जिमचा चस्का
By admin | Published: November 27, 2014 10:08 PM2014-11-27T22:08:50+5:302014-11-27T22:08:50+5:30
यामाच्या वेडाने झपाटलेल्यांच्या डोक्यातल्या चुकीच्या कल्पनांचे हे किडे कोण मारणार? ‘ऑक्सिजन’नं त्यासाठी गाठलं ते थेट ‘मिस्टर युनिव्हर्स’ प्रेमचंद डेग्रा यांना.
Next
>
आपण ‘फिगर परफेक्ट’ असावं,
अगदी ‘मॉडेल’ नाही,
पण आपल्या बॉडीचा लूक त्याच्या जवळपास जाणारा असावा असं तर सगळ्यांना वाटत असतंच.
आता थंडी सुरू झालीय.
त्यामुळे अनेकांना जिमचा चस्का लागलाच असणार.
फिटनेसच्या या जगात भलभलत्या कल्पनांची वेडं भरपूर !
खिशाला चाट लावणारे आणि शरीराची वाट लावणारे इन्सण्ट शॉर्टकट्स तर पावलापावलावर !
कुणी कायम जिममध्ये पडीक, कोणी कसल्या डाएटच्या मागे, कुणी सप्लिमेण्ट्सचे डबे आणायला पळतोय, तर कुणी प्रोटीन पावडरची पाकिटं फस्त करतोय !
जो जो म्हणून जे जे काय सांगेल ते सगळं ट्रायआउट करणारे,
तर पुष्कळ !
व्यायामाच्या वेडाने झपाटलेल्यांच्या डोक्यातल्या चुकीच्या कल्पनांचे हे किडे कोण मारणार?
‘ऑक्सिजन’नं त्यासाठी गाठलं ते थेट ‘मिस्टर युनिव्हर्स’ प्रेमचंद डेग्रा यांना.
भारतीय तरुण-तरुणींना व्यायामाचा चस्का लावण्याचं फार मोठं श्रेय पॉकेट हक्यरुलिस मनोहर आईच आणि प्रेमचंद डेग्रा यांच्याकडे जातं. हॉकीसाठी ध्यानचंदनं, अँथलेटिक्ससाठी मिल्खासिंगनं, क्रिकेटसाठी सचिन, सुनील, कपिलनं, चेससाठी विश्वनाथन आनंदनं आणि टेनिस, बॅडमिंटनसासाठी सानिया, सायनानं जे काम केलं ते पंजाबच्या प्रेमचंद डेग्रा यांनी व्यायामाच्या संदर्भात केलं आहे. व्यायाम कसा करावा, कसा करू नये याचे धडे ते आजही तरुण-तरुणींना देतात.
प्रेमचंद नेहमीच सांगतात, मी माझ्या आयुष्यात कधीच कोणतीच ‘गोळी’ घेतली नाही, सप्लिमेण्ट्सच्या डब्याला कधी हात लावला नाही, स्टिरॉईड्सचे इंजेक्शन्स मला माहीत नाहीत. ‘जनरल फिटनेस’ हाच माझा बेसिक फंडा होता, आजही आहे. व्यायामासाठी उत्सुक, जागरूक असलेल्या तरुण पिढीनेही त्याकडेच लक्ष द्यायला हवं.
जिम, व्यायामाच्या संदर्भात प्रेमचंद डेग्रा यांनी सांगितलेली
रामबाण त्रिसूत्री पारंपरिक वाटेलही कदाचित, पण तोच एकमेव मंत्र आहे.
योग्य व्यायाम-साधा, नैसर्गिक आहार आणि जे कराल त्यात समतोल !
आता, हे करायचं कसं?
उलटा पान..