हॅक युवर लाइफ

By admin | Published: December 3, 2015 10:13 PM2015-12-03T22:13:53+5:302015-12-03T22:13:53+5:30

‘हॅक युवर लाइफ’ नावाचा एक भलताच ट्रेण्ड सध्या सुरू होतो आहे. म्हणजे काय तर, आपण आपलंच आयुष्य जरा हॅक करायचं. म्हणजे काय?

Hack Your Life | हॅक युवर लाइफ

हॅक युवर लाइफ

Next

 - मृण्मयी सावंत

‘हॅक युवर लाइफ’
नावाचा एक भलताच ट्रेण्ड सध्या सुरू होतो आहे.
म्हणजे काय तर, आपण आपलंच आयुष्य जरा हॅक करायचं.
म्हणजे काय?
आपण रोज नाकासमोर धावतो, नको त्या गोष्टीत अडकतो
आणि आपल्याला कशासाठीच वेळ मिळत नाही.
गोष्ट कुठलीही असो, उत्तर एकच, मला वेळच नाही. 
मग हा वेळ आपला नक्की जातो कुठं हे शोधण्यासाठी जरा शांतपणे आपल्याच लाइफस्टाइलकडे पाहणारा हा एक नवीन ट्रेण्ड आहे. ज्याचं नाव ‘हॅक युवर लाइफ’!
जरा शांतपणे विचार करायचा की, आपल्याला नेमकं काय हवंय, लोक धावत सुटलेत म्हणून आपणही वाटेल त्या गोष्टीच्या मागे धावतोय का?
उगीच नको तिथे डोकं खपवतोय का? नको त्या गोष्टींचा त्रास करून घेतोय का? आणि खरंच धावतोय की आपण नुस्तेच ट्रेडमिलवर धावल्यासारखे धावतोय पण पुढं कुठंच जात नाही?
असे प्रश्न स्वत:ला विचारा. अशी चर्चा साधारण पंचविशी उलटलेल्या तरुणांच्या जगात आता सुरू झाली आहे.
त्या चर्चेतून आत्तापर्यंत पाच गोष्टी समोर आल्या आहेत..
 
१) ज्याला स्पीड असे म्हणतात तसा कुठलाही फारसा वेग प्रत्यक्षात अनेकांच्या आयुष्याला नसतो. फक्त तसा एक फील असतो स्वत:ला, पण प्रत्यक्षात आयुष्यात काही घडत नाही.
२) सोशली अनेकजण फार अ‍ॅक्टिव्ह असतात, खूश दिसतात; पण प्रत्यक्षात आतून कुढत असतात.
३) अनेकांना रात्री नीट झोप लागत नाही. मेंदूला आराम नाही. त्यामुळे सकाळी बऱ्यापैकी थकवा आणि या ना त्या दुखण्याची तक्रार केली जाते.
४) अनेकांना उदास वाटतं. पण आपल्याला नेमकं कशानं उदास वाटतं हे कळत नाही.
५) घरात चिडचिड वाढते, आरडाओरडा वाढतो, आणि त्यातून वादही. या साऱ्या टप्प्यात आपली लाइफस्टाइल स्लो नव्हे, तर हॅक करूनच त्यात तातडीनं सुधारणा करण्याची गरज असते.

Web Title: Hack Your Life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.