईल रोडचे बंडय़ा मारुती आणि गिरगावातील हौशी बाल मित्नमंडळ आघाडीवर होते. कारण त्यावेळी व्यायामशाळेत जाणा:या रांगडय़ा गडय़ांचा हा उत्सव असे मानले जायचे. पथकांमध्ये त्या काळात कबड्डीपटू, खोखोपटू अशा खेळाडूंचा समावेश असायचा. कृष्ण जन्माष्टमीचा एक आगळावेगळा सोहळा त्याकाळी अवघ्या मुंबईत साजरा व्हायचा. ठाण्याचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या दहीहंडी आयोजनामुळे या उत्सवाला खरी ओळख मिळाली, मात्र पथकांमध्ये ठसन निर्माण होण्यामागे याच हंडीचा मोठा वाटा आहे.
अनेक वर्षापासून गोविंदा पथकात आहे. तिस:या-चौथ्या थरात उभा राहतो. माङया खांद्यावर अनेक गोविंदांना आधार देत गेली कित्येक र्वष थरांचे विक्रम रचले आहेत. त्यामुळे सध्या सुरू असणा:या या उत्सवाच्या वादाची पर्वा नाही. दिवसभर ऑफिसमध्ये काम करून कधी सरावाला जाईन असं होतं, रात्री उशिरार्पयत सराव चालतो. कधी एकदा ‘मास्टर’ आवाज देतात आणि एका मागोमाग एक जण खांद्यावर चढतो हे कळतही नाही. पाहता पाहता काही क्षणांत एकमेकांच्या साहाय्याने या थरांनी वेगळीच उंची गाठलेली असते. थर रचताना मनात धाकधूक, ्रअसतेच. ‘बजरंग बली की जय.’चा घोष प्रत्येकवेळी अंगावर शहारा आणतो आणि आपला थर नीट जमला पाहिजे या भावनेपलिकडे डोक्यात दुसरं काही येत नाही.
- उमेश वावेकर,
सदस्य, श्री दत्त क्रीडा मंडळ
दहीहंडी उत्सवात ज्यावेळी चार थर लावत होते, तेव्हापासून या उत्सवात आहे. त्यामुळे या उत्सवातील स्थित्यंतराचा मी साक्षीदार आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने घर, नोकरी सांभाळून कित्येक र्वष गोविंदांना प्रशिक्षण देतोय. त्याचबरोबर अनेक र्वष थरातही उभा राहतोय. या थरांत उभं राहण्याची भावना शब्दांत मांडता येणार नाहीच. ज्यावेळी थर लावले जातात, त्या क्षणाला गोविंदांमध्ये वेगळाच उत्साह संचारतो. ती गोविंदांमधील रगच वेगळी असते. चार थरांच्या उत्सवापासून आजमितीस या उत्सवाने नऊ थरांचा टप्पा गाठलाय, याचा अभिमान आहे. भविष्यातही साहसी खेळ म्हणून या आंतरराष्ट्रीय कॅनव्हासवर गोविंदाला पोहोचविण्याचा मानस आहे.
- बाळा पडेलकर,
प्रशिक्षक, श्री दत्त क्रीडा मंडळ