हॅमर आणि नेल

By admin | Published: July 23, 2015 06:06 PM2015-07-23T18:06:33+5:302015-07-23T18:06:33+5:30

दुष्काळाबद्दल जे काही वर्तमानपत्रतून वगैरे कळत असतं, ते प्रत्यक्षात पाहावं म्हणून दुष्काळी भागात जाऊन काम करायचं ठरवलं.

Hammer and Nell | हॅमर आणि नेल

हॅमर आणि नेल

Next
>- शतानंद पाटील
 
दुष्काळाबद्दल जे काही वर्तमानपत्रतून वगैरे कळत असतं, ते प्रत्यक्षात पाहावं म्हणून दुष्काळी भागात जाऊन काम करायचं ठरवलं. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील चार गावांत दोन महिने प्रत्येक शनिवार-रविवारी जात होतो. आमचं मुख्य काम होतं ते म्हणजे प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेची माहिती देणं. ती कामं सुरू करून देण्यास हातभार लावणं. त्यानुसार रोजगार हमी योजनेचा अभ्यास करून आम्ही गावात जाऊन पोहोचलो. 
 नमुना अर्ज भरून घेणं, बँकेत खाती उघडणो अशा कामांना सुरुवात केली. मी आंबेवाडी नावाच्या गावात गेलो असताना बाइकवरून पडलो. पायाला, हाताला, हनुवटीला थोडं लागलं. गावात किंवा जवळपास उपचारांची सोय नव्हती. उपचारांकरिता थेट 12-13 किमी अंतरावरील इगतपुरीच्या रुग्णालयात जावं लागलं. तेव्हा डोक्यात मास्लोचं का 'If you have only a hammer, you tend to see every problem as nail' हे वाक्य आठवलं. 
मग म्हटलं गावांमध्ये इतरही प्रश्न आहेत. ते आपल्याला सोडवता नाही आले तरी निदान त्यांची नोंद तरी घेता आली पाहिजे. ते आपल्याला कळले पाहिजेत.
पण बघा, आमच्या मोहिमेचे दोन महिने संपूनही कुठल्याच गावात कामाला सुरु वात झाली नाही. त्याची कारणं शोधताना बरेच निष्कर्ष काढले. या कामाची लोकांना फार गरज वाटत नाही का? त्यांचं सगळं ‘व्यवस्थित’च चाललं होतं किंवा जी काही परिस्थिती होती त्याची सवयच होऊन गेली होती त्यांना? मला प्रश्नच होते. तसं आम्ही शेवटच्या मीटिंगमध्ये प्रगती अभियानच्या आश्विनीताईंना सांगितलं तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं होतं-
‘‘कुठल्याही समाजात/व्यवस्थेत एक ठरावीक काळ गेल्यानंतर आपोआपच एक समतोल तयार होतो किंवा तसं वाटतं. आपल्याला फक्त हे ओळखता आलं पाहिजे की हा समतोल वाईट स्थितीतला आहे की चांगल्या. आणि तो जर वाईट स्थितीतला असेल तर आपल्याला काम करण्याची नक्कीच गरज आहे.’’
 यानंतर कामाच्या गरजेबद्दल मुळीच शंका उरली नाही. फक्त कामाच्या पद्धतीत बदल हवा, अजून चांगली जनजागृती करायला हवी असं मला वाटलं. महत्त्वाचं म्हणजे प्रश्न दिसायला-कळायला आणि पडायलाही लागले.
 
 

Web Title: Hammer and Nell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.