गुरुपौर्णिमा : आपल्या घरात येत असलेल्या तंत्रज्ञानालाच गुरु करुन घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 04:17 PM2018-07-26T16:17:45+5:302018-07-26T16:17:51+5:30

सॅन होजे विमानतळावरच्या प्ले एरियामध्ये काही लहान मुलं रोबोटशी खेळताहेत. मुलांनी खूश होऊन म्हटलं की ‘धिस इझ कूल’ तर त्यातला एक रोबोट म्हणाला, ‘आय नो आय अ‍ॅम कूल, थॅँक यू.’

 Guru Pournima: technology is a new Guru! | गुरुपौर्णिमा : आपल्या घरात येत असलेल्या तंत्रज्ञानालाच गुरु करुन घ्या!

गुरुपौर्णिमा : आपल्या घरात येत असलेल्या तंत्रज्ञानालाच गुरु करुन घ्या!

Next
ठळक मुद्देइंडस्ट्री 4.0  तंत्रज्ञान शिकण्यासाठी त्या तंत्रज्ञानालाच गुरुकरून आपण एकलव्याप्रमाणे शिकू.

- डॉ. भूषण केळकर

अदिती दीक्षित या गेमिंगमध्ये काम करणार्‍या इंजिनिअर विद्यार्थिनीने मला सॅन होजे या कॅलिफोर्नियातील विमानतळावरचा एक फोटो पाठवला. अदिती ही आपल्या इंडस्ट्री 4.0 सदराची नियमित वाचक आहे. तिनं सांगितलेला हा किस्सा. 
सॅन होजे विमानतळावरच्या प्ले एरियामध्ये काही लहान मुलं आहेत. त्याच्यासोबत रोबोट्स आहेत. मुलांनी खुश होऊन म्हटलं की ‘धिस इझ कूल’ तर त्यातला एक रोबोट म्हणाला, ‘आय नो आय अ‍ॅम कूल, थॅँक यू’.
आहे की नाही भारी? असे अनेक रोबोट्स हे जपानमध्ये तर सिनिअर सिटिझनसाठी त्यांची कामं करायला, त्यांना औषधांची आठवण करायला आणि एवढंच नव्हे तर त्यांचे मनोरंजन करायलासुद्धा वापरले जात आहेत!
मला आठवण झाली आपल्याकडील 2007 च्या मेंटेनन्स अ‍ॅण्ड वेल्फेअर ऑफ पेरंट्स अ‍ॅण्ड सिनिअर सिटिझन अ‍ॅक्ट’ची. कोण जाणे ‘फॅमिली व्हॅल्यूज’ जपणारे अन् श्रावणबाळाची परंपरा सांगणारे भारतीयसुद्धा आई-वडिलांची काळजी घ्यायला भविष्यात रोबोट्स वापरू लागतील? इंडस्ट्री 4.0 मुळे जसा परिणाम उद्योग आणि नोकर्‍यांवर होणार आहे तसाच तो समाज स्वास्थ्यावरही होणार आहे, यात शंकाच नाही! असो!
तर आपण मागील लेखात बघितलं की, आपण कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असतो तरीही आपण इंडस्ट्री 4.0 मध्ये टिकून राहण्यासाठी काही नवीन शिकणं आवश्यक आहे. त्यासाठी काही महत्त्वाचे कोर्स मी तुम्हाला सांगून ठेवतो. त्यातील तुम्हाला जमतील ते कोर्सेस तुम्ही करावेत. मुख्य म्हणजे मी देतोय ते कोर्सेस संपूर्णतर्‍ विनामूल्य आहेत.
सांख्यिकीशास्त्र  ही गणिताची शाखा तुम्हाला त्यात खूपच मदत करेल. ज्याला आपण  ओपन सोर्स म्हणतो. असं एक साधं सॉफ्टवेअर तुम्हाला सांगतो त्याचं नाव आहे  "R". हे सॉफ्टवेअर नुसतंच विनामूल्य शिकता येईल. त्यासाठीच्या या दोन साइट्स. 
1) www.udemy.com/r-basics/
2) alison.com/course/r-for-data-analysis
सांख्यिकीसोबतच तुम्ही अजून काही संज्ञा ऐकल्या असतील. त्यांची तोंडओळख आपण करून घेतली तर त्याचा आपल्याला आपापल्या क्षेत्रात फायदाच होईल. त्या संज्ञा म्हणजे डाटा सायन्स, डाटा अ‍ॅनालिसिस, डिसिजन सायन्स. 
औषधनिर्माणपासून वैद्यकीय, इंजिनिैरिंगपासून मानशास्त्रार्पयत आणि विधिविषयक ज्ञानापासून ते मनुष्यबळ विकास आणि कला शाखांर्पयत यापुढे जे डाटा सायन्स वापरायला लागले त्यात अगदी साध्या गोष्टी आपण वापरू. त्यात येईल मायक्रोसॉफ्टचे एक्सेल व मायक्रोजचं ज्ञान. हे तुम्हाला सहज मिळवता येईल व  'R मुळे अधिक परिपक्व करता येईल.
याविषयातील अजून काही कोर्सेस मी सांगतो.  COURESRA.ORG या वेबसाइटवर अ‍ॅण्ड्रय़ू एनजी  या अत्यंत प्रसिद्ध प्राध्यापकाचा इंट्रोडक्शन टू मशीन लर्निग हा कोर्स सुंदर आहे. त्याला हिंदीमध्ये सबटायल्स पण आहेत.
मायक्रोसॉफ्टचे दोन कोर्सेस तुम्ही edx.org या साइटवर करू शकाल. 1 महिन्यात संपणारे हे उत्तम कोर्सेस  तुम्हाला डाटा सायन्स सहजसुंदर शिकवतील.
edx.org वरच हार्वर्ड विद्यापीठाचा डाटा सायन्स या विषयावर केवळ 4 आठवडय़ाचा कोर्स आहे. बर्कले विद्यापीठाचा कोर्स फंडामेण्टल ऑफ डाटा सायन्स असा आहे.   
एकूण काय इंडस्ट्री 4.0  तंत्रज्ञान शिकण्यासाठी त्या तंत्रज्ञानालाच गुरुकरून आपण एकलव्याप्रमाणे  शिकू. गुरुपौर्णिमा अत्यंत पद्धतीने साजरी करू! गुरवे नम :.. 


 

Web Title:  Guru Pournima: technology is a new Guru!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.