ग्रेटेस्ट? नाही, डबल ग्रेटेस्ट!!
By admin | Published: June 11, 2016 10:41 AM2016-06-11T10:41:28+5:302016-06-11T10:41:28+5:30
ग्रेटेस्ट? नाही, डबल ग्रेटेस्ट!!
Next
>महंमद अली
जगप्रसिद्ध बॉक्सर. त्यांना काल सा:या जगानं अखेरचा निरोप दिला. खेळापलिकडे जाऊन जगण्याचं आणि माणसाच्या इच्छाशक्तीचं प्रतिनिधीत्व करणारे महंमद अली.
त्यांची ही दोन वाक्यच पहा.
त्यांची माहिती देणा:या वायकीपिडीयाच्या पेजवर गेलात तर ही दोन वाक्यं आवुर्जन समोर येतात.
जे त्यांच्या आयुष्याचं तत्वज्ञान सांगतात. महंमद अलींची ही वक्तव्य भविष्यातही खेळाडूंना, लढवय्यांना प्रेरणोचा दिवा दाखवत राहतील.
"Float like a butterfly, sting like a bee, your hands can't hit what the eyes can't see"
**
He who is not courageous enough to take risks will accomplish nothing in life.
**
यातलं पहिलं जे वाक्य आहे ते अलींनी सांगितलं होतं सोनी लिटसन या मुष्टीयोद्याला दुस:यांना हरवलं तेव्हा. आपला वेग, चपळाई, चित्त यासा:याचा सुंदर मिलाफ घालून यश कसं मिळवता येतं हेच ते सांगताहेत.
खरंतर अली नेहमी म्हणत की चॅम्पियन काही जीममध्ये सराव करुन बनत नाहीत. त्यांना स्वत:लाही सततचा सराव, ट्रेनिंग फार काही आवडायचं नाही.
पण त्यांचं एकच तत्व होतं.
डोण्ट क्विट!
सोडून देऊ नका. माघार घेऊ नका.
ते म्हणत, आत्ता घाम गाळा. स्वत:ला त्रस द्या. आणि मग निवांत चॅम्पियन बनून जगा.
सा:या जगानं पाहिलेला हा एक खराखुरा चॅम्पियन होता. त्या चॅम्पियनच्या यासा:या स्मृती अनेक तरुण मनात कायम जाग्या राहतील आणि ज्या तरुणांना झुंजायला आवडतं, स्वपA पहायला, महत्वाकांक्षा मनी धरायला आवडतात त्यांना त्या आठवणी, ही वाक्यं कायम उमेद देत राहतील.
-आनंदी नाशिककर
महंमद अलींची
जगप्रसिद्ध वाक्यं
"Service to others is the rent you pay for your room here on earth."
"I'm young; I'm handsome; I'm fast. I can't possibly be beat."
"Don’t count the days; make the days count."
"I am the greatest, I said that even before I knew I was."
“I hated every minute of training, but I said, ‘Don’t quit. Suffer now and live the rest of your life as a champion.'”
"A man who has no imagination has no wings."
"Hating people because of their color is wrong. And it doesn't matter which color does the hating. It's just plain wrong."